मला धुक्याचा देश

मला धुक्याचा देश

Submitted by जयदीप. on 22 December, 2012 - 00:03

मला धुक्याचा देश
या ना कुठेही वेस
रात्र सरते सकाळ पुसट
कळे ना असे कुणाची सोबत

पडले बुरुज कधीचे,
बेघर झाले किल्ले, उरले
ना त्यांचेही अवशेष
मला धुक्याचा देश

वाहिलो डोळ्यांतून कधी
कधी वाहिलो शब्दांतून
ना कुणा पर्वा न क्लेश
मला धुक्याचा देश

मीच राजा, मीच प्रजा
नको कुणा माझी सजा
ुउरले रिते अवशेष
मला धुक्याचा देश!

Subscribe to RSS - मला धुक्याचा देश