जगबुडी

जगबुडी

Submitted by अनुराधा म्हापणकर on 21 December, 2012 - 03:53

मनांच्या राज्यात
रोज हजारो भूकंप
प्रलय आणि सुनामीही
फ़ुटतात असंख्य ज्वालामुखी
अन उसळतो तप्त लाव्हा
झंझावाती वादळं तर
रोजच करतात उलथापालथ

कितीदा पडायचं..
कितीदा बुडायचं..
कितीदा ती मनातली
मोडलेली, कोलमडलेली घरं
पुन्हा पुन्हा उभारत राहायचं
आपणच बांधलेले इमले
वादळात वाहताना पाहायचे
कितीदा सारं कोसळताना
तटस्थ उभंही राहायचं..

असण्यानसण्याच्या सीमेवर
पुन्हा पुन्हा वसणं…
त्यापेक्षा एकदाचीच काय ती
"जगबुडी" बरी नाही का ??

अनुराधा म्हापणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जगबुडी