फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
Submitted by अशोक. on 21 December, 2012 - 00:45
"काय डेंजर वारा सुटलाय...!" ह्या नाटकामुळे सर्वतोमुखी नाव झालेले लेखक जयंत पवार यांची "महाराष्ट्र टाईम्स" च्या २००२ दिवाळी अंकातील "टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन" ही कथा वाचली तेव्हा किती विलक्षण ताकदीच्या लेखकाची ही चित्रमय कथा आपण वाचत आहोत या विचाराने मी खूप आनंदित झालो होतो. पुढे याच कथेवर याच नावाने रंगमंचावर नाटकही आले, पण ती नाटकरूपी ट्रेन कोल्हापूरापर्यंत पोचू न शकल्याने मग जयंत पवारांचा लिखित माध्यमाद्वारेच पाठलाग करण्याचे मनोमनी ठरविले.
विषय:
शब्दखुणा: