बायजा

बायजा

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 24 November, 2012 - 10:15

दुपारची वेळ होती. उन्हाचा चटका वाढला होता. भाजी बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. बायजा आपल्या भाजीपाल्याच्या दुकानावर बसली होती. पालेभाज्या वाळू नयेत म्हणून मधून-मधून त्यावर पाण्याचा शिडकावा करीत गिऱ्हाइकांची वाट बघण्यात वेळ चालला होता. अलीकडेच बायजाने नगरपालिकेकडून भाजी बाजारात हा आठ-बाय-आठचा गाळावजा ओटा भाड्याने घेतला होता. बायजाचे आता बरे चालले होते. शेजारीच म्हादबाचा गाळा होता. चांगला पोरगा होता बिचारा. वेळीकाळी बायजाला त्याचा आधार असायचा. बायजा म्हादबाला म्हणाली, " म्हादबा, आज काय धंद्याचं खरं दिसत न्हाई बुवा".

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बायजा