"हो सुट्टा सुट्टा हृदया"
Submitted by बेफ़िकीर on 29 October, 2012 - 04:29
नुसतेच कडेवर बसणे
मग हे घे ते घे करणे
काहीही निरखत फिरणे
काहीही मागत रडणे
मी नाही नाही म्हणणे
येईल बुवा ऐकवणे
तू काहीदा घाबरणे
तू धडधड करणे
मग त्याने मी घाबरणे
मी डॉक्टरला दाखवणे
तू औषध नाही म्हणणे
मी बळेच ते चाटवणे
मग तू भोकाड पसरणे
मग थोडा उतार पडणे
मग तुला पुन्हा हिंडवणे
तू सरावणे सार्याला
आजाराच्या मार्याला
त्या डॉक्टरी उतार्याला
मरणाच्या.. इशार्याला
मसणाच्या..निवार्याला
आगीच्या.. उबार्याला
करपटल्याश्या वार्याला
जळलेल्या .. बिचार्याला
श्वासांच्या .. भिकार्याला
हे कडेवरी बसल्याने
झालेले आहे सारे
मी लाड तुझे केल्याने
झालेले आहे सारे
विषय:
शब्दखुणा: