नव्या युगाची कविता

स्वप्नात नदीचा गाव...

Submitted by ज्ञानेश on 21 September, 2012 - 04:50

====================

या Bits & Bytes मध्ये
का उगाळशी ते पाढे?
Painless delivery आली
का गळा ओतशी काढे?

कर on रूमचा हीटर
माघाच्या थंडीमध्ये
अन् लाव जरासा कॅक्टस
तुळशीच्या कुंडीमध्ये

त्या शुभंकरोत्या विसरा,
ते वदनिकवळचे फंडे
Saturday night नंतर
Enjoy करावा Sunday

मग Age Miracle शोधे
अस्वस्थ यशोदा कोणी
Red Bull कृष्णाच्या ओठी
मडक्यात राहिले लोणी

Welcome लिहिलेले मॅट
रिप्लेस करो रांगोळी
देणारे हातच दुबळे,
मजबूत आमुची झोळी !

To support करण्या cause
रस्त्यावर काय उतरणे?
Like केले की क्रांती,
Share केले की धरणे !

विसरून चालली काया
अलगद स्पर्शाचे वारे

Subscribe to RSS - नव्या युगाची कविता