नमस्कार रसिकहो,
आज दीपावलीच्या मंगलप्रसंगी 'हितगुज दिवाळी अंक २०१२' आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
आपणा सर्वांच्या सहकार्याच्या, पाठिंब्याच्या आणि आपुलकीच्या बळावरच दिवाळी अंकाचे हे शिवधनुष्य पेलण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपला जिव्हाळा, प्रेम या दिवाळी अंकालाही लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी व आनंदाची जावो.
तंत्र हा आजच्या जगाचा मंत्र तर आहेच, परंतु तो आपला मित्र देखील आहे का, हे आजमावून पाहण्यासाठी हितगुज २०१२ दिवाळी अंकात आपण समाविष्ट केलाय 'तं तं तंत्रज्ञानाचा..' हा परिसंवाद!
आपण सगळेच या ना त्या मार्गाने तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, तेव्हा याच तंत्रज्ञानाविषयी विचार करायला, आमच्या काही प्रश्नांवर मत द्यायला आवडेल ना तुम्हांला?
श्री गणरायाचे प्रकाशचित्र दिवाळी अंकाच्या ह्या पहिल्या घोषणेसाठी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल बित्तुबंगा यांचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.