कालिदासाचे रघुवंश - डॉ. परिणीता देशपांडे
Submitted by अतुल ठाकुर on 17 December, 2016 - 20:14
मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्याचवेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले.