मंत्रालयाची रया गेली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली
पाय फुटले मंत्रालयीन खुर्च्यांना
चव्हाण सेंटर, वसंत भवन
मातोश्री, रिट्रीट, जयपूर कमी
काहींनी दिल्ली गाठली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली
सामान्य जनतेचे लढाऊ प्रतिनिधी
चोराचिलाटाला घाबरले, बसले
ऐशोआरामात पंचतारांकित कुलुपात
तेव्हाच लोकशाहीची धडधड वाढली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली
सन १८२८ स्थळ "शनिवारवाडा"
शनिवारवाड्याचा ताबा घेतल्यावर काही काळ पुण्याचा कलेक्टर रॉबिन्सन वाड्यात राहत होता. पुढे इंग्रजांनी तळ मजल्यावर तुरुंग, पहिल्या मजल्यावर दवाखाना आणि वरील मजल्यावर वेड्यांचे इस्पितळ असा जागेचा उपयोग करण्यास सुरवात केली.
गुरुवार २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मराठी साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या जगप्रसिद्ध शनिवारवाड्याला आग लागली.
इंग्रजांच्या ताब्यात असल्याने वाड्याकडे दुर्लक्ष्य झाले होते. त्यामुळे आग लागल्याचे प्रथम समजलेच नाही. भणभणत्या आगीने रौद्र रूप धारण केल्यावर ती विझवण्याचे सर्व मार्ग खुंटले. तट बुरुज वगळता, आतील सर्व इमारती भस्मसात करून आगीचे तांडव शांत झाले.