"रंगपेटी उघडू चला..!!!"
गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!
१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.
मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.
गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!
*******************************************************
ही स्पर्धा १ ते ४ वर्ष , ५ ते ८ वर्ष, ९ ते १२ वर्ष आणि १३ ते १६ अशा एकूण चार वयोगटात आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेचे नियम :
१. ह्या स्पर्धेत विषयाचे आणि माध्यमाचे बंधन नाही.
२. ही स्पर्धा मायबोलीकरांच्या मुलांसाठी आहे. ह्यात इतर नातेवाईक अपेक्षित नाहीत. (पुतण्या, भाचा इ.)
३. स्पर्धेत भाग आई/वडीलांच्या आयडीनेच घ्यायचा आहे.
४. चित्राबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहावे आणि संयोजकांना संपूर्ण नाव इ-मेल द्वारे कळवावे.
५. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)
६. चित्र रंगवलेलं नसलं तरी चालेल.
७. एका मुलासाठी एकच चित्र द्यायचे आहे.
८. चित्र काढताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.
९. मुला/मुलीचे सध्याचे वय आहे त्याच वयोगटात चित्र देणे अपेक्षित आहे.
१०. मतदान पध्दतीने विजेता निवडला जाईल.
*******************************************************
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेत प्रवेशिका पाठवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माझे सदस्यत्व मधे जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. त्या फाईलचे आकारमान हे १५० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी ५०० x ५०० पिक्सेल अशी हवी.
२. "मायबोली गणेशोत्सव २००९" ह्या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि नविन लेखनाचा धागा उघडावा लागेल. ह्या धाग्याला सार्वजनिक करा.
३.आता प्रवेशिकेला साजेसं शीर्षक द्या. विषय 'मायबोली' निवडा. शब्दखूणां चित्रकला स्पर्धा आणि मायबोली गणेशोत्सव २००९ अशा द्या.
४. आता प्रतिसाद देतो त्या चौकटीत चित्राची इमेज अपलोड करा. खाली पाल्याचे नाव आणि वयोगट लिहा.
५. प्रतिसाद तपासून सेव्ह करा.
मायबोलीकरांच्या परिवाराला आपल्या गणेशोत्सवात सामील करून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेतला सहभाग वाढवण्यासाठी आणि ती निकोपपणे पार पाडण्यासाठी सर्व मायबोलीकरांनी सक्रिय प्रयत्न करावे ही संयोजकांतर्फे नम्र विनंती.
*******************************************************
आलेल्या प्रवेशिका
वयोगट १ ते ४ वर्षे
१. मी छोटा चित्रकार - http://www.maayboli.com/node/10505
२. रींगण आणि रेघा - http://www.maayboli.com/node/10504
३. माऊ आणि फुल - http://www.maayboli.com/node/10558
४. बटरफ्लाय आणि बंबल बी - http://www.maayboli.com/node/10576
५. आमचीही रंगपंचमी (?)!!! - http://www.maayboli.com/node/10592
६. सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !! - http://www.maayboli.com/node/10582
वयोगट ५ ते ८ वर्षे
१. माझे जग - http://www.maayboli.com/node/10506
२. मॉडर्न आर्ट (!) - http://www.maayboli.com/node/10512
३. नदीकाठचा देखावा - http://www.maayboli.com/node/10414
४. निसर्गचित्र - http://www.maayboli.com/node/10456
५. जर्मनीतील सुट्ट्यांनधील एक दिवस - http://www.maayboli.com/node/10463
६. माझेही लँडस्केप - http://www.maayboli.com/node/10486
७. फ्लेमिंगो - http://www.maayboli.com/node/10513
८. राजकन्या, महाल आणि बरच काही - http://maayboli.com/node/10549
९. घरकुल - http://www.maayboli.com/node/10528
१० माझा बाप्पा - http://www.maayboli.com/node/10531
११. सनग्लासेस घातलेला mr सन , एलिफंट आणि मी - http://www.maayboli.com/node/10543
१२. बर्फ, डोंगर, स्किईंग.. - http://www.maayboli.com/node/10557
वयोगट ९ ते १२ वर्षे
१. गणपती बाप्पा मोरया - http://www.maayboli.com/node/10258
२. विदुषक - http://www.maayboli.com/node/10424
३. न्यूयॉर्क सिटी - http://www.maayboli.com/node/10555
४. शेकोटी - http://www.maayboli.com/node/10563
५. निसर्ग - http://www.maayboli.com/node/10527
६. बाप्पा मोरया रे.... - http://www.maayboli.com/node/10591
७. धावायला सज्ज! - http://www.maayboli.com/node/10587
८. समुद्रकाठ - "इम्प्रेशनिस्ट स्टाईल" म्हणे!! - http://www.maayboli.com/node/10580
वयोगट १३ ते १६ वर्षे
१. माझा हिरो - http://www.maayboli.com/node/10332
२. शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल का..... - http://www.maayboli.com/node/10502
३. पूल, तळे, फुले वगैरे - http://www.maayboli.com/node/10532
४. सांगाती - http://www.maayboli.com/node/10560
५. 'अग्निपंख'- छोट्या एअरक्राफ्ट इंजिनियरचे फुल्ली लोडेड लढाऊ विमानाचे डिझाईन! - http://www.maayboli.com/node/10579
<<<< "मायबोली गणेशोत्सव २००९"
<<<< "मायबोली गणेशोत्सव २००९" ह्या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि नविन लेखनाचा धागा उघडावा लागेल. ह्या धाग्याला सार्वजनिक करा.<<<
संयोजक साहेब..या धाग्याला सार्वजनिक कसं करायच हे कृपा करुन सांगा! तनिष्क चे चित्र सर्वांना दिसत नाहीये!
नयना, तो धागा आता अॅडमिन
नयना, तो धागा आता अॅडमिन यांनी सार्वजनिक केलेला आहे...
संयोजक , अजूनही काही चित्र
संयोजक , अजूनही काही चित्र दिसत नाहीत
Pages