"रंगपेटी उघडू चला..!!!"- लहान मुलांची चित्रकला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 16:35

"रंगपेटी उघडू चला..!!!"

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!

१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्‍याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.

मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.

गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!

*******************************************************

ही स्पर्धा १ ते ४ वर्ष , ५ ते ८ वर्ष, ९ ते १२ वर्ष आणि १३ ते १६ अशा एकूण चार वयोगटात आयोजित करण्यात येत आहे.

स्पर्धेचे नियम :

१. ह्या स्पर्धेत विषयाचे आणि माध्यमाचे बंधन नाही.

२. ही स्पर्धा मायबोलीकरांच्या मुलांसाठी आहे. ह्यात इतर नातेवाईक अपेक्षित नाहीत. (पुतण्या, भाचा इ.)

३. स्पर्धेत भाग आई/वडीलांच्या आयडीनेच घ्यायचा आहे.

४. चित्राबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहावे आणि संयोजकांना संपूर्ण नाव इ-मेल द्वारे कळवावे.

५. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)

६. चित्र रंगवलेलं नसलं तरी चालेल.

७. एका मुलासाठी एकच चित्र द्यायचे आहे.

८. चित्र काढताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.

९. मुला/मुलीचे सध्याचे वय आहे त्याच वयोगटात चित्र देणे अपेक्षित आहे.

१०. मतदान पध्दतीने विजेता निवडला जाईल.

*******************************************************

स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :

१. स्पर्धेत प्रवेशिका पाठवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माझे सदस्यत्व मधे जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. त्या फाईलचे आकारमान हे १५० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी ५०० x ५०० पिक्सेल अशी हवी.

२. "मायबोली गणेशोत्सव २००९" ह्या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि नविन लेखनाचा धागा उघडावा लागेल. ह्या धाग्याला सार्वजनिक करा.

३.आता प्रवेशिकेला साजेसं शीर्षक द्या. विषय 'मायबोली' निवडा. शब्दखूणां चित्रकला स्पर्धा आणि मायबोली गणेशोत्सव २००९ अशा द्या.

४. आता प्रतिसाद देतो त्या चौकटीत चित्राची इमेज अपलोड करा. खाली पाल्याचे नाव आणि वयोगट लिहा.

५. प्रतिसाद तपासून सेव्ह करा.

मायबोलीकरांच्या परिवाराला आपल्या गणेशोत्सवात सामील करून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेतला सहभाग वाढवण्यासाठी आणि ती निकोपपणे पार पाडण्यासाठी सर्व मायबोलीकरांनी सक्रिय प्रयत्न करावे ही संयोजकांतर्फे नम्र विनंती.

*******************************************************
आलेल्या प्रवेशिका

वयोगट १ ते ४ वर्षे

१. मी छोटा चित्रकार - http://www.maayboli.com/node/10505

२. रींगण आणि रेघा - http://www.maayboli.com/node/10504

३. माऊ आणि फुल - http://www.maayboli.com/node/10558

४. बटरफ्लाय आणि बंबल बी - http://www.maayboli.com/node/10576

५. आमचीही रंगपंचमी (?)!!! - http://www.maayboli.com/node/10592

६. सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !! - http://www.maayboli.com/node/10582

वयोगट ५ ते ८ वर्षे

१. माझे जग - http://www.maayboli.com/node/10506

२. मॉडर्न आर्ट (!) - http://www.maayboli.com/node/10512

३. नदीकाठचा देखावा - http://www.maayboli.com/node/10414

४. निसर्गचित्र - http://www.maayboli.com/node/10456

५. जर्मनीतील सुट्ट्यांनधील एक दिवस - http://www.maayboli.com/node/10463

६. माझेही लँडस्केप - http://www.maayboli.com/node/10486

७. फ्लेमिंगो - http://www.maayboli.com/node/10513

८. राजकन्या, महाल आणि बरच काही - http://maayboli.com/node/10549

९. घरकुल - http://www.maayboli.com/node/10528

१० माझा बाप्पा - http://www.maayboli.com/node/10531

११. सनग्लासेस घातलेला mr सन , एलिफंट आणि मी - http://www.maayboli.com/node/10543

१२. बर्फ, डोंगर, स्किईंग.. - http://www.maayboli.com/node/10557

वयोगट ९ ते १२ वर्षे

१. गणपती बाप्पा मोरया - http://www.maayboli.com/node/10258

२. विदुषक - http://www.maayboli.com/node/10424

३. न्यूयॉर्क सिटी - http://www.maayboli.com/node/10555

४. शेकोटी - http://www.maayboli.com/node/10563

५. निसर्ग - http://www.maayboli.com/node/10527

६. बाप्पा मोरया रे.... - http://www.maayboli.com/node/10591

७. धावायला सज्ज! - http://www.maayboli.com/node/10587

८. समुद्रकाठ - "इम्प्रेशनिस्ट स्टाईल" म्हणे!! Happy - http://www.maayboli.com/node/10580

वयोगट १३ ते १६ वर्षे

१. माझा हिरो - http://www.maayboli.com/node/10332

२. शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल का..... - http://www.maayboli.com/node/10502

३. पूल, तळे, फुले वगैरे - http://www.maayboli.com/node/10532

४. सांगाती - http://www.maayboli.com/node/10560

५. 'अग्निपंख'- छोट्या एअरक्राफ्ट इंजिनियरचे फुल्ली लोडेड लढाऊ विमानाचे डिझाईन! - http://www.maayboli.com/node/10579

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
ह्या स्पर्धेची प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख काय आहे सांगाल काय?

~साक्षी

नावाशिवाय कसं जमेल? Uhoh बाकी प्रवेशिकांसारख्या या संयोजकांना न पाठवता थेट इथेच अपलोड करायच्यात, म्हणजे नाव येणारच, शिवाय पाल्याचं नावही लिहायचं आहे, म्हणजे तेही उघड.

मुलांचा सहभाग आहे, तेव्हा स्पर्धा न ठेवता, (वविला करतो तसं) सगळेच विजेते म्हणून घोषित करावेत Happy उल्लेखनीय चित्रांचा special mention करता येईल. - असं चालेल का संयोजक/ पालक?

असेच करावे असे मला तरी वाटते.....

स्पर्धाच ठेवायची असेल तर मग नावे उघड न केलेली बरी.... बाकी प्रवेशिकांसारख्या थेट संयोजकांना पाठवता नाही का येणार या प्रवेशिका???

नावाशिवाय द्यायच्या असतील तर त्याला प्रवेशिका द्यायला अंतिम तारीख द्यायला हवी. आणि कदाचित सगळ्याच प्रवेशिका किंवा जास्त प्रवेशिका शेवटच्या दिवशी येतील.. मग एकदम एका दिवशीच प्रकाशित कराव्या लागतील कदाचित.

पण सूचना चांगली आहे. नाव न देता नुसता वयोगट सांगून प्रकाशित करता आल्या तर जास्त चांगलं होईल.

मुलांचा सहभाग आहे, तेव्हा स्पर्धा न ठेवता >>> ह्याला माझही अनुमोदन... माझी मुलगी "स्पर्धा आहे चल चित्र काढ" अस म्हंटल्या बरोबर "मी भाग घेणार नाही" म्हणुन मोकळी झाली. किती नाटकी पोर आहेत आजकालची.... आपण किती साधे होतो नै?? Wink

"रंगपेटी उघडू चला" ही स्पर्धा म्हणून घोषित केली होती आणि त्यावर आता दोन प्रवेशिका आलेल्या आहेत. त्यामुळे आता नियमांमधे तसेच स्पर्धेच्या स्वरूपामधे बदल करणे शक्य होणार नाही. पुढच्या वर्षीच्या संयोजकांना हा मुद्दा नक्की कळवला जाईल. सगळयांना विनंती आहे की आपल्या मुलांनी तयार केलेल्या प्रवेशिका ह्या स्पर्धेत समाविष्ट कराव्यात.

संयोजक चित्र काढून झालं की आपणच प्रवेशिका इथे अपलोड करायची आहे ना. मला संयोजकांकडून एक मेल आली की तुमची प्रवेशिका आली नाहीये .. म्हणून मी जरा गोंधळले.. आधी नावं द्यायची नाहीयेत असं वाटलं मला नियम वाचून.

नियम ४ मध्ये फक्त पाल्याचे नाव टाकणे ऑप्शनल आहे. पण प्रवेशिका मायबोलीकर आई किंवा बाबाच देणार. त्याने केवळ मुला/लीचे नाव कळणार नाही, 'कोणाच्या' पाल्याचे नाव आहे हे कळणारच!

असो, वरच्या दोन्ही प्रवेशिका गोड Happy आमचीही प्रवेशिका तयार आहे, ती करेन एक-दोन दिवसात अपलोड. स्पर्धेसाठी नाही, तर संयोजकांच्या 'एक्स्टेन्डेड फॅमिली'च्या संकल्पनेसाठी म्हणून भाग घेणार Happy

>>>> अस म्हंटल्या बरोबर "मी भाग घेणार नाही"
अगदी अगदि, अन माझी मुलगी, स्पर्धा हे का? मग पहिल्या नम्बरला काय बक्षिस देणार अस विचारत आधीच हुरळून चालली आहे Lol
तिला म्हणल, मुकाट चित्र काढ, बक्षिस मीच देणारे Wink

अश्या गोड स्पर्धा जर नेहमी आयोजित केल्या गेल्या अन सर्व स्पर्धकांना बक्षिसे देणार असतील, तर 'फॅमिली एक्स्टेन्ड' करायचे विचार मनात आले त चुकले काय?

विषय वगैरे काही नाही का स्पर्धेला?

संयोजक मला तुमचा मेसेज आताच मिळाला जीमेलवर! मागचे ३-४ दिवस आम्ही गावाला गेलो होतो माझी आत्या वारली म्हणुन..! उद्यापर्यंत माझ्या मुलाची प्रवेशिका पाठवते नक्कीच! प्लिज अ‍ॅक्सेप्ट करा!

कुठेतरी सिंड्रेलाने उत्तर दिलेल ते वाचलेल आठवतय.

शब्द्खुणा मधे 'चित्रकला स्पर्धा मायबोली गणेशोत्सव २००९' अस लिही.

माझ्याही मुलाची प्रवेशिका इथे दिसत नाहीये....! नविन लेखनमधे दिसतेय! आणि मी शब्दखुणा मधे 'चित्रकला स्पर्धा मायबोली गणेशोत्सव २००९ असेही टाकलय तरीसुद्धा ... Sad

संयोजकांचे आणि पालक पाल्यांचे कौतुक आहे.
शक्य असेल तर एक सुचवू का ? (यात किती तकनिकी कौशल्य लागेल याची मला अजिबात कल्पना नाही. शक्य नसेल तर माफ करा.)

ह्या सर्व चित्रांची एक Rolling Strip/ Slide Show होमपेज वर टाकता आल्यास खूप छान वाटेल.

नमस्कार मंडळी,

"रंगपेटी उघडू चला..!!!" ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सर्व लहानग्यांची चित्रे इतकी कल्पक आहेत की ह्यात फक्त एक विजेता निवडणं म्हणजे इतर स्पर्धकांवर अन्यायच होइल, नाही का ? म्हणूनच आम्ही ही स्पर्धा न ठेवता फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारची मागणी ह्या आधी इथे करण्यात आली होती, ती विचारात घेऊनच संयोजक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

पुन्हा एकदा आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!

संयोजकांच्या निर्णयाचे स्वागत Happy
इतकी सुरेख चित्र काढलियेत सगळ्या बच्चे कंपनीनी की खरच खूप कठिण होतं मतदान आणि यातल एक चित्र विजेता ठरवायच (म्हणुनच संयोजकानी आयडिया केली ;))

>>> चित्रांच कोलाज दिवाळी अंकाच मुखपॄष्ठ<<<

आर्च हे चे सज्जेशन सहीच....

संयोजकांच्या निर्णयाचे स्वागत.. चित्रे पाहतानाही एकापेक्षा एक सरस आहेत हेच मनात येत होतं....

Pages