GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स
स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी
http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...
Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868
चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.
खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.
अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440
शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
एकूण : १६ मोठे + ५ छोटे
===============================
शनिवारचा कार्यक्रम -
१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.
२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.
३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.
४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.
५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.
रविवारचा कार्यक्रम -
१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.
===============================
मेन्यू -
शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================
कामाची वाटणी -
सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)
आर्जे, माझ्याकडे तुझी (फिओना
आर्जे, माझ्याकडे तुझी (फिओना कडून आलेली) द.मा. आणि माडगुळकरांची आहेत ती परत करते. पाहिजे आहेत त्यांची यादी तुला कळवते.
माझ्या कडून काही विषेश
माझ्या कडून काही विषेश अपडेट्स नाहीत पुस्तक फ्रंट वर.. लालूचं प्रकाशवाटा आर्जे ला देण्यात येईल.. आणि आर्जेचं एक होता कार्व्हर परत देण्यात येईल.. बाकी वाचन चालू आहे अजून..
माझ्या विपूच्या डोक्यावर
माझ्या विपूच्या डोक्यावर पुस्तकांची यादी आहे, कोणाकोणाला माझ्याकडून काय काय हवय वाचायला ते माझ्या विपूत लिहा, उपलब्ध असल्यास घेवून येईन.
मी खालील गोष्टी उद्या आणतेय.
मी खालील गोष्टी उद्या आणतेय. रिपीट होऊ नये म्हणून लिहितेय (किंवा ह्यातलं काही आणलं असेल तर कळवणे)
१. कांदे
२. सिमल मिर्ची
३. झुकीनी
४. कणसं
५. टोमॅटो
६. बटाटे
७. केळी
८. सफरचंद
९. पाणी
मी: पराठे, दूध मसाला,
मी: पराठे, दूध मसाला, डिस्पोजेबल्स, पेपर नॅपकिन्स, जास्तीचा मिसळ मसाला (लागल्यास), मटकी.
दूध दिसत नाहीये वरच्या यादीत. तसेच मोठे डाव वगैरे असतील ना तिथे ? मी घेतलेल्या कटलरी बॉक्समधे फक्त लहान चमचे, काटे, सुर्या आहेत.
आर्जे दूध आणणार आहे. मोठे डाव
आर्जे दूध आणणार आहे.
मोठे डाव तिथे असतील.
आज रात्रीच्या आत सगळ्यांचे
आज रात्रीच्या आत सगळ्यांचे फोन नंबर्स एका मेलमध्ये पाठवा जीमेलवर. माझ्याकडे अटलांटाच्या आर्जे, अडम यांचे आहेत तरीही सगळे नंबर्स एकत्र असले की बरे पडेल..
गूड सजेशन! मला वाटतं अडम कडे
गूड सजेशन!
मला वाटतं अडम कडे येणार्या सगळ्यांचे नं. आहेत. आडमा, जर डिस्ट्रिब्यूट करणार का लिस्ट वर?
माझा फोन नंबर आणि पत्ता गमेल
माझा फोन नंबर आणि पत्ता गमेल वर पाठवला आहे.....
मंडळी, गटगला भरपुर
मंडळी, गटगला भरपुर शुभेच्छा!
तुम्ही सगळे भरपुर मजा करा. आणी आल्यावर व्रुत्तांत, फोटो टाकयला विसरु नका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला नाहीच जमणार.
Have Fun !
-सुनित & भावना
थँक्स भावना!!! तुम्हा दोघांची
थँक्स भावना!!! तुम्हा दोघांची कमी जाणवेल्.....परत केव्हातरी....
भरपूर मजा करा लोकहो. सर्वांना
भरपूर मजा करा लोकहो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना भरपूर कलर्स बघायला मिळो ही शुभेच्छा.
स्मोकी जीटीजीला भरघोस
स्मोकी जीटीजीला भरघोस शुभेच्छा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फॉल कलर्स बघा, खादाडी करा, bbq करा.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर गप्पा आणि दंगा!!
आमच्या शिट्टीतर्फे एक खंदा मेंबर पाठवलाय मजा मस्ती करायला!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एन्जॉय!!!
पन्नाला मोदक... भरपूर मज्जा
पन्नाला मोदक... भरपूर मज्जा करा..
वाह... एन्जॉय करा !! भरपूर
वाह... एन्जॉय करा !! भरपूर गप्पा,खादाडी, फिरणे , गॉसिपिंग होऊन जाऊदे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटग मस्त झालं. खूप खादाडी,
गटग मस्त झालं. खूप खादाडी, फिरणं, गॉसिप आणि हसणं झालं. फॉल कलर्स नी हुलकावणी दिली पण तरीही एकंदरीत ह्या गटग ला १० पैकी १० मार्क्स :).
खरंच मजा आली... धमाल केली
खरंच मजा आली... धमाल केली एकदम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अडमा, लिही रे वृत्तांत लवकर... किंवा मग आरजे तू स्टार्टर्स म्हणून तुझा तो स्पेशल सारांश वृत्तांत टाक..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सँट्या... ठरल्याप्रमाणे
सँट्या... ठरल्याप्रमाणे वर्जिलन आयडीने आलास ना... गुड !!
वृ लिहितो... आर्जे.. MOM लिही..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सँटीनो रिटर्न्स फोटो, छोटे
सँटीनो रिटर्न्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो, छोटे मोठे वृ. टाका लवकर!
अजून आमचा एक्सटेंडेड गटग
अजून आमचा एक्सटेंडेड गटग चालूच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-रूनी
गटग ला अतिशय धमाल
गटग ला अतिशय धमाल आली.खाणं,पिणं, गप्पा आणि गॉसिप्समध्ये २ दिवस पटकन संपले असं वाटलं.
सिंडी, तुझे मित्रमंडळ आपल्या दंग्यामध्ये कंटाळले नाहित ना?
सर्वांना पिकासाची लिन्क पाठवली आहे.तुमचे फोटोपण शेअर करा.
काल आवराआवरी करताना ज्यू. आर्जेचे जॅकेट सापडले आहे.पेनल्टी दिल्यावर ते परत देण्यात येईल.
आमचा तांदळाचा डबा आणि लहान मुलांच्या सिडीज कोणाकडे आल्यास जपून ठेवाव्यात.
गटग ला अशक्य धमाल आली.. !!!
गटग ला अशक्य धमाल आली.. !!!
हा घ्या वृत्तांत.. दोन दिवसात इतकं काय काय घडलं की सगळे जणच राहिलेल्या गोष्टी अपडेट करा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अटलांटा करांचं पहिलं गटग धडाक्यात पार पडल्यावर अधून मधून लहान गटग होत होतीच... आणि दरवेळी कुठेतरी ट्रिपला जाऊ असा एक विचार पण व्हायचा... त्याचवेळी विनायकने फॉल कलर्स पहायला स्मोकी ला जायचा प्रस्ताव मांडला होता.. "तुम्ही सगळे खरच जाणार असाल तर आमच्या नवर्यांना स्मोकी माऊंटन हे बेस्ट फॉल डेस्टिनेशन आहे हे पटवू" असं रूनी आणि सिंडी ने जाहिर केलं.. बाफ उघडून त्यावर चर्चा चालू झाल्या... आणि विनायक आणि आर्जे ने व्हॅन आणि केबिनची बुकिंगही करून टाकली. नंतर गणपतीच्या धामधुमीत हा बाफ मागे पडला... मो आणि पूर्वा जमेल तसं त्याला जिवंत ठेवायचा प्रयत्न करतच होत्या... प्लॅनिंगच्या चर्चा सुरु झाल्यावर सिंडी आणि रूनीच्या थकेल्या प्रतिक्रिया बघून "ह्याच का त्या गणेशोत्सवातल्या धडाडीच्या कार्यकर्त्या" असा विचार मनात येऊन गेला आणि त्यांचे आयडी हॅक झाले आहेत की काय अशी दाट शक्यताही वाटुन गेली.. आणि नंतर होणार्या कॉनफरन्स कॉलवर बहिष्कार टाकायचा असं मी ठरवून टाकलं.. !! पण तो कॉल एकदाही झालाच नाही..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोनवर ऑफलाईन ठरवाठरवी झाल्यावर एकदाचं सगळं सामान-सुमान जमा झालं आणि गटग अगदी दोन दिवसांवर आलं.. त्याचवेळी आमच्या प्रोजेक्ट मधे आग लागली आणि माझं जाणं रद्द होतय का काय असं वाटायला लागलं !! पण शुक्रवारी सगळं ठिकठाक झालं आणि मी मो च्या घरी जाऊन पोचलो... दरम्यान रूनी-नितिन आर्जे बरोबर विनायकच्या घरी जाऊन पोचले...
सामान आणि माणसं त्या व्हॅनमधे कोंबणं हा एक मोठा कार्यक्रम पार पडला... ९ मोठे आणि ४ मुलं आणि सगळ्यांची पोटं २ दिवस तीन त्रिकाळ भरतील एव्हड खाण्याचं सामान असं सगळं त्या व्हॅन मधे बसलं होतं.. एकूण "हात घालीन तिथे खाणं !" अशी परिस्थिती होती..
विनायकने ड्रायव्हरची आणि नितीनने क्लिनरची जबाबदारी घेतली आणि शेवटपर्यंत निभावली.. त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद.. !
दरम्यान सिंडी आणि सँटीची फोनाफोनी चालू होती.. सिंडी तिथे परप्रांतियांच्या कळपात फसलेली असल्याने फोन वर ती सारखे आमच्या गप्पांचे अपडेट घेत होती.. !! मजल-दरमजल करत आम्ही गॅटलीनबर्ग ला पोचलो.. केबिनची किल्ली घेऊन आता सिंडी आणि सँटीला कधी आणि कुठे भेटायचं ह्यावर सुमारे साडेबारा मिनिटं चर्चा झाली.. आणि शेवटी गटग बाफ सारखाच सन्नाटा पसरला... प्रत्येकाचं हेमाशेपो टाकून झाल्यावर शेवटी ते दोघं आणि त्यांच्या रिस्पेक्टीव्ह जिपिएस काकू काय ते बघून घेतील असं ठरून आम्ही केबिन कडे निघालो.. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमच्या त्या रस्याचं नाव "वायली-ओक ली" असं होतं.. विनायक गाडी हाकायच्या नादात ते सारखं विसरत होता.. शेवटी नितीनते त्याला "आधी व्ययली आणि मग ओकली असं लक्षात ठेव" असं सांगितलं.. त्यावर समस्त महिला वर्गाने त्याच्याकडे तु.क. टाकले..
नितीन प्रत्येक वेळी अंधारत वेगवेगळया घरांचे नंबर बघून येत होता... मधे एकदा "मला कोणी किडनॅप केलं... तर पोलिसांना फोन करा नक्की.. तसेच पळून जाऊ नका" असंही सांगून गेला... अखेर त्या वायली-ओकली वर बर्याच फेर्या मारल्यानंतर आमच्या जीपीएस काकू अचानक जाग्या झाल्या आणि एकदाचं ते केबीन सापडलं... !!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जरा स्थिरस्थावर झाल्यावर आर्जेने आणलेल्या गाण्यांचा सिड्या लावायचा प्रयत्न झाला पण ऐनवेळी त्यातला बर्याच चालल्याच नाहित... त्यामुळे "आयुष्यावर बोलू काही" आणि स्वदेस मधली "गंभीर आणि विचारप्रवरर्तक" गाणी ऐकावी लागली..
पण तितक्यात सिंडी आणि कंपनी आली आणि त्यांनी आमच्या मागे यायचं ठरलं.. घाटातला रस्ता होता.. आणि नितिन प्रत्येक वळणावरची पाटी वाचत रस्ता शोधत होता.. मागे सिंडीची गाडी आहे हे विसरून एकदम.. "ही गाडी आपल्याला इतका वेळ का टेलगेट करत्ये !!! पोलीसांना फोन करायचा का !!!! " असं अत्यंत त्राग्याने म्हणाला..
मधल्या दोन सिटवर पूर्वा, रुनी आणि शिल्पा बसलेल्या असल्याने मला, आर्जेला आणि राहूलला रस्ता शोधण्यात काहीच मदत करता येत नव्हती.. कारण गाडी बाहेर पडायचं तर त्या तिघींचे "अडसर" ओलांडणं गरजेचं होतं आणि जे फारच अवघड होतं..
दरम्यान आमची एक "भयकथा" ही पाडून झाली.. ज्याचा नायक नितिन आहे... पण त्याला नुसत्या भयकथेत इंटरेस्ट नाहिये.. त्यामुळे त्या कथेचं रोमँटिकीकरण केलं जाणार आहे.. "विशिष्ट भयकथाकारांची माफी मागून" ती कथा लवकरच गुलमोहोरात प्रकाशित होणार आहे...
आम्ही पोचून सामान आत आणत नाही तेव्हड्यात सँटी तिथे येऊन पोचला.. आम्ही दिडतास रस्ता शोधत होतो आणि हा इतक्यात कसा आला म्हणून चिडून विनायकने त्याला वायली-ओकली वर ५ फेर्या मारून यायची शिक्षा सुनावली... पण त्यानंतर तो चुकला तर परत आपल्याला तिथे जायला लागेल म्हणून ती माफही केली..
केबिन मात्र मस्त होतं एकदम.. ४ बेडरूम, २ लॉफ्ट्स, एका खोलीत बंकबेड, पूल टेबल, एअर हॉकी आणि डेबल फुटबॉल, मोठा टिव्ही, म्युझिक सिस्टीम आणि सुसज्ज किचन... मस्त वाटलं एकूण... आम्ही सर्वणा भवन मधून जेवण पॅक करून घेऊन गेलो होतो.. सिंडी आणि मंडळी येताना रस्त्यात जेवली होती आणि "तुम्ही आम्हालाही जेवण का नाही आणलं" म्हणून आमची जेवणं होईपर्यंत हॉलमधल्या हाय चेयर वर रुसुन बसली होती... ! (त्यामुळे आमची जेवणं नीटपणे पार पडली..
) दरम्यान पूल आणि एअरहॉकी खेळणं ही चालूच होतं.. पण सगळेच दमले असल्याने एकंदरीत लवकर झोपायचा विचार होता... आर्जे आणि शिल्पा मुलांना झोपवून येतो म्हणून गेले ते स्वतःही झोपले... काही काही मंडळी पांगल्यावर अचानक मी, राहूल, सँटी, मो आणि विनायक असे किचन मधे भेटलो आणि तिथेच अर्धा पाऊण तास "उभ्या उभ्या गप्पा" मारल्या.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसर्या दिवशी.. पूल टेबलवरच्या जोरदार आवाजाने सकाळी सकाळी ७ ला जाग आली !! सिंडी, नितेश आणि सँटी पहाटे उठून पूल खेळत होते.. कसाबसा ८ पर्यंत झोपून शेवटी मी खाली आलो... खरतर मी पहाटे पूल खेळून माझी झोप मोडणार्यांचा जोरदार निषेध नोंदवायच्या मुड मधे होतो.. पण तितक्यात शिल्पाने मला सुहास्य वदनाने गुडमॉर्निंग वगैरे करून चहाचा कप दिला... मी एकदम खुष.. !! चहा घेऊन मी फ्रेश झाल्यावर मला हळूच सांगितलं "जरा फोडणीला टाकलेला कांदा ढवळतोस का.. आणि तो शिजला की त्यात पोहे घालून ते ही ढवळ.. " मी अवाक !!! आर्जेला रोज सकाळी इतकं लवकर का उठायचं असतं मे तेव्हा क़ळलं..
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंतर मग तिथल्या केबल कार ने वर गेलो... पण तिथे विशेष काही नव्हतं.. केबल कार मधून खाली छान दिसत होतं.. तिकडे वर आईस स्केटींगरींक होतं... तिथे एक बाला आपल्या कला दाखवत होती.. ते पहाताच सँटीचा कलिजा खल्लाज झाला..
विनायकनेही थोडावेळ आईस स्केटींग केलं.. पुढे काय करावं हे बराच वेळ ठरत नव्हतं.. "whatever" might be the plan.. I am ok असं नी नितिन ला स्पष्ट सांगून टाकलं... ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्यावरूनच रात्रीच्या गप्पांमधे काय होणार आहे ह्याची झलक मिळाली.. !!
मग मी केलेल्या पोह्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही ट्रेल ला जाण्यासाठी बाहेर पडलो.. आदल्या दिवशीचा तो वायली-ओकली दिवसा पाहिला.. ट्रेलवर मात्र मजा आली खूप.. मधे मधे थोडे थोडे फॉल कलर दिसत होते.. फोटो काढले.. सगळ्या मुलांना पण खूप मजा आली.. ट्रेलवर चालता चालता मी, सिंडी आणि रूनी अश्या गणेशोत्सव कंपूने आमच्या राहिलेल्या कुचाळक्या करून घेतल्या..
ट्रेलच्या शेवटचा धबधबा सॅडच होता तसा.. पण तिथे मजा आली.. फोटो काढले.. नितीन कुठेतरी कोपर्यात उतरून फोटो काढत होता.. ट्रेलवरून परत येईपर्यंत ३ वाजले आणि सगळ्यांनाच प्रचंड भूक लागली.. मग गॅटलीनबर्ग गावातच पिझा हट शोधून तिथे खाऊन घेतलं... आणि दुसर्या ट्रेलचा प्लॅन सहाजिकच रद्द झाला..
दरम्यान मुलांना रेस्टरूमला घेऊन गेलेले आर्जे आणि शिल्पा कुठेतरी हरवले.. "हे दोघं मुलांना झोपवायला किंवा रेस्टरूमला म्हणून घेऊन जातात.. आणि गायबच होतात... !!! " अशी शंका सिंडीच्या डोक्यातून आली पण त्यावर अधीक काही मेंदूवादळं होण्यापूर्वीच ते दोघे परत आले म्हणून बरं..
शेवटी सर्वानुमते केबीन वर परत जायचं ठरलं.. परत येताना केबल कार मधून कोजागिरीच्या चंद्राच सुरेख दर्शन झालं.. ! परतीच्या वाटेवर सुमित आणि खुशबू ला कोजागिरी म्हणजे काय हे समजावून सांगताना राहूल ने कोजागिरी, गटारी आणि करवा चौथं ह्या सगळ्यांचं मिश्रण करून एक नविन सण जन्माला घातला..
घरी आल्यावर कडक चहा झाल्यावर ग्रिल तसेच मिसळीची तयारी सुरू झाली.. एकीकडे पूल तसेच एअर हॉकी खेळणं चालूच होतं... अखेर मो ने आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देत सगळ्यांना खरमरीत झापत कामाला लावलं !!! सिंडी ने ठरल्याप्रमाणे सँटीला कांदे टमाटे चिरायला बसवलं.. मी आणि आर्जे ग्रीलच्या कामाला लागलो.. मॅरीनेट सकाळीच करून ठेवलेलं असल्याने आम्ही चिकन चा ग्रील लगेच सुरु केला.. दरम्यान सिंडी उगीच कामाचं नाटक करत गॅसपाशी उभी राहून ग्रीलच्या कामात अडथळे आणत होती..
पण तरीही आमचं ग्रील मस्तच झालं... !!!! नंतर व्हेज (पनीर आणि भाज्याही) लावल्या.. हे एव्हडं होईपर्यंतही सॅटीचं कांदे कापणं चालूच होतं.. त्यावर नितीन ने एकदम "अरे त्या मुरारबाजींनी पुरंदरावर शत्रुला कापलं होतं.. तसे तू कांदे काय कापत सुटलायस.. !!!" अशी बादरायण उपमा देऊन एकच हशा उडवून दिला.. सुमीत ने ते मुरारबाजी च्या ऐवजी मुरारभाई असं ऐकलं आणि "कौन है मुरारभाई? " असा खरोखरच भा.प्र. विचारला... त्याला उत्तर देताना मी चुकून "मुरारजी देसाई" बोलून गेलो आणि त्या गोंधळात आणखीनच भर पडली..
आणि त्यामुळे भाजल्यावरही तो पांढराच दिसत होता.. पण चविला बरा लागत होता तसा.. मी त्याचा फोटो काढलाय.. सध्या फोटोशॉपमधे त्याचा पांढरटपणा वाढवण्यावर काम चालू आहे.. ते झालं की तो फोटो माझ्या "मसाला माझा वेगळा..." ह्या आगामी रंगीबेरंगी ललित लेखात पहायला मिळेल... (जर त्या सबंधी काही कविता कोणाला माहित असतील तर त्या मला कळवा.. ) ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या हसण्याने आदी उठून जोरात रडायला लागला...
त्याने मधे मधे बर्याच जुन्या आठवणी सांगितल्या आणि समोर आलेली माहिती कशी लॉजिकल नाहिये ते पटवून द्यायचा प्रयत्न केला.,.! त्यातल्या काही काही गोष्टी सुमीत आणि खुशबू ला हिंदीत समजावून सांगायची वेळ आली.. सँटीने "विचारपूस" चे भाषांतर thought errasing असं केलं !!
नितेश, सुमीत आणि खुशबी ते त्यावर खूप हसून घेतल्यावर माझा मराठी बद्दलचा अभिमान जागृत झाला आणि मी सँटी ला "तू अब पेटके उठ !! और अस्खलीत हिंदी मे सबकूछ एक्सप्लेन कर" असं आव्हान केलं... "पेटके उठ" हे पोटाने करायचं काहितरी आहे असं समजून तो आणखीनच भंजाळला... आधीच बसलेला धक्का आणि नंतर हे हिंदी त्यामुळे तो अगदीच वैतागला... नंतर रूनीने "आगीतून उठून फुफाट्यात" आणि "नमनाला घडाभार तेल" ह्या दोन म्हणींचा अर्थ ही त्यांना समजावून सांगितला... त्यानंतरही हास्यस्फोट झाले.. आणि आणखीन दोन पोरं उठून बसली.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकीकडे व्हेज ग्रिल आणि मिसळ पण तयार झाली होती.. पनीरचं मॅरीनेशन पण मीच केलं होतं.. कसं काय कोण जाणे पण एका तुकड्याला ते मिश्रण नीट लागलच नाही...
मुलांची जेवणं झाली आणि ती झोपली..इकडे आमचाही मिसळीवर ताव मारणं सुरू झाली... आणि बरोबर चमचमीत गप्पा होत्याच.... ! सिंडीची मिसळ मस्त झाली होती...
कुठून तरी अचानक पैठण्यांचा विषय निघला... सुमित आणि खुशबूला ते हिंदीत समजावून सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि "पैठणी" ह्या शब्दाचं अनेकवचन ऐनवेळी न सुचल्याने मी ने "पैठणीज" करून टाकलं.. नितीनने लगेच सुधारणा करून ते "पैठणीया" केलं.. आणि लोकांची त्यावर आक्षेप घेतला.. ! रूनी चा मदत समिती मोड ऑन झाला.. आणि तिने "नाही.. पैठणीया बरोबर आहे.. ते गाणं नाहिये का.. छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैठणीयां... !!! " असा प्रचंड हीट डायलॉग टाकला... आधी कोणाला काही न समजून सन्नाटा पसरला आणि मग हास्यस्फोट झाला...
नंतर मग गाडी अर्थातच मायबोलीच्या यशस्वी बीबी आणि आयडींवर घसरली.. काही काही आयडींचे मायबोलीवर वाटणारे मानसिक वय आणि प्रत्यक्षातले शारीरिक वय ह्यातली प्रचंड तफावर दाखवणारी माहिती समोर आल्यावर सँटीला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि त्यातुन सावरायला त्याला दुसरा दिवस उजाडला... !
मधे पूर्वा आणि रूनीने कोजागीरीचं मसाला दुघही बनवलं.. संपूर्ण वेळ सँटीचा सचिन्_बी हा आयडी बोर आहे हे सगळ्यांनी त्याला पटवून दिलं आणि जुन्याच आयडीने परत यायला सांगितलं..
शेवटी बोलणं आणि हसणं अगदीच अशक्य झाल्यावर झोपाझोप झाली... दुसर्या दिवशी सकाळी भराभर आवरून आणि केबीन साफ करून आणि ग्रुप फोटो वगैरे काढून आम्ही पिक पॉईंट कडे प्रयाण केलं.. ह्या प्रवासात मी सँटीच्या गाडीत बसलो.. मधे खुशबूची तब्येत खराब झाल्याने गाड्यांची चुकामूक झाली.. तेव्हा नक्की काय झालं ते अटलांटा कंपू पैकी कोणितरी लिहितील.. पिक पॉईंटला खूपच थंडी होती.. आणि काही लहान मुलं झोपली होती.. त्यामुळे फक्त मी, सिंडी, सँटी, नितेश, नितिन, रुनी आणि इशान एव्हडेच जण वर पर्यंत गेलो.. तिथे प्रेमी युगुलांचे आणि आमच्या सारख्या सिंगुलांचे फोटो काढून खाली आलो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाय ती सिडी फारच टुकार निघाली.. आता ह्या प्रकाराचा बदला पुढच्या गटगत घेतला जाईल असा ठराव परतीच्या प्रवासात पास झाला आहे..
आमच्या गाडीतल्या सिड्यांची अवस्था पाहून सिंडीने उदार अंत:करणाने आम्हाला एक सिडी दिली आणि त्याबदल्यात आमच्या कडून अर्धा किले फरसाण उकळलं !!!
मागे सगळे ढाराढूर पंढरपूर झालेले असताना विनायक आणि नितीन ने आपपल्या भूमिका बजावत आम्हाला सुखरूप परत आणलं.. नंतर विनायक-पूर्वाच्या घरी चहा घेऊन आणि उरलेल्या सामानाची वाटावाटी करून सगळे आपालल्या घरी मार्थस्थ झाले.. आता आम्ही लवकरच "खूप टमाटे, अॅपल बार आणि चुरमुरे उरलेत.. त्याचं काय करता येईल बरं??? " अशी पोस्ट बेत सुचवा बीबी वर टाकणार आहोते..
शेवटी २ दिवसांच गटगही अपुरचं पडलं असं वाटून आता लाँग विकएंड ला कुठेतरी जायचा प्लॅन विचाराधी आहे !!!!!!!!!
* नेहमीच्या तळटिपा आहेतच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारी. गेले २ दिवस
लय भारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गेले २ दिवस डोळ्यासमोर उभे राहिले!!
पुर्वा, फोटो मस्त आले आहेत.
झकास. मस्तच झालेलं दिसतंय
झकास. मस्तच झालेलं दिसतंय जीटीजी... पुजीसाशु..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास व्रुत्तांत!! आम्ही
झकास व्रुत्तांत!! आम्ही मिसलं.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फोटो पाठवाना कुणीतरी
अॅडम आवडला वृत्तांत. एकदम
अॅडम
आवडला वृत्तांत. एकदम भारी.
मी मिसलेला भाग पण लिहा
मी मिसलेला भाग पण लिहा कोणितरी... ! मी सँटीच्या गाडीत असतानाचा.. आणि इतरही..
ह्या गटगला अशक्य हसलो. फार
ह्या गटगला अशक्य हसलो. फार म्हणजे फार टवाळक्या केल्या सगळ्यांनी मिळून.
ऑर्कुटवर फोटो टाकले आहेत.
ऑर्कुटवर फोटो टाकले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्जे फोटोज टू गूड आले आहेत!!
आर्जे फोटोज टू गूड आले आहेत!!
Pages