Submitted by आनंदयात्री on 5 August, 2009 - 10:18
जे घडले ते तुजला बहुधा नंतर कळले होते
अपुल्यामधले अंतर तोवर फसवे बनले होते
दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते
वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते
सावध झालो तेव्हा आधी तुझी आठवण झाली
तूच मला बोलावुन अलगद दूर ढकलले होते
शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते
पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते
चर्चा झाली बाजारी पण किंमत ठरली नाही
जेव्हा नाते अपुले तू विकण्यास काढले होते
नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत
दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते
शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते
खासच!
क्या बात है!!! खुपच छान गझल.
क्या बात है!!!
खुपच छान गझल.
सुंदर. भेट तुझी झाली अन्
सुंदर.
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते
ह्या दोन्ही ओळींमध्ये "अर्थ त्यांचे गवसले होते" आणि "फूल तेथे अडकले होते" असे जास्त लयदार वाटते.
-सविनय.
पुस्तक मिटण्यापूर्वी मी
पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते
खुप सुंदर...
वाद अकारण झाला आणि खूप बोललो
वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते>>>मौन चिघळले होते, वा!
मस्त गझल
मस्त गझल
मस्तच. आवडली.
मस्तच. आवडली.
वाद अकारण झाला आणि खूप बोललो
वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते
खुपच छान अन सुरेख गझल. आवडली.
वाद अकारण झाला आणि खूप बोललो
वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते
खुपच छान अन सुरेख गझल. आवडली.
दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत
दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते
पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते
बहोत खुब ! बहोत खुब !!!
वाद अकारण झाला आणि खूप बोललो
वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते... मौन चिघळले होते.. वाह!
गजल सुंदरच.. आवडली!
मस्तच! आहे गझल.
मस्तच! आहे गझल.:)
अनमोल.मस्त.
अनमोल.मस्त.
ग़ज़ल अत्यंत सुंदर आहे. सर्व
ग़ज़ल अत्यंत सुंदर आहे. सर्व शे'र आवडले.
<<वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते >>
खूपच सुंदर शे'र आहे. फक्त "आणि" हा शब्द खटकला. एक मात्रा कमी पडते असे वाटते. पण अर्थ समजत असल्याने फारसा फरक पडत नाही. बाकी मात्रादोष मी तपासलेले नाहीत. जे ठळक दिसले तेवढे सांगितले.
शरद
शरदजी, मनापासून
शरदजी,
मनापासून धन्यवाद...
मात्रांत गडबड झाली होती खरी...
तात्पुरती दुरूस्ती केलीये.. पण आता मलाच हा बदल फारसा रुचलेला नाहीये..
समर्पक शब्द सापडेपर्यंत असेच ठेवेन..
चर्चा झाली बाजारी पण किंमत
चर्चा झाली बाजारी पण किंमत ठरली नाही
जेव्हा नाते अपुले तू विकण्यास काढले होते
....खरच सुंदर आवडली.....
वाद अकारण झाला आणिक खूप बोललो
वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते >>>> क्या बात है !
मस्त ... मस्त...
मस्त ... मस्त...
एका वेगळ्याच विश्वाचि सफर
एका वेगळ्याच विश्वाचि सफर घड्वलित
पुस्तक मिटण्यापूर्वी मी
पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते
चर्चा झाली बाजारी पण किंमत ठरली नाही
जेव्हा नाते अपुले तू विकण्यास काढले होते
हे शेर सुंदरच.
faar sundar gazal
faar sundar gazal
बाळू, परागकण, सुनील, सानिका,
बाळू, परागकण, सुनील, सानिका, अभिजीत, कौतुक...
धन्यवाद...
क्या बात है
क्या बात है
अर्थातच, वरील बहुतेंकाशी सहमत
अर्थातच, वरील बहुतेंकाशी सहमत - चिघळलेले मौन, शब्दांचे गाव आणि बाजार - मूल्य हे शेर दमदार.
मात्रा जमत असतीलच सगळ्या, पण लय साधण्यासाठी थोडे कष्ट पडतात. गेयता जातीये का? चांगली रचना असल्याने या गुणांची थोडी कसर जाणवली.
वाद अकारण झाला आणि खूप बोललो
वाद अकारण झाला आणि खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते>>>मौन चिघळले होते, वा!
फारच सुन्दर गजल....
धन्यवाद
धन्यवाद
क्या बात!
क्या बात!
वाद अकारण झाला आणिक खूप बोललो
वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते>>> किती सुंदर उतरलाय हा शेर... कितीदा आठवतो हा सहजच... ही माझ्या निवडक १० मध्ये ह्या शेरामुळेच आहे... शिवाय खयालांची मांडणी शब्दनिवड, अनेक शेरांत खास जमलीये...
नवीन गज़लांच्या प्रतिक्षेत...
व्वा ! मस्तच गझल. "वाद अकारण
व्वा ! मस्तच गझल.
"वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते" >>>> सर्वाधिक आवडला.
अप्रतिम जमलिये ही गझल......
अप्रतिम जमलिये ही गझल...... मौनाचा शेर तर तूफानच आहे.
जियो दोस्त...!!!!
Pages