वारली चित्र
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
31
वारली विवाहाचे चित्रण
वारली समाजात लग्नाच्या वेळी वारली स्त्रिया ह्या चित्रांनी आपल्या घराच्या भिंती सजवतात.
मध्यभागी देव चौक आहे आणि त्यात 'पालघट' देवी आहे जी लग्नात उपस्थित आहे असे ते मानतात. ती मातृदेवता तसेच प्रजोत्पत्तीची देवता म्हणून पण ओळखली जाते. धार्मिक विधीच्या पूर्तीसाठी याचे चित्रण करतात. चित्र काढताना वारली स्त्रिया या देवीची स्तुती करणारी गाणी म्हणतात. हिचे चित्र काढल्याशिवाय वारली लोकांचा लग्नविधी पुर्ण होऊ शकत नाही.
आणि डाव्या बाजूस लग्न चौक आहे आणि त्यात 'पाच शिर्या' या देवतेचे चित्र.
खाली घोड्यावर नवरा नवरी आणि आजुबाजुला बेधुंद नाचणारे वाजंत्री आणि वरात.
तसेच आजू बाजूला झाडे आणि मोर नृत्य, कर्हा घेऊन जाणार्या स्त्रिया ईत्यादी.
विषय:
प्रकार:
शेअर करा
वॉव नीलू.
वॉव नीलू.
Pages