काही हरकत नाही

Submitted by कविन on 22 June, 2009 - 00:12

त्याला कविता जमते, तिला जमत नाही
काही हरकत नाही
कविता असतेच की तिच्याही मनात!
नको तो भाग उडवुन
मुर्त रुप द्यायला त्याला जमत
तिला जमत नाही
इतकच, बाकी काहीच नाही

त्याला दगडात देव दिसतो, तिला दिसत नाही
काही हरकत नाही
देव असतोच की तिच्याही मनात!
तिला निराकारता भावते
त्याला मुर्त रुप आवडते
इतकच, बाकी काहीच नाही

तिला तो आवडतो, त्याला ती आवडते
त्यांचे नाते इतरांनाच मिसफ़िट वाटते
काही हरकत नाही
त्यांचे नाते फ़ुलतेच आहे
इतरांना ते उमगत नाही
इतकच, बाकी काहीच नाही

गुलमोहर: 

Pages