शब्दावाचून कळले सारे.. बंध मायेचे !

Submitted by रानभुली on 29 March, 2025 - 00:32

एमिली मेसन आणि झारा
ही गोष्ट नाही, तर एक हृद्य सत्यकथा आहे.
माझ्या इतर कथाही घडलेल्या घटनांवर, वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरच आधारीत असतात. कारण अनेकदा सत्य हे कल्पनेहून अद्भुत असते. पण ही ऐकीव कथा होती. या कथेचे किंवा घटनेचे किंवा बातमीचे म्हणा कुठेच पडसाद मिळत नव्हते . त्यामुळं खरंच घडलेली कथा आहे कि कसे हे कळत नव्हते. जे काही ऐकलेलं होतं ते ही थोडक्यात असंच ऐकलेलं. पण जिथून ऐकलं त्याने नावं सांगितलेली ती चांगली लक्षात राहिली होती. या नावांवरून अनेकदा सर्च देऊन झाला, पण काहीही हाती लागत नव्हतं.

अशातच मग असं वाटलं कि थोडी काल्पनिक घटनांची भर घालून कथा म्हणून लिहून काढावी, पण उत्सुकता असते ना ? म्हणून शोध चालूच होता. शिवाय घटना इतकी भावनिक करणारी आणि सिनेस्टाईल योगायोगांची होती कि तिच्यावर एव्हाना हॉलीवूड मधे सिनेमा निघाला असेल असं वाटलं. गेली सात ते आठ वर्षे शोध घेतल्यावर आज अचानक युट्यूब वर एक व्हिडीओ माझ्या पेजवर सजेशन मधे दिसला. त्या वेळी कल्पनाही नव्हती कि हीच ती घटना जिचा शोध मी इतका काळ घेतेय...

हा व्हिडीओ सापडल्यानंतर लिहून काढण्याचे कष्ट वाचले या पेक्षाही आनंद याचा झाला कि या घटनेचं ऑथेंटिकेशन झालं. ही कथा कुणा लेखकाची नाही एव्हढं तर समजलंच होतं. हा व्हॉट्स अ‍ॅप फॉरवर्ड पण असू शकत नाही कारण त्यांच्या अशा कथा लगेच ओळखू येतात.

मायबोलीकरांना ही सत्य कथा नक्कीच आवडेल. अशा प्रकारचे रेस्क्यु व्हिडीओज, कथा खूप असतात. पण हे विशेषच आहे.
माणूस आणि पशुतलं हे नातं, हे मायेचे बंध, वात्सल्य सगळं आवंढा आणणारं आहे. सोबत लिंक दिली आहे. जर नियमात बसत नसेल तर कृपया योग्य धागा कळवावा. तिथे लिंक देता येईल. त्यानंतर धागा उडवला तरी चालेल. जर नियमात बसत असेल तर अशा अनेक व्हिडीओजची लिंक कमेण्ट बॉक्समधे दिल्यास ज्यांना अशा गोष्टी आवडतात,त्यांच्या साठी सोय होईल.

https://www.youtube.com/watch?v=7Y3cVQp5Qxs

मराठीत हवं असेल तर लिहायचा विचार करता येईल. पण कुणी तरी यावर मेहनत घेऊन व्हिडीओ बनवला असल्याने ते कितपत योग्य होईल ही शंका आहे. कायदेशीर नव्हे, नैतिकदृष्टीने. यावर उपाय म्हणून कमेण्ट बॉक्स मधे बोलता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजीचं वावडं असेल ( कुणी असेल असं वाटत नाही) किंवा खरोखर समजत नसेल तर थोडक्यात सारांश.

एमिली मेसन हिचं घर एका छोट्याशा गावात आहे. आजूबाजूने जंगलाने वेढलेला परीसर असल्याने घराच्या अंगणात जंगली प्राणी येणं नेहमीचं. पण एके सकाळी एमिलीने पडदा सारून पाहिला आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दाराजवळ चक्क एक पूर्ण वाढ झालेली सिंहीण होती. तिच्याजवळ तिच बछडा ( छावा) होता. ती ना हल्ल्याच्या पवित्र्यात होती, ना गुरगुरत होती. ती फक्त शांत पणे वाट बघत होती. एमिलीने नवर्‍याला बोलावलं. दोघांनी पाहिलं. एमिलीला प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांची डोळ्यांची भाषा कळायची. त्यावरून ती सिंहीण विश्वासाने आली आहे हे कळत होतं.

तिने मग त्या पिल्लाला हात लावला. सिंहीणीने हात लावू दिला. कदाचित ती त्याचीच वाट बघत होती. त्या पिल्लाचा श्वास अनियमित चालू होता. ठोके मंद होते. तातडीने त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेस्क्यु टीमला फोन लावला. ते आले. पिल्लाला घेऊन गेले. पण सिंहीणीने काहीच केलं नाही. तिने विश्वासाने पिलू नेऊ दिलं. त्या कारचा पिच्छा केला नाही. ती फक्त घराच्या समोरच्या गवतात फतकल मारून बसली. घराकडे नजर लावून.

रात्र झाली तरी ती तिथेच बसलेली होती. निश्चल. डोळे घराकडे लागलेले. विजा चमकल्या तरी तिथेच होती.
तिकडे मेडीकल टीमला तपासणी करताना काय झालेय हे सापडले. त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. सिंहीणीने पिलू वेळेत आणलं होतं. एमिलीने त्यांना विनंती केली कि त्या बछड्याचा आवाज तुम्ही ऐकवाल का ? त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तिने मग स्पीकर्स बाहेर आणले. हिंस्त्र असलं तर मुकं जनावर ते...

तिला बछड्याचा आवाज ऐकवला आणि तिने सांगितलं कि तुझं बाळ लवकर बरं होईल. ते सुरक्षित ठिकाणी आहे.
तिने कळल्यासारखं नाक उडवलं. डोळे मिटून घेतले. प्राण्यांचे हे संकते असतात.

अचानक रेस्क्यु टीमला पिलामधे बसवलेली मायक्रोचीप आढळली. त्यावरून ते शेकडो मैल दूरवर जन्मल्याचं समजलं. आता त्यांच्या पुढे बरेच प्रश्न होते. त्याचा तपास त्यांनी रेकॉर्डवरून सुरू केला आणि त्यांना धक्काच बसला. हा धक्का ते आता एमिलीला देणार होते...
इथून पुढचं तुम्ही समजून घ्या. किंवा नंतर बोलूयात !

निशब्द ...पूर्ण व्हिडीओ नाही बघितला जे लिहिलंय ते खरं असू शकतं मध्ये एका सिंहाचाच आणि ट्रेनर की व्यक्ति ते आठवत नाही पण व्हिडीओ पाहिला होता .लहानपणी त्याचा सांभाळ करून परत त्याला थोडं मोठं झाल्यावर जंगलात सोडून दिल्यावर,पुन्हा मोठा झाल्यावरही खूप वर्षांनी तो त्याला सांभाळणारा व्यक्तीला पुन्हा ओळखतो व पूर्ण वाढ झालेला तो सिंह त्याच्याशी लहान मुलाप्रमाणे खेळतोय मस्ती करतोय.
बाकी कितीही हिंस्त्र प्राणी असला तरी वाघ सिंहाचे बछडे क्युट असतात.

केवळ व्हिडिओ बनवला म्हणून ती सत्यकथा होत नाही. माझ्या मते ही काल्पनिक कथा आहे, too good to be true.
Disclaimer वाचा.
The content in this video is intended solely for storytelling purposes, entertainment and aims to convey a positive message. Any resemblance to real events, individuals, or situations is purely coincidental and unintentional. These narratives are not intended to depict, reference, or represent any actual occurrences, persons, or entities.