Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2025 - 02:08
स्त्रीत्वाचे शीलहरण!
स्त्रियाच करिती परस्परांचे
शीलचारित्र्य हनन मस्त
मातृत्वाचे वस्त्र फाडणे
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना भान
कुस्करती मग एकमेकींचा
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी
कशी लिहावी पुढली कडवी
शब्दवीणा तर झाली विन्मुख
विन्मुखतेचे सांत्वन करण्या
अभय लेखणी यावी सन्मुख
- गंगाधर मुटे 'अभय'
=~=~=~=~=~=~=~=
एकवीस/तीन/पंचेवीस
=~=~=~=~=~=~=~=
(एक अवांतर कडवे. कवितेत सामावून घ्यायचे अथवा नाही.... यथावकाश निर्णय घेता येईल. मूळ कवितेतही काही बदल अपेक्षित आहेतच.)
(शब्द बोलले शब्दांसोबत
नसेल स्त्री ही अवश्य बहुधा
ही तर मादी, केवळ मादी
मातृत्वावर कलंक बहुधा)
=====
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा