गावं झाले रिकामे पण
पेपरात भरतात सगळे रकाने
गाई बैलांची दोरी सुटली
अन् गळ्यात अमुच्या चाडी बसली
आर्त हि अमुची हाक
कोणी ऐकेल, का होऊनी ताठ
चातकाने सोडली आता
वरुण देवाची साथ
घागर भरण्या लागतेय दिस न दीस
मुंबापुरीत दहीहंडीत बसतात कोट्याधीश
लग्न या पोशिंद्याचे ठरेल का
कोणती मुलगी हो भरेल का
भेगाळलेल्या मनात माझ्या
पाझर कधी फुटेल काय
जायकवाडीचा ऊर
भरून कधी वाहेल का
सावकारकीचा फास कधी
ढिला होईल का
बैल पोळ्याच्या सना सुदीला
राजा माझा सजल का
गुंठेवारी पाई मारताहेत
पुणे - पिंपरीत तरुण ताठ
आणि पाण्यासाठी मात्र
मराठवाड्यात उजाडताहेत दिवस सात
नव्या वाइन च्या जन्मासाठी
होतेय नाशिकात जत्रा
येथे मारतोय टँकर
पाण्यावाचून टकरा
विधवांचा आकांत हा
सरकारच्या कानी पोहोचल का
कर्ज माफीच घोंगड हे
असच भिजत पडल का
मराठवाड्याची माय पाहतेय
तीस वर्षा पासून पाऊसाची वाट
सोलापूर ही बनतोय
प्रथम दुष्काळाचा घाट
माघारीच्या पावसाने पण
फक्त केलीय निराशा
नाम` सारखे देताहेत
जीवन जगण्याची दिशा
आस
Submitted by Divekar Ramchandra on 20 March, 2025 - 02:30
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults