वाटलं नव्हतं की असही काही होईल,
वाटलं नव्हतं की मलाही प्रेम होईल..
1st yr मध्ये त्याला साधं बोलले पण नाही,
नव्हतं माहित की त्याच्या मनात आहे अस काही...
तो अचानक जवळ आला चाहूल न करता,
जेव्हा 1st yr लागले आमचे सरता...
प्रेम अचानक होत नसतं हे तेव्हा कळले .
जेव्हा मी त्याच्या प्रेमळ मनाकडे वळले..
तो सर्वांसाठी म्हणून मदतीचा हाथ देयचा ,
नकळत माझ्यासाठीच सर्व खास करायचा...
माझं सर्व काही एक तोच ऐकायचा,
मला राणी, लाडूबाई,चिमणी, सोनी म्हणायचा...
आवडायच मला त्याचं लाडूबाई म्हणणं,
आणि प्रेमात मला अशी गोड नावं देणं...
प्रेम खूप करायचा माझ्यावर,
आणि रुसून चिडायचा पण माझ्यावर..
मला परेशान करायला त्याला खूप आवडायचं,
मग मनवायचे options पण त्यानेच निवडायचं.
मी नाही बोलले तर रुसून तोच बसायचा,
आणि शेवटी प्रेमाने हट्ट पण करायचा...
तो हसायचा पण माझ्याचसाठी,
वाटतं तो आला होता माझ्याचसाठी..
त्याच्या या प्रेमळ मनावरच तर मी भाळले,
आणि स्वतःच त्या कडे वळले..
नको बोलणार्या मनाला नाकारलं,
त्याचं हे नितांत प्रेम मी स्विकारलं..
माझ्या छोट्याश्या मनात त्याने विशाल घर केलं,
भांडणं आणि खूप प्रेम पण आम्ही एकमेकांवर केलं..
असच आपलं प्रेम अखेर पर्यंत राहू दे,
पुढे आयुष्यात तुला माझी आठवण येवू दे...
माझं पहिलं प्रेम तु, ठेवेन तुला साठवून,
आता तुला स्वप्नात बघेन फक्त आठवून फक्त आठवून..
मी असंच प्रेम तुझ्यावर करत राहीन,
पुनर्जन्मी होवो माझाच तु , देवाला पुष्प वाहत राहीन..
खरच असं प्रेम मी करत राहीन मी करत राहीन...
तिचं प्रेम (मी)
Submitted by Vishal Madhav Vaidya on 17 March, 2025 - 20:44
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा