
कणकेच्या पुरणपोळ्या ...
महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळी साठीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची पोळी. आज वेळे अभावी पुरणाच्या पोळ्या बहुतेक घरात विकत आणल्या जातात. विकतच्या पोळ्या जरी चांगल्या असल्या तरी त्यात पारी साठी मैदाच वापरला जातो. कणीक वापरून केलेल्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि हरवाळ होतात. अजिबात मैदा न वापरता नुसत्या कणकेच्या पातळ, मऊ, हरवाळ पोळ्या कशा करायच्या हे होळी होऊन गेली आहे तरी इथे लिहून ठेवत आहे. पुराणावर जास्त लक्ष केंदीत न करता फोकस कणकेवर आहे.
पुरण करण्यासाठी
एक वाटी चणा डाळ , एक वाटी गुळ अथवा तुम्ही नेहमी घेता तेवढा , वेलची, जायफळ , किंचित मीठ आणि एक चमचा तेल.
पारीसाठी
वस्त्रगाळ कणीक एक वाटी , थोडं तेल आणि मीठ.
लाटण्यासाठी
तांदळाची पिठी.
एक वाटी चणा डाळ त्यात चमचाभर तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यात गुळ घालून कालथा पुरणात उभा राही पर्यंत शिजवा. त्यात चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची जायफळ घालून आणि गरम असतानाच वाटून घ्या. पुरण पूर्ण गार झाले पाहिजे पोळ्या करताना.
कणीक
१) कणीक पातेल्याला मलमल च फडक बांधून त्यावरून वस्त्रगाळ करून घ्या. म्हणजे कोंडा सगळा वर राहिल. हे वाचायला जरी कठीण, वेळखाऊ वाटत असलं तरी खूप वेळ लागत नाही त्याला. मलमल च्या कापडातून पटकन वस्त्रगाळ करून होते कणीक.
२) कणके मध्ये चवीनुसार मीठ घालून पोळ्याना भिजवतो त्या पेक्षा किंचित घट्ट कणीक भिजवा आणि तो गोळा एक फडक्यात बांधून ती पुरचुंडी पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा दोन तीन तास.
३) दोन तीन तासांनी कणकेचा गोळा पाण्याबाहेर काढून ती परातीत घेऊन थोडं तेल घालून चांगली मळून घ्या. वाटल्यास पाण्याचा हात ही लावा मळताना. पाण्यात भिजवल्यामुळे कणीक मऊ पटकन होते जास्त मळावी लागत नाही. कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टंसी सेम असायला हवी म्हणजे लाटताना पुरण विनासायास कडे पर्यंत पसरत.
४) पोळी लाटताना वरून लावायला कणीक न वापरता नेहमी तांदळाची पिठी च वापरा. त्यामुळे पोळी मस्त फिरते पोळपाटावर.
५) कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तरी पुरणाचा गोळा घ्या. वरील प्रकारे कणीक भिजवली असेल तर हे अजिबात कठीण नाही. कणीक वरील पद्धतीने भिजविली असेल तर पोळी सहज लाटता येते अजिबात फुटत नाही मैदा नसला तरी.
इतकी पातळ लाटली आहे की फडक्याच डिझाइन दिसत आहे.
६) पोळपाटाला मलमल किंवा सुती फडकं बांधा व त्यावर poli लाटा . त्याने पोळी पोळपाटाला चिकटत नाही अजिबात. फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो. तसेच बटर पेपर सकट उचलून तव्यावर टाकता येते पोळी हा बटर पेपरचा आणखी एक फायदा. जे सोयीचं वाटेल ते घ्या पण डायरेक्ट पोळपाटावर पोळी कधी लाटू नका.
७) लागेल तशी पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटा. आणि अलगद पणे तव्यावर टाकून मध्यम गॅस वर पोळी भाजून घ्या. मस्त मऊ, हरवाळ स्वादिष्ट पोळ्या तयार होतात.
बदामी रंगाच्या स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार
१) वस्त्रगाळ कणीक च घ्याची आहे पण हे तुम्ही चार दिवस आधी ही करू शकता. पुरण ही दोन दिवस आधी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी ताण येणार नाही.
२) पाण्यात भिजवल्यामुळे कणीक एकदम मऊ होते, जास्त मळावी लागत नाही आणि तेल ही जास्त घालावे लागत नाही मैद्यात घालावे लागते तसे.
मी पण ममो रेसिपीने पुपो
मी पण ममो रेसिपीने पुपो केल्या गेल्या रविवारी. कणीक अगदी नीट चाळून तार वगैरे येईल इतपत भिजवली. लाटताना शक्य तितक्या नाजूक लाटलं वगैरे सगळं केलं. पुपो चवीला चांगल्याच झाल्या पण खूप नाजूक व्हायला अजूनही हात बसायची गरज आहे. परत अगदी दोन चारच करुन बघायचा विचार आहे.
आम्ही चुकून कोकणाची पुरणपोळी
आम्ही चुकून कोकणाची पुरणपोळी समजून ह्यो काय प्रकार म्हणुन धागा उघडला बगा.
काय दिसतीया पुरणपोळी.
गुण हाय तुमच्या हातास्नी ताई!
इकतची आम्ही नाई खाऊ शकत, नाई खाऊ शकत.
धन्यवाद सर्वांना..
धन्यवाद सर्वांना..
इथे हेमाताईंच्या नावासकट ही रेसिपी दिली आहे. तुम्ही पाहिलंय का हेमाताई? मी कमेंट पण लिहिली आहे पूर्व परवानगीबाबत. >> पाहिलं प्रज्ञा.. पण तुझी कमेंट मात्र नाही दिसली.
पूर्व परवानगी वगैरे घेतलेली नाही अजिबातच पण नावासकट शेअर केली आहे हे तरी काय कमी आहे ? असो.
साधना छान लिहिलं आहेस. पातळ पूपो तव्यावर टाकणं कठीणच असतं त्यासाठी ती लाटण्यावर घेऊन टाकावी किंवा बटर पेपर वर लाटावी आणि बटर पेपर सकट उचलून तव्यावर घालावी. एक बाजू भाजली गेली की मगच उलटावी म्हणजे जरा फर्म होते.
सायो धन्यवाद... सराव पाहिजेच, शल्य व्यापात तोच कमी पडतो.
निळू भाऊ धन्यवाद... कोकणाची पू पो
Pages