रात्रीचा प्रवास करून आपण पहाटे ५ च्या सुमारास एखाद्या "हब" विमानतळावर उतरलोय. झोप नीट झालेली नाही पण आता उडाली आहे. बराचसा प्रवास झालेला आहे आणि आता एक छोटी फ्लाइट घेतली, की घरी. अशा वेळेस मधे जर २-३ तासाचा वेळ असेल तर तो एरव्ही कंटाळवाणा होतो. पण पहाटे सगळे उघडायच्या आसपास जर पोहोचलो तर तो वेळ फार छान असतो. अनेकदा विमानप्रवास करणार्यांना प्रवासातील बहुतांश गोष्टींचे काही अप्रूप राहिलेले नसते पण या पहाटेच्या लेओव्हरचे मला कायम आकर्षण आहे, विशेषतः घरी येउन मग आराम असेल तर.
आधी उतरताना सगळीकडे अंधार असतो. विमानतळावर बाहेरची विमानांची ये-जा सोडली तर सगळे शांत असते. बाहेरचे काही दिसत नसते. आत लोकांची लगबगही फार नसते. आता वेळ काढायचाच आहे तर कोठेतरी चांगला चहा शोधून एखाद्या वेटिंग एरियात बसायचे व लॅपटॉप उघडून जे काही इंटरेस्टिंग वाटेल त्यात डोके खुपसायचे - बहुतांश मायबोलीच हा एक माझा नेहमीचा आवडीचा उद्योग आहे. आपला "एक्स्ट्रॉ हॉट"पणा अजून राखून असलेला चहा आणि माबोवर काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला. पूर्ण हरवून टाकणारे चित्र.
मग थोड्या वेळात कोठेतरी एखाद्या स्टॉलचे शटर उघडते, स्टारबक्स किंवा इतर कॅफेसमोर गर्दी दिसू लागते. ब्रेकफास्ट वाली रेस्टॉरण्ट्स व फास्ट फूड दुकाने उघडू लागतात. विमानतळावरचे कर्मचारी येजा करताना दिसू लागतात. इतका वेळ अंधार असलेल्या मोठ्या काचांबाहेर फटफटू लागते, आणि हळुहळू ते आतले व बाहेरचे विश्व जिवंत होते! आपण कोणत्या दिशेला बसलो आहोत यावरून सुद्धा यात खूप फरक पडतो. पूर्वेकडे खिडकी असेल अगदी तांबडे फुटण्यापासून ते सूर्योदयापर्यंत सगळे बघायला फार सुरेख असते. तुम्ही निसर्गात रमणारे असाल किंवा नसाल तरी अशा वेळेस तेथील बाकीच्या सगळ्या कृत्रिम यांत्रिक दुनियेतून वाट काढून निसर्ग आपले लक्ष खेचून घेतोच.
हा काही वर्षांपूर्वी मुंबईहून १४ तासांच्या फ्लाइटने आल्यावर नुवर्क विमानतळावरचा सूर्योदयाच्या थोडे आधी काढलेला.
परवाही मिनिअॅपोलिसला पहाटे पोहोचल्यावर एका ठिकाणी बसून लॅपटॉपमधे घुसणार, इतक्यात मला समोर सगळीकडे असलेले स्नो चे जाडजूड कव्हर व अधूनमधून गेट वर लागणारी/निघणारी विमाने हे दृश्य इतके एंगेजिंग वाटले, की मी बराच वेळ चहा वगैरे घेत ते नुसते बघत बसलो. मी माबोच काय पण कामाच्या बाबतीतही एरव्ही अॅडिक्ट आहे. पण त्या वेळेस मला बराच वेळ लॅपटॉप उघडावासाही वाटला नाही. तसेच डोक्याला एंगेज न करता नुसते शांत बसण्याचे फायदेही मला तेव्हा नव्याने लक्षात आले कामासंबंधी व इतरही - अनेक कल्पना सुचायला डोके मुळात रिकामे असावे लागते. आजकाल कॉम्प्युटर, टीव्ही किंवा मोबाईल यात सतत काही ना काही बघत राहायची सवय लागली आहे. त्यामुळे नुसते कशाबद्दल विचार करणेच कमी झाले आहे. बर्याचदा चालायला जाण्यामागे हाच विचार असतो, पण समोरच्या एखाद्या मोठ्या प्रचंड कॅनव्हाससारख्या दृष्यासमोर शांत बसणे हे त्यापेक्षाही काहीतरी भारी, वेगळे वाटते.
मिनिअॅपोलिस
अशा वेळेस कित्येक वेळा मी यात हरवून चांगला २-३ तास लेओव्हर असूनही पुढची फ्लाइट धावतपळत पकडली आहे!
कृत्रिम यांत्रिक दुनियेतून
कृत्रिम यांत्रिक दुनियेतून वाट काढून निसर्ग आपले लक्ष खेचून घेतोच
अनेक कल्पना सुचायला डोके मुळात रिकामे असावे लागते
>>> छान.
असा अवचित दिसणारा निसर्ग मोहून टाकतो
मस्त.
मस्त.
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर बसून दिसणारी पहाट ही कल्पना एकदम आवडली >>> +१
लेख आवडला. फार लवकर आटपला
लेख आवडला. फार लवकर आटपला असं वाटलं.
फारेण्डना निसर्गाबद्दल लिहावंसं वाटलं यात या उपक्रमाचं यश आहे.
< लॅपटॉप उघडून जे काही इंटरेस्टिंग वाटेल त्यात डोके खुपसायचे - बहुतांश मायबोलीच Happy हा एक माझा नेहमीचा आवडीचा उद्योग आहे. > माझ्या मनात तुमची प्रतिमा अशीच तयार झाली आहे, हे , हे वाक्य वाचताना लक्षात आलं. जरा कुठे वेळ मिळाला की मायबोली, फ्रेंड्स ,अमिताभ , चित्रपट इ. चा व्यासंग करीत असता असेच वाटते. याबाबत नेमक्या वेळेला नेमके दाखले आठवण्याच्या तुमच्या शक्तीचंही कौतुक करून घेतो.
भरत,
भरत,
तुमच्या वरच्या आख्ख्या पोस्टीला अनुमोदन.
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर बसून दिसणारी पहाट ही कल्पना एकदम आवडली >>> +१
फारेण्डना निसर्गाबद्दल लिहावंसं वाटलं यात या उपक्रमाचं यश आहे. >>> ह्यालाही +१
मला वाटलं विमानतळावरील निर्सग म्हणजे सिंगापोर एअरपोटवरच्या ऑर्किड गार्डन वगैरे विषयी असेल, पण हा विषय वेगळा निघाला एकदम.
Pages