रात्रीचा प्रवास करून आपण पहाटे ५ च्या सुमारास एखाद्या "हब" विमानतळावर उतरलोय. झोप नीट झालेली नाही पण आता उडाली आहे. बराचसा प्रवास झालेला आहे आणि आता एक छोटी फ्लाइट घेतली, की घरी. अशा वेळेस मधे जर २-३ तासाचा वेळ असेल तर तो एरव्ही कंटाळवाणा होतो. पण पहाटे सगळे उघडायच्या आसपास जर पोहोचलो तर तो वेळ फार छान असतो. अनेकदा विमानप्रवास करणार्यांना प्रवासातील बहुतांश गोष्टींचे काही अप्रूप राहिलेले नसते पण या पहाटेच्या लेओव्हरचे मला कायम आकर्षण आहे, विशेषतः घरी येउन मग आराम असेल तर.
आधी उतरताना सगळीकडे अंधार असतो. विमानतळावर बाहेरची विमानांची ये-जा सोडली तर सगळे शांत असते. बाहेरचे काही दिसत नसते. आत लोकांची लगबगही फार नसते. आता वेळ काढायचाच आहे तर कोठेतरी चांगला चहा शोधून एखाद्या वेटिंग एरियात बसायचे व लॅपटॉप उघडून जे काही इंटरेस्टिंग वाटेल त्यात डोके खुपसायचे - बहुतांश मायबोलीच हा एक माझा नेहमीचा आवडीचा उद्योग आहे. आपला "एक्स्ट्रॉ हॉट"पणा अजून राखून असलेला चहा आणि माबोवर काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला. पूर्ण हरवून टाकणारे चित्र.
मग थोड्या वेळात कोठेतरी एखाद्या स्टॉलचे शटर उघडते, स्टारबक्स किंवा इतर कॅफेसमोर गर्दी दिसू लागते. ब्रेकफास्ट वाली रेस्टॉरण्ट्स व फास्ट फूड दुकाने उघडू लागतात. विमानतळावरचे कर्मचारी येजा करताना दिसू लागतात. इतका वेळ अंधार असलेल्या मोठ्या काचांबाहेर फटफटू लागते, आणि हळुहळू ते आतले व बाहेरचे विश्व जिवंत होते! आपण कोणत्या दिशेला बसलो आहोत यावरून सुद्धा यात खूप फरक पडतो. पूर्वेकडे खिडकी असेल अगदी तांबडे फुटण्यापासून ते सूर्योदयापर्यंत सगळे बघायला फार सुरेख असते. तुम्ही निसर्गात रमणारे असाल किंवा नसाल तरी अशा वेळेस तेथील बाकीच्या सगळ्या कृत्रिम यांत्रिक दुनियेतून वाट काढून निसर्ग आपले लक्ष खेचून घेतोच.
हा काही वर्षांपूर्वी मुंबईहून १४ तासांच्या फ्लाइटने आल्यावर नुवर्क विमानतळावरचा सूर्योदयाच्या थोडे आधी काढलेला.
परवाही मिनिअॅपोलिसला पहाटे पोहोचल्यावर एका ठिकाणी बसून लॅपटॉपमधे घुसणार, इतक्यात मला समोर सगळीकडे असलेले स्नो चे जाडजूड कव्हर व अधूनमधून गेट वर लागणारी/निघणारी विमाने हे दृश्य इतके एंगेजिंग वाटले, की मी बराच वेळ चहा वगैरे घेत ते नुसते बघत बसलो. मी माबोच काय पण कामाच्या बाबतीतही एरव्ही अॅडिक्ट आहे. पण त्या वेळेस मला बराच वेळ लॅपटॉप उघडावासाही वाटला नाही. तसेच डोक्याला एंगेज न करता नुसते शांत बसण्याचे फायदेही मला तेव्हा नव्याने लक्षात आले कामासंबंधी व इतरही - अनेक कल्पना सुचायला डोके मुळात रिकामे असावे लागते. आजकाल कॉम्प्युटर, टीव्ही किंवा मोबाईल यात सतत काही ना काही बघत राहायची सवय लागली आहे. त्यामुळे नुसते कशाबद्दल विचार करणेच कमी झाले आहे. बर्याचदा चालायला जाण्यामागे हाच विचार असतो, पण समोरच्या एखाद्या मोठ्या प्रचंड कॅनव्हाससारख्या दृष्यासमोर शांत बसणे हे त्यापेक्षाही काहीतरी भारी, वेगळे वाटते.
मिनिअॅपोलिस
अशा वेळेस कित्येक वेळा मी यात हरवून चांगला २-३ तास लेओव्हर असूनही पुढची फ्लाइट धावतपळत पकडली आहे!
छान लिहील आहे. शेवट अजून थोडा
छान लिहील आहे. शेवट अजून थोडा वेगळा करता आला असता का?
व्वा छान लिहिलं आहे.
व्वा छान लिहिलं आहे.
मला विमानातून दिसणारा सूर्योदय किंवा सूर्यास्त पहायला फार आवडतं. असो.
छान.लिहिले आहे.
छान.लिहिले आहे.
कृत्रिम यांत्रिक दुनियेतून वाट काढून निसर्ग आपले लक्ष खेचून घेतोच >> +७८६
हा अनुभव संध्याकाळी ऑफिस कॅन्टीनमध्ये गेल्यावर सुद्धा येतो.. दोन बाजूनी पूर्ण काचेच्या भिंती असूनही दिवसा कधीही कॅन्टीनमध्ये जा, खिडकीबाहेर जराही लक्ष जात नाही. पण संध्याकाळी मावळतीचा सूर्य जेव्हा समोर येतो तेव्हा तो कॅनव्हास वेगळाच भासतो. काय खायला आलो आहे हे विसरून मी थोडावेळ उगाचच त्या सूर्याला आणि सभोवतालच्या उजळून निघालेल्या परिसराला एकदा न्याहाळून घेतो.
विमानतळावर बसून हा लेख वाचते
विमानतळावर बसून हा लेख वाचते आहे. निसर्गायण उपक्रमात विमानतळावर बसून दिसणारी पहाट ही कल्पना एकदम आवडली. मला एवढ्यात झुरिक एयरपोर्टवर अशी अनपेक्षित निवांत सकाळ हाती मिळाली होती.
फा,
फा,
छान लिहिलं आहे.
विमानतळावर पहाटेचा ले ओव्हर कधी अनुभवला नाही. पण, पहाटे उतरून प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग, वातावरण यात होणारा बदल पाहणे आवडते.
समोरच्या एखाद्या मोठ्या प्रचंड कॅनव्हाससारख्या दृष्यासमोर शांत बसणे हे त्यापेक्षाही काहीतरी भारी, वेगळे वाटते.>>>> अगदी अगदी.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
समोरच्या एखाद्या मोठ्या प्रचंड कॅनव्हाससारख्या दृष्यासमोर शांत बसणे हे त्यापेक्षाही काहीतरी भारी, वेगळे वाटते.>>>+1
खूप सुंदर लिहिले आहे.
खूप सुंदर लिहिले आहे.
विशेषतः, मोठ्या विमान प्रवासानंतर, थकलेल्या तनामनाने, बाहेरची पहाट अनुभवायला फारच संवेदनशील मन लागते.. जे अर्थात आहेच तुझ्याकडे!
निसर्गावर ठराविक विषयापेक्षा
निसर्गावर ठराविक विषयापेक्षा एकदम वेगळा विषय. लेख आवडला.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
आजकाल कॉम्प्युटर, टीव्ही किंवा मोबाईल यात सतत काही ना काही बघत राहायची सवय लागली आहे. त्यामुळे नुसते कशाबद्दल विचार करणेच कमी झाले आहे. >> अगदी अगदी.
भारी आवडला हा लेख
भारी आवडला हा लेख
ट्रॅक्विलिटी पोहोचली
फारेन्ड तुम्ही माझ्यासारखे
फारेन्ड तुम्ही माझ्यासारखे अर्ली बर्ड दिसता. सकाळची लगबग , कॉफी घेत घेत निवांतपणे पहाणे हे माझ्याकरता स्वर्गसुख आहे.
शब्दचित्र फार आवडले.
तुम्ही निसर्गात रमणारे असाल
तुम्ही निसर्गात रमणारे असाल किंवा नसाल तरी अशा वेळेस तेथील बाकीच्या सगळ्या कृत्रिम यांत्रिक दुनियेतून वाट काढून निसर्ग आपले लक्ष खेचून घेतोच.
आवडले. आगळेवेगळे निसर्गायण आहे. इतर लेखांमधे निसर्गात गेल्यावरची अनुभूती आहे, इथे शहरी जीवनात निसर्गाने दिलेल्या अवचित भेटीची.
एखाद्या मोठ्या प्रचंड कॅनव्हाससारख्या दृष्यासमोर शांत बसणे हे त्यापेक्षाही काहीतरी भारी, वेगळे वाटते. >>>
अनेक कल्पना सुचायला डोके मुळात रिकामे असावे लागते. >>> याचे दोन परस्परविरोधी अर्थ लावून हसून घेतले. जास्त सुचणंही काही कामाचं नाही एकंदरीत.
मस्तच लिहिलं आहेस.
मस्तच लिहिलं आहेस.
>>> निसर्गायण उपक्रमात विमानतळावर बसून दिसणारी पहाट ही कल्पना एकदम आवडली
अनुमोदन!
इस्पितळं, विमानतळांसारख्या ठिकाणांचा एक स्वतंत्र स्थलकालअवकाश असतो असं मला अनेकदा वाटतं - अगदी तिथून परतल्यावर 'जेट लॅग' जाणवावा इतका!
तू नेमकं वर्णन केलं आहेस!
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
तर हो तसंच आहे. 
आधी विमानतळावरचा निसर्ग, हिरवळ, गारवा बद्दल आहे का काय वाटलं.
अशी अडनिड्यावेळी शिकागो, वॉशिग्टन, डिट्रॉईट मध्ये पहाट अनुभवली आहे. विमानतळावर वेळ काढायला फार आवडतो. लॉंग लेओव्हर ही आवडतात, गर्दीतर आवडतेच.
अनेक कल्पना सुचायला डोके
अनेक कल्पना सुचायला डोके मुळात रिकामे असावे लागते. >>> अगदी अगदी. अस्मिता म्हणते आहे तो दुसरा अर्थ न घेता तुला अपेक्षित अर्थ घेऊन ' बरोबर आहे ' असं म्हणतेय.
लेख आवडला, फा! या निमित्ताने आत्तापर्यंत अनुभवलेले सगळे एअरपोर्ट सूर्योदय आठवले
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
एअरपोर्टवर बर्याचदा गडबड असते किंवा खरं तर आपण गडबडीमधे असतो. पण असे निवांत क्षण मिळाले की छान वाटतं..
माझाही असाच एक एअरपोर्ट वरचा निवांत क्षण..
आणि नेमकं जरा वेळातच दिसायला लागलेलं इंद्रधनुष्य म्हणून घेतलेला क्लोजअप..
मस्त लिहिलं आहे. पहिला फोटो
मस्त लिहिलं आहे. पहिला फोटो छान आहे. अगदी सकाळी लवकरच फ्लाईट असेल तर असं दृश्य बघायला मिळतं.
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर दिसणारी पहाट ही कल्पना फार आवडली. 👌
लेखाचा शेवट abrupt वाटला.
फार गजबज आवडत नसल्याने अशी पहाट आवडते. उडत्या विमानातून दिसणारे सूर्योदय / रात्रीचे आकाश / टेकऑफ आणि लँडिंगला ख़ाली दिसणारी चमचमती शहरे … फार आकर्षण आहे सर्वांचे.
Red Eye Flights बद्दल अजिबात तक्रार नसणारा माणूस आहे मी
खुप छान लेख...
खुप छान लेख...
मस्त लिहिलंय! वेगळंच
मस्त लिहिलंय! वेगळंच निसर्गायण.
दुसऱ्या फोटो मधील हि यूएफओ
दुसऱ्या फोटो मधील हि यूएफओ मस्त आहे

छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
शक्यतो आता ट्रिप/टुर संपून घरी जाणार आहोत उबदार आपल्या माणसात असे असेल तर हा आनंद अधिक वाटतो.
रेड आय्ज मी अवॉय्ड करतो.
रेड आय्ज मी अवॉय्ड करतो. त्यामुळे सूर्योदय्/सूर्यास्त नाहि पण हा एक कोझी दुपारचा टिपलेला क्षण...
छान लिहिले आहेस
छान लिहिले आहेस
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
आम्ही एकदाच असा पहाटेचा प्रवास केलाय, १४ वर्षांपूर्वी, पण तेव्हा ऑलरेडी ३० तास प्रवासात घालवल्यामुळे शेवटचे दिल्ली-मुंबई फ्लाईट आणि मुंबई-पुणे कॅब असे ६ तास प्रचंड थकलो होतो! रात्र की पहाट तेसुद्धा कळायच्या पलिकडचं होतं आमचं थकणं!
पुन्हा संधी मिळाली पहाटेच्या विमान प्रवासाची, तर हे नक्की आठवेल.
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर
निसर्गायण उपक्रमात विमानतळावर दिसणारी पहाट ही कल्पना फार आवडली.
छान लिहिलंय..
धन्यवाद लोकहो. लिहायला फार
धन्यवाद लोकहो. लिहायला फार काही सुचत नव्हते व डेडलाइन जवळ आली होती. त्यामुळे उगाच न वाढवता जितके सुचले तितके लिहीले. पण त्रोटक असल्याने हे निसर्गाबद्दलच आहे हे त्यातून पोहोचेल की नाही शंका होती. असेही वाटले की यात फुले, फळे, बालकवी, महानोर ई नसल्याने संपादक मंडळ "यात निसर्ग कोठे आहे" म्हणून तु.क. टाकून हा फार फार तर नेहमीच्या माबोत टाका म्हणून सुचवतील (हा विनोद लेखाच्या अगम्यतेबद्दल आहे, संपादकांबद्दल नाही
) 
शेवट अॅब्रप्ट वाटला किंवा लेखच त्रोटक वाटला त्याचे कारण उरलेल्या वेळात आणखी लिहायला सुचले नाही इतके सोपे आहे. पण विमानतळावरच्या यांत्रिक व कृत्रिम विश्वातूनही निसर्ग आपले लक्ष वेधून घेतो हा गाभा पोहोचला, हे वाचून छान वाटले. बाकी विमानतळावरचा स्वतंत्र स्थलकालअवकाश, विमानातून दिसणारे आकाश, ऑफिसमधूनही लक्ष वेधून घेणारा सूर्यास्त वगैरे बद्दल सहमत आहे.
रिकामे डोके चा अर्थ असा माझ्या डोक्यात आलाच नव्हता
संवेदनशील मन ला कसचं कसचं इतकेच म्हणतो
आणि "अर्ली बर्ड"ला तर डबल कसचं कसचं
कारण मी अजिबात अर्ली बर्ड नाही. किंबहुना त्यामुळेच या पहाटेचे अप्रूप जास्त आहे.
इतरांचे फोटोही आवडले. युएफओही भारी
अ'निरू'द्ध - कोणत्या विमानतळावरचा आहे? मधे काच दिसत नाही.
राज - पुण्टा केना? एअरपोर्ट हॉटेल आहे का? मधेच स्विमिंग पूल दिसतोय त्यावरून शंका आली.
सर्वांचे आभार!
Chhan लिहिले आहे.
Chhan लिहिले आहे.
सतत काही ना काही बघत राहायची सवय लागली आहे. त्यामुळे नुसते कशाबद्दल विचार करणेच कमी झाले आहे........ आवडलं.
अ'निरू'द्ध - कोणत्या
अ'निरू'द्ध - कोणत्या विमानतळावरचा आहे? मधे काच दिसत नाही. <<
बंगलोर एअरपोर्ट.. काच आहे. स्वच्छही होती आणि ढगाळ वातावरण किंवा प्रकाशाची दिशा यामुळे Reflections जामवत नसतील.
>>पुण्टा केना? एअरपोर्ट हॉटेल
>>पुण्टा केना? एअरपोर्ट हॉटेल आहे का?<<
हो. हॉटेल नाहि, एयरपोर्ट लाउंज...
Pages