Submitted by कविन on 22 February, 2025 - 11:08
“अरे हाssड!” चार वेळा हाकलूनही कुत्री त्यांच्या पायापाशी घोटाळत राहिली. "भूक्कड साSSली", त्याने शिवी हासडत पेकाटात लाथ घातली.
एका हाताने कम्मोला जवळ ओढत दुसऱ्या हातात अर्धवट खाल्लेला तुकडा धरत त्याने विचारलं “द्यायचा का तीला?”
खुरटलेल्या दाढीवर चिकटलेला रस्सा, कमी ओंगळवाणा वाटत होता आत्ता त्याच्या नजरेतल्या भावापुढे. अंग आकसून घेत ती मागे झाली.
“तिच्यायला! माज आला काय?” परत जवळ ओढून घेत, पकड घट्ट करत तो भेसूर हसला.
त्याचं हसणं, हाताचं रुतणं सगळ्याची घृणा वाटून तिथून सरळ घरी पळून जावं वाटलं तिला. पण समोर कुत्रीला लुचणारी पिल्लं बघून पाय चिकटले तिचे आणि हातातल्या बिर्याणीच्या पार्सलवरची पकड तेव्हढी घट्ट केली तिने; परत एकदा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त लिहिल आहे.
जबरदस्त लिहिल आहे.
छान लिहिलंय ❤️
छान लिहिलंय ❤️
सप्पकन वार करणारं लिहिलंस
सप्पकन वार करणारं लिहिलंस
मस्त लिहिलंयस गं . भिडलंच .
मस्त लिहिलंयस गं . भिडलंच .
सप्पकन वार करणारं लिहिलंस >>>
सप्पकन वार करणारं लिहिलंस >>>> +१
जबरदस्त!
जबरदस्त!
जबरदस्त! > +१
जबरदस्त! > +१
जबरदस्त! > +१
जबरदस्त! > +१
परिणामकारक शशक.
परिणामकारक शशक.
कडक !
कडक !
जबरदस्त +1
जबरदस्त +1
>>>>>>सप्पकन वार करणारं
>>>>>>सप्पकन वार करणारं लिहिलंस
+१०१
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
जबरदस्त लिहलेय.
जबरदस्त लिहलेय.
भारी!
भारी!
जबरदस्त लिहिलीय.
जबरदस्त लिहिलीय.
जबरदस्त!
जबरदस्त!
सप्पकन वार करणारं लिहिलंस>>> +1