पुणे गटग - १६ फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजता

Submitted by पियू on 13 February, 2025 - 13:29

१६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता पासून पुढे पुणेकरांचे गटग वाळवेकर गार्डन, वाळवेकर नगर येथे करायचे ठरवले आहे. डॉक्टर कुमार यांची उपस्थिती या गटग ला असणार आहे.

तरी सर्वांनी आपली हजेरी लावावी होsss.

https://g.co/kgs/TH6R7dc

सध्या बागेचे मुख्य प्रवेशद्वार बांधकामामुळे बंद असून बाजूच्या छोट्या दाराने आत शिरायचे आहे.

आत शिरल्यानंतर उजव्या हाताला दिसतो तो पहिला पॅगोडा आपल्याला गप्पाटप्पा आणि बसण्यासाठी धरायचा आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fomo खराच ! पण मला तर व्हिडिओ कॉल पण जमणार नव्हता म्हणून तसं काही म्हणाले नाही. तुम्ही निरोप घेतलाय तेव्हा इथले पहाटेचे ५.५४ झालेले दिसतायत.

छान वृ . अजून काही गमतीजमती असतील तर त्या पण येऊद्या.

व्हिडिओ कॉल संदर्भात माझी आणि अतुल ह्यांची थोडक्यात मेसेज चुकामुक झाली.
प्रत्यक्ष नाही तर किमान online तरी हजेरी लावणार होतो.
थोडक्यात चुकले.
बहुतेक प्रत्यक्ष भेटच होणार आहे म्हणून ही चुकामुक झाली Lol

छान gtg आणि वृत्तांत
पशुपात पुण्यात आहेत हे नव्हते माहीत.

कुमार सरांबरोबर अभ्यासू गप्पा, पशुपत यांच्या आयडीमागची कहाणी (गाणं पेंडिंग ठेवूया), अतुल यांचा शांत संयमी सहभाग, पियूबरोबर धमाल गप्पा आणि (शांत रहायला मला जमत नसल्यामुळे) माझी चालू असलेली टकळी अशी मज्जा केली आम्ही. अजून सविस्तर जमलं तर उद्या दुपारनंतर लिहिते.

मी पुढाकार घेऊन आयोजित केलेले गटग शेवटी माझ्याशिवाय होते की काय एवढी विघ्ने बॅक टू बॅक येत होती. पण थॅन्क्स टू कुमार सर आणि अतुलदा.. मोठ्या मनाने त्यांनी मला झालेला उशीर खपवून घेतला.

पोचल्या पोचल्याच अतुलदा आणि कुमार सर यांच्या वन टू वन गप्पा झाल्यात असे लक्षात आल्याने मी माझ्या आवडत्या कुमार सरांचा ताबा घेतला. आपापले कार्यक्षेत्र, आत्तापर्यंतचा प्रवास, मागच्या गटगला उपस्थित असलेल्या लोकांची आठवण काढत थोड्या गप्पा करून आम्ही एका हॉटेलकडे आमचा मोर्चा वळवला.

तिकडे पोहचेतो पशुपत यांची एन्ट्री झाली. त्यांच्या गप्पातून त्यांच्यातील कलाकार आणि कामावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाची ओळख झाली.

हॉटेलमध्ये वेटरला भरपूर कन्फ्युज करणाऱ्या यात साखर नको, त्यात बर्फ नको, यात साखर घालाच, यात बर्फ घालाच अशा ऑर्डर देऊन त्यांचा अल्गोरीदम बिघडेल (हा खास प्रज्ञा९ यांची उपमा) याची तरतूद करून आम्ही गप्पांकडे मोर्चा वळवला.

तेवढ्यात प्रज्ञा९ यांची एन्ट्री झाली. प्रज्ञा सर्वच विषयांवर सर्वच व्यक्तींशी इतकं भरभरून बोलत होती की हिच्यासोबत गप्पांसाठी एक सेप्रेट मिनी गटग करायचेच असे मी मनाशी ठरवून टाकले.

मग गप्पांची गाडी जी सुसाट सुटली ती मायबोली, मराठी लेखन, AI, रोबोटिक सर्जरी, संगीत, रिदम, pathology, ९ ते ५ नोकरी, लष्कराच्या भाकऱ्या, प्रज्ञा९ यांच्या मुलीचा जन्म, विद्या निकेतन शाळा, अजय गल्लेवाले, काही नवे आणि काही जुने धागापाडू मायबोलीकर, जुजा मायबोलीकर, राजकारणाचा ग्रुप, अमेरिकास्थित मायबोलीकर, अमेरिकेवर मराठीचे वर्चस्व, ट्रम्प, स्पीच टू टेक्स्ट टायपिंग वगैरे अशी वाट्टेल ती स्टेशने घेत सुसाट सुटली होती.

अचानक पशुपत यांना निघावे लागले तर त्यांच्यासोबत आम्ही सारेच वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडलो. शेवटी अतुलदा यांच्याशी वर्क लाईफ बॅलन्स या विषयावर गहन चर्चा चालू असताना त्यांना घ्यायला त्यांचे कुटुंबीय आले आणि आम्ही सारेच अतिशय तृप्त मनाने एकमेकांचा निरोप घेतला.

माझ्या अपघात आणि इतर कोंडी झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मला या गटगची सर्वात जास्त गरज होती हे खरे तर गटग संपल्यावर लक्षात आले आणि मी ती संधी सोडली नाही या समाधानाने आनंदात घरी परतले.

बरी झाली आहे चर्चा. चार पाच लोकांतच गप्पा चांगल्या रंगतात. खूप लोक जमले तरीही चिठ्ठ्या टाकून गट करावेत आणि जे आपल्या गटाला वाटून आलेत त्यांच्याशी बोलावे. सर्वांना संधी मिळते. अन्यथा एकच बोलतो आणि बाकीचे ऐकत बसतात. प्रयोग करून पाहिला हवेत.

अरे हो.. मायबोलीवर येऊन २० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ हॉटेल पार्टी डॉक्टर कुमार यांच्याकडून स्पॉन्सर्ड होती (आधी माहित असते तर घरून न जेवता निघाले असते Lol ).

खूप लोक जमले तरीही चिठ्ठ्या टाकून गट करावेत आणि जे आपल्या गटाला वाटून आलेत त्यांच्याशी बोलावे.

>> मला एकदम zoom मीटिंग मध्ये डिस्कशन रूम्स का काय ऑप्शन असतो त्याची आठवण झाली. तिथे असे मीटिंग मध्ये १०० लोक असले तरी मध्येच ४ ५ लोकांचा ग्रुप करून तिथे डिस्कशन करायला काहीतरी topic देतात.

कालच्या माझ्या सहकाऱ्यांनी वर झकास वृत्तांत लिहिलेलाच असल्याने तसे आता काही वेगळे सांगण्यासारखे नाही. तरीसुद्धा वृ लिहिल्याखेरीज माबो गटगची ‘हाजरी’ मांडत नसल्यामुळे ही थोडीफार खरड.

  • कालची गणसंख्या पाच- उत्तम ! त्यामुळे प्रत्येकाला अन्य प्रत्येकाबद्दल नीट जाणून घेता आले आणि विपु पण उत्तम झाली. गेल्या मुंबई गटगपासून माझे आता पाच या अंकावर अगदी प्रेम बसले आहे Happy
  • पहिल्या तासात अतुल यांच्याशी मनमोकळ्या पोटभर गप्पा आणि इतरांची प्रतीक्षा. मग पियूचे दमदार आगमन.
  • नंतर हॉटेलकडे कूच. प्रज्ञा९ यांची प्रथमच भेट आणि आनंद. बाकीच्यांचा गतवर्षी परिचय होताच; तो वृद्धिंगत झाला.
  • पुण्यातील पाण्याच्या दर्जापासून ते थेट ‘भविष्यात यंत्रमानव जगाचा कारभार कसा काय चालवतील’, इथपर्यंत रंगलेली गप्पांची व्याप्ती.
  • गप्पांच्या ओघात माबोचा पंचनामा अपरिहार्य ! दिवसाला किती धागे काढणे इष्ट असते या सनातन मुद्यावर नेहमीप्रमाणेच खल. अमेरिकेत जन्मलेल्या आणि आता जागतिक झालेल्या माबोमध्ये आज नक्की कोणत्या गावकऱ्यांचे बहुमत आहे, यावर बरीच चर्चा होऊनही एकमत होऊ शकले नाही.
  • आपापले व्यावसायिक अनुभव आणि इतर छंद, आवडी यावरही कुतूहलजनक चर्चा
  • . . .

    अशा तऱ्हेने हे गटग सुफळ संपूर्ण. सर्व सहभागींना धन्यवाद !

* विद्या निकेतन >>> नाही. हे विद्या विकास विद्यालय हवे.

पियू,
हरकत नाही, पुढचे ग ट ग उपाशीपोटी करण्यात येईल Happy

वृत्तांत वाचायच्या आधी धूर वाला फोटो पाहिला आणि वाटले छान हुक्का पार्टी रंगलेली दिसतेय Proud

छान झाला गटग.. अजून तासभर थांबला असता तर अजून एक दोन जण वाढले असते Wink

छान झाले गटग . अचानक येणाऱ्या पाहुण्यांनी वेळ न पाळल्याने इच्छा असूनही हजर राहता आले नाही .

विद्या निकेतन >>> नाही. हे विद्या विकास विद्यालय हवे.

>> हो हो. विद्या विकास विद्यालय. आता संपादनाची वेळ गेली.

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

पियू छान वृत्तांत. पियूसारख्या मल्टीटॅलेंटेड व्यक्तीने माझा आधी बहुवचनी उल्लेख केलेला बघून घाबरले मी! न्यूमरॉलोजी, कंपनी लॉ, आयपी लॉ असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे पियू. (मला वैद्यकीय आणि वकिली क्षेत्रातल्या सगळ्यांबद्दल कमालीचा आदर वाटतो)) सगळ्यांनी इतकं छान लिहिलंय त्यामुळे आता मी काही लिहीत नाही. अशीच अजून गटग होत राहोत! Happy

झकास पंचम गटग!
आणि सगळ्यांचे वृत्तांत आणि "शाम हैं धुवां धुवां" ह्या गाण्याची आठवण करून देणारा फोटोही झकासच!

Pages