हाईट डेफिशिएंसी सिंड्रोम

Submitted by तुषार जोशी on 12 February, 2025 - 01:29

त्या देशातली सगळी माणसे
पाच फुटाहून उंच होती
किती तरी पिढ्या त्यांची उंची
पाच फूट किंवा अधिक होती
एकदा तिथे एक माणूस
चार फुटाहून उंच होईच ना
त्या देशात त्या माणसाला
ना वाहन चालवता येई
ना मोठ्यांच्या खूर्चीत बसता येई
ना मोठ्या माणसांच्या साठी तयार झालेली
उपकरणे वापरता येत
डॉक्टरांनी त्याचे निदान करून त्याला
हाईट डेफिशिएंसी सिंड्रोम
असल्याचे निदान केले
तो एक बेकार उत्पादन होता
नाॅर्मल नव्हता कारण
नाॅर्मल म्हणजे पाच फुटाहून उंच
या कमतरतेमुळे त्याला
त्या देशात समानता
आणि सन्मानपूर्वक वागणूक नव्हती
त्याचा वेगळेपणा ही त्याची
कमतरता आणि त्याची चूक
ठरवण्यात आली कारण
ते सहज करता येत होते
त्याच्या साठी तो देश
काय काय बदल करणार नाही का?
सगळे काही पाच फुटाच्या
माणसांसाठीच तयार केलेले होते
म्हणून चूक त्याचीच नाही का?

तुष्की नागपुरी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली कविता. खूप deep आहे.अनेक प्रसंगात जोडून पाहता आली.
आणि कमीच उंची कश्याला? एखाद्या अल्पसंख्यांक माणूस जास्त उंचीचा.. जास्त बलवान.. जास्त सरस असता तरी त्याला डिफेक्टिक ठरवले असते मेजॉरीटीने.

अवांतर : आता 'ऑ' हा स्वर मराठीने पण स्वीकारला आहे. तरी तुमच्या लिखाणात ' नॉर्मल ' हा शब्द ' नार्मल ' असा लिहीलाय. मागच्या सुद्धा एक दोन लेखात हाच प्रॉब्लेम बघितला. तुम्ही मराठी ऐवजी हिंदी कीबोर्ड वापरताय का देवनागरीत लिहिण्यासाठी??

गहन.

धन्यवाद @पियू, @रानभुली, ऑर्किड

@पियू – टायपो राहिला होता आता संपादित केलाय धन्यवाद.
मेंदूभिन्नता या विषयावर सूचक भाष्य करणारे लिखाण यातली खोच अनुभवली आहे त्यांना अधिक जवळून स्पर्ष करेल याची जाणीव आहे. आपल्याला भिन्नता म्हणजे दोष नव्हे इतके जरी पटले तरीही आपल्या आसपासच्या आणि आपल्या प्रभावक्षेत्रात तरी आपण काही सकारात्मक बदल घडवू शकतो.