खूप कठीण निर्णय होता हा. पण काय करणार?
हो ना. शेवटी आपलीच मुलगी ती. तिचं मन, तिची इच्छा सर्वात महत्वाची.
खरं आहे. एका मर्यादेपलीकडे आपण काही करू शकत नाही.
आता आई वडील म्हणून आपण जितकं सांगायचं, समजवायचं ते सगळं केलं. काही कमी केलं का आपण? पण काय उपयोग झाला?
आपले प्रयत्न कमी नाही पडले. पण तिचीच आतून तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय. तिचा ठाम विश्वास होता की ती चुकीच्या शरीरात आहे आणि तिला त्याच्यात कैदेत पडल्यासारखं वाटतंय.
आणि म्हणूनच आपण शेवटी त्याला मान्यता दिली ना. ती म्हणाली होती की मुलीचं शरीर तिला जखडून ठेवतंय. तिचं स्वप्न, तिचं ध्येय ती मुलगा बनूनच पूर्ण करू शकेल.
तेच ते. शेवटी तिचा कल महत्वाचा.
हो. म्हणूनच मग समाज काय म्हणेल त्याची पर्वा आपण केली नाही.
आणि आज आपल्या मुलीचं एका मुलामधे यशस्वीपणे परिवर्तन झालं आहे.
हूं. आणि आपल्याला लक्षातच येत नाहीये की आपल्याला आता एक मुलगा आहे, मुलगी नाही. आपण अजूनही त्याचा उल्लेख 'ती' असाच करतोय.
तोंडात बसलंय ना ते. जिभेचं वळण लगेच कसं बदलणार? पण प्रयत्न करू संबोधन बदलायचा. 'ती' चा 'तो'.
अवघड आहे. पण जमेल हळूहळू. त्यालाही 'ती' म्हटलेलं नाही आवडणार.
संबोधनाबरोबर आता नावही बदलायला हवं ना? आणि आता लोकांना तसं सांगायलाही हवं. आता लपवू तर शकत नाही.
खरं आहे. आणि हो, नाव बदलायलाच हवं. काय ठेवूया नवीन नाव?
अगदी नवीन नको. आधीचंच नाव थोडं बदलूया. शिखंडीनीचं शिखंडी करूया. पांचालनगरीत आजच दवंडी पिटवायला सांगतो की प्रजेने राजकुमार शिखंडीला योग्य मान द्यावा.
जबरदस्त! शेवटची कलाटणी खासच!
जबरदस्त! शेवटची कलाटणी खासच!
मला सुरुवातीला लव्ह मॅरेज
मला सुरुवातीला लव्ह मॅरेज विषयी बोलत आहेत असं वाटलं.
कथा छान आहे पण मी शिखंडीबद्दल
कथा छान आहे पण मी शिखंडीबद्दल कन्फ्युज आहे. जुन्या महाभारतात शिखंडी तॄतियपंथी दाखवला आहे तर नविन महाभारतात ती स्त्री शिखंडीनी दाखवली आहे. ( माझ ज्ञान जी काही २-४ पुस्तके वाचली असतील आणि या टीव्ही मालिकांपासून मिळालेलं)
तर मी शिखंडीबद्दल काही वाचले नाहीये. म्हणजे अंबा पुनर्जन्म घेते हे माहित आहे इतर डिटेल माहित नाहीत.
कॄपया कोणितरी जाणकारांनी शिखंडी वर एक लेख लिहला तर माझ्या ज्ञानात भर पडेल. :स्मितः इंटरनेटवर माहिती मिळेल पण माबोकरांकडून मिळालेली माहिती जास्त विश्वासार्ह असेल.