"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला!" ही बातमी आणि त्यावरील प्रतिक्रियांचा पूर बघून मन अगदी उचंबळून आलं.
मीही मग प्रेमभराने लगेच लाभले आम्हास भाग्य, गर्जा महाराष्ट्र (original) अशी पूर्ण playlist ऐकली . तशी ती एरव्ही वर्षातून एकदा मी एकतेच.. म भा गौ दि ला, अहो म्हणजे मराठी लँग्वेज डे ला. यानिमित्तानं यावर्षी दोनदा ऐकली गेली.
"अमृतातेहि पैजा जिंके... " असं सुमारे आठेकशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ज्ञानोबांच्या मराठीला अखेर सरकार दरबारी शिक्का मिळाला.
आता जगभरातील मराठीजन आनंदोत्सव साजरा करतील... एखादं संमेलन वगैरे...
लगेच चित्रच तरळल डोळ्यांसमोर.
***
आमंत्रण पत्रिका…
“ऑन धीस स्पेशल ऑकेजन all the मराठी मंडळास outside of India are planning to celebrate our Marathi culture..
Awaken that मराठी माणूस hidden inside you and be a part of this global celebration!
It will be a three days convention, you can attend it from any corner of the world, there will be dazzling performances by local artists, मराठी celebrities, sportstars, and singers.
We will be procuring रेडी टु वेअर nine-yards सरीस and फेटा ज.
Hurry up and register today.
First 500 entries can win complimentary नथ!
There will be raffle to win भरजरी मोराची पैठणी.
Our beloved traditional wear!
If you are a proud मराठी माणूस be a part of this global Marathi convention!!
***
थोड संयोजकांच्या खोलीत डोकावाल तर..
Marathi Celebrities म्हणजे ते रे आपले हे. अरे नो नो
No boring discussions or interviews , or writers etc.
ते साहित्य वगैरे काही फारस चालत नाही.. कोण वाचत आजकाल.??
३० सेकंदाचे रीलस् बनवा, influencers ना बोलवा, सध्या कोण हिट आहे ते बघा...
ते मराठी बिराठी होत राहील रे... लाभले आम्हांस भाग्य वाजवू ना आपण..
अपने को चमकना मंगता है.. क्या !
अरे महित्ये रे ते हिंदी थोड घातलं.. it's okay थोड inclusive वाटायला नको का?
अभिजात दर्जा वगैरे सगळ एकदम मान्य ... त्याचंच तर celebration करतोय ना..
दर्जा एका साइडला पण तिकीटबारीवर काय खपतयं... ते पण बघा की हो.
शेवटी मराठीला अभिजात दर्जा मिळाल्या साठीचं ग्लोबल संमेलन वाजण महत्वाचं...
आवाज वाढवं DJ तुला… **
_______________
गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिही.. (असा मी असामी )
मग नाईलाजाने लिहून काढले (जमेल तसे… )
खूप फनी राईट केलयं.
खूप फनी राईट केलयं.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खूप फनी राईट केलयं. Lol
खूप फनी राईट केलयं. Lol
नवीन Submitted by माबो वाचक >> बरीच सगळी गंमत जंमत च बघायला मिळतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अधून मधून शिवाजी महाराज की जय
अधून मधून शिवाजी महाराज की जय म्हणून ओरडायचे, सारखं महाराज महाराज करायचे.
बाप्पा बाप्पा, आमचा बाप्पा, बाप्पा गेल्यावर डोळ्यात पाणि वगैरे लाडात येऊन बोलायचे. आणि कोणताही कार्यक्रम असो, नउवारी नेसून / सलवार कुर्ते घालून, फेटे बांधून ताशा आणि ढोल कान फुटेपर्यंत बडवायचे!
उशा मंगेशकर असो की कृष्णा कल्ले, लताचा आवाज काय स्वर्गीय म्हणायचे.
आणि चुकून पुस्तक वगैरे दिसले किंवा साहित्याचा वगैरे विषय निघाला की काय ते एक लेखक आणि त्यांच्या कॅसेटी - सॉरी- पुस्तके वाचलेली असली की मराठीचे प्रेम सफळ संपूर्ण!
काय ते एक लेखक आणि त्यांच्या
काय ते एक लेखक आणि त्यांच्या कॅसेटी >>> तुझे आवडते लेखक का रे?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'काय ते एकेक लेखक' असं
'काय ते एकेक लेखक' असं म्हणायचं असेल त्याला. एकावरच प्रेम करुन कसं चालेल?
साजिरा
साजिरा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
टवणे सर, सत्यवचन.
टवणे सर, सत्यवचन.
टवणे सर वैतागलेले दिसताय.
टवणे सर
वैतागलेले दिसताय.
आज मला वात्रटपणा करावासा वाटतोय - ढोलाला कान कुठे असतात?
साजिरा, मराठीवर प्रेम आहे, हे सिद्ध करायला एक लेखक पुरेसा आहे.
त्या तिकडे लिहिताय ते वाचतोय. त्यांना तर हा लेखकसुद्धा लागत नाही.
इथलं एक निरीक्षण - आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालायचं आणि मराठी शाळा बंद पडताहेत याबद्दल सद्गदित व्हायचं.
त्यांना तर हा लेखकसुद्धा लागत
त्यांना तर हा लेखकसुद्धा लागत नाही
>> या गोष्टीचं फार नवल वाटतं. भाषेवर प्रेम आहे, किंवा मातृभाषेचा अभिमान आहे असं म्हणणार्यांनी एका तरी त्या भाषेवर प्रभुत्वाने लिहिणार्याचं वाचलं पाहिजे की नाही? प्रेम असण्याच्या किमान निकषांंमध्ये हे बसत नाही का? खुद्द माझ्या घरात ही परिस्थिती आहे. माझे दोन्ही भाऊ महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या जुन्या वगैरे मेडिकल कॉलेजांतून डॉक्टर झाले आहेत. त्यांनीही सो-़कॉल्ड कॅसेटवाले लेखक वाचलेले नाहीत. बोलताना अवचित एखादा कमी वापरात असलेला मराठी शब्द आला तर ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात. पेपरात, गप्पांत भाषेचा विषय आला, की मग मात्र मुसलमान, नॉर्थ इंडियन भय्ये यांना शिव्या देण्यात हे सगळ्यांत पुढे असतात.
हे चित्र खरं तर सार्वत्रिक आहे. मायबोलीवरच्या मुठभरांना भाषा आली (खरंतर तीही नीट येत नाही, असं माझं मत आहे, पण असो), म्हणजे भाषा सुरक्षित होऊन तिचा राज्याभिषेक झाला असं होत नाही.
मायबोलीवर तर जास्त अपेक्षा आहेत. इथल्या एका सुप्रसिद्ध लेखकाने काही वर्षांपुर्वी 'कोसला काय भानगड आहे' असं बिनदिक्कत विचारलं होतं. हे इथं वाचक नसून लेखक आहेत हे लक्षात घ्या. 'कोसला वाचलं नाही, वाचणारही नाही' हे एकवेळ ठीक होतं.
अहो, बँकेतल्या त्या खिडकीवर
अहो, बँकेतल्या त्या खिडकीवर ' निवृत्तीनाथ ' असं लिहिलं होतं म्हणून पेन्शन न घेताच परत आलात ?![20190123_093534 (1).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/20190123_093534%20%281%29.jpg)
साजिरा, मराठी भाषा दिन कधी
साजिरा, मराठी भाषा दिन कधी असतो, हे माहीत नसलं तरी काही बिघडत नाही, असं मी याच मायबोलीवर वाचलं होतं. ते बरोबरच आहे म्हणा. तुमचं तुमच्या आईवर प्रेम असलं म्हणजे तिचा वाढदिवस माहीत असलाच पाहिजे असं काही नाही ना!
मातृभाषेचा अभिमान आहे असं
मातृभाषेचा अभिमान आहे असं म्हणणार्यांनी एका तरी त्या भाषेवर प्रभुत्वाने लिहिणार्याचं वाचलं पाहिजे की नाही?
>>>>>>>
माझे उत्तर - असे काही गरजेचे नाही.
का ते सविस्तर नंतर एकत्रच लिहितो.
त्याआधी ''भाषेवर प्रेम आहे,"
त्याआधी ''भाषेवर प्रेम आहे," असंही आहे. तोच सारा विषय चाललेला आहे.
कशाचाही 'अभिमान', अस्मिता वगैरे असलेल्याने आपल्यांत काहीच न करायची पद्धत आहे.
आता ते एडिट करायचा कंटाळा आला.
*त्या भाषेवर प्रभुत्वाने
*त्या भाषेवर प्रभुत्वाने लिहिणार्याचं वाचलं पाहिजे की नाही?* - मला वाटतं मातृभाषेवर प्रेम असण्यासाठी हे तितकंस आवश्यक नाही, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मिरवायचं असेल, तर मात्र हे अत्यावश्यक असावं !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्याआधी ''भाषेवर प्रेम आहे,"
त्याआधी ''भाषेवर प्रेम आहे," असंही आहे.
>>>
हो तरीही ते गरजेचे नाही
किंबहुना अभिमान मिरवणारे असतील त्यांना गरजेचे.. प्रेम असेल तर गरजेचे नाही.
मुळात प्रेम ही संकल्पनाच समजण्यात बरेचदा गल्लत होते. भाषेवर चे असेच नाही तर कुठल्याही वस्तू व्यक्ती वरचे.. पण ते एक असो. इथे भाषे वरचे प्रेमं यावर फोकस करूया
वाचायचं कशाला? कुणी खरंच
वाचायचं कशाला? कुणी खरंच चांगलं लेखन केलं असेल तर त्यावर आधारित चित्रपट निघतो. तो बघायचा.
*त्यावर आधारित चित्रपट निघतो.
*त्यावर आधारित चित्रपट निघतो. तो बघायचा.* -![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
1) वाईट लिहिलेल्यावर काढलेल्या वाईट सिनेमांच्या गर्दीत असा चित्रपट हुडकणार कसा ?
2) चांगल्या लिखणावरचा सिनेमा चांगला असेल याची गॅरंटी काय ? उदा., भन्साळीने काढलेला ' देवदास ' !