'द लायब्ररी'- पुस्तक परिचय

Submitted by संप्रति१ on 3 January, 2025 - 03:33

इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत.

परिचय क्र. १ (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) :

तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्तक हातात घ्यायचं जीवावर येत असेल किंवा पुस्तक बघताच अंगावर काटा येत असेल. पण तरीही कधीकधी पुस्तकांबद्दल कुतूहल वाटत असेल, तर खास तुमच्यासाठी‌ हे पुस्तक आहे-- झोरान झिवकोविचचं 'द लायब्ररी'.! अलीकडेच नीतीन रिंढे या व्यासंगी व्यक्तीनं हे मराठीत भाषांतरित केलं आहे.

छोटेखानी पुस्तक आहे, शंभरेक पानांचं. याचा आकार अगदी तळहाताच्या पंजात मावेल एवढा आटोपशीर आहे. यात वाचनासंबंधी सहा छोट्या-छोट्या कथा आहेत, ज्या अद्भुत आणि धमाल आहेत. वाचताना मौज येते. भाषा अगदी सोपी सुंदर सुटसुटीत आहे. नवीन वर्षात वाचनाची सुरूवात करायची असेल तर हे अगदी परफेक्ट पुस्तक आहे.

फक्त एवढंच करावं लागेल की हे पुस्तक मिळवावं लागेल आणि सरळ पहिल्या कथेपासून वाचायला सुरुवात करावी लागेल.‌ बाकीचे सगळे बहाणे बाजूला ठेवून, मनाचा निश्चय करून हे एवढं एक पुस्तक जरी वाचलंत तरी वाचनाची मौज काय असते, याची झलक मिळेल. कळेल की पुस्तकांपासून मिळणारा आनंद हा जगातल्या इतर कुठल्याही आनंदाहून जास्त मंगलदायी असतो, असं काही लोक का म्हणतात ते !!

आणि एक गुड न्यूज म्हणजे हे पुस्तक वाचून संपवायला फक्त दोन-अडीच तास पुरेसे आहेत.! आयुष्यातले दोन-अडीच तास कुणीही नक्कीच काढू शकतं. एवढंही काही कुणी बिझी नसतं.!

परिचय क्र. २ (वाचणाऱ्यांसाठी) :
पुस्तकप्रेमी असाल तर तुमच्यासाठी यात निव्वळ आत्मप्रत्ययाचं सुख वाट बघत आहे.‌ पुस्तकं-वाचन अशा एकजिनसी सूत्रात गुंफलेल्या सहा कथा आहेत. या सर्व कथांमध्ये जादूई वास्तववाद रचलेला आहे.

'आभासी ग्रंथालय' या कथेत अशा एका रहस्यमयी वेबसाईटची कल्पना रंगवलेली आहे की ज्यावर भविष्यातील सर्व संभाव्य पुस्तकं आधीच प्रकाशित केलेली दिसतात.

'घरातलं ग्रंथालय' या कथेतल्या एका माणसाच्या पत्रपेटीत आपोआपच ग्रंथ येऊन प्रकट होत राहतात, ते साठवता साठवता त्याला बूड टेकायलाही जागा उरत नाही.

'रात्र-ग्रंथालय' या कथेत रात्रीच्या वेळी आत्म्यांच्या ग्रंथ-संग्रहात रूपांतरित होणारं ग्रंथालय आहे.

'नरकातलं ग्रंथालय' ही कथा अजिबात न वाचणाऱ्या माणसांना मृत्यूनंतर काय मजेशीर शिक्षा दिली जाते, यावर आहे.

'लघुत्तम ग्रंथालय' म्हणजे फक्त एकाच पुस्तकाची लायब्ररी. आणि हे जादूई पुस्तक सतत वेगवेगळ्या पुस्तकांची रूपं धारण करत असतं.

'घरंदाज ग्रंथालय' या कथेत फक्त आणि फक्त हार्ड बाउंड पुस्तकंच आवडणारा एक विक्षिप्त ग्रंथ संग्राहक आहे. आणि त्याच्या संग्रहात जेव्हा एक पेपरबॅक येऊन पडतं, तेव्हा त्या घुसखोर पुस्तकापासून तो स्वतःची सुटका कशी करून घेतो याची मिश्किल कहाणी आहे.

या एकूणच पुस्तकात काही आदरणीय पुस्तकविके, मुरलेले ग्रंथपाल, चॅप्टर लेखक, तसेच acquired taste विकसित झालेले चक्रम वाचक भेटू शकतात. त्यांचे एकेक नखरे पाहून ओठांची एक कड मुडपत सुरु झालेलं स्माईल हळूहळू सूक्ष्म गुदगुल्यांमध्ये रूपांतरित होत राहतं. जरूर वाचून पहा.‌ आणि जेव्हा कधी वाचाल, तेव्हा वाचून झाल्यावर मला औपचारिक 'थॅंक यू' नाही म्हटलं तरी चालेल.‌ मी काय ते समजून घेईन! Wink

IMG_20250102_175928~2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे! सहीये!
झोरान झिवकोविचचं नाव ऐकलंय.
पुस्तक विशलिस्टला टाकलंय. मूळ इंग्रजी पुस्तकच वाचणार जमल्यास.

८००!!
पुस्तकावर २६० किंमत आहे.‌ मी दुकानातून घेतलं, डिस्काउंट पकडून २४० ला पडलं.

मराठी वाचक fantasy कथा वाचतात हे वाचून मी खुर्चीवरून कोलमोडलोच.
Zoran zivkovic, you lucky! Lol Light 1

Dreams, time-travel, reincarnation, storytelling: these are the building blocks of Živković’s stories. He forces us to think deeply about the act of writing and creation, and how the line between “reality” on the page and off is just a hazy shadow, and maybe only exists because we will it to. If these stories sound very “Borgesian,” then I’ve managed to convey their unique strangeness to you. And now to untwist my brain…

==-नेट वरून.
Dreams, time-travel, reincarnation, storytelling ह्या ह्या ह्या ह्या .....अप टू infinity.
प्रेम, प्रेमभंग, विभासं, रेप. incest, अश्रू, दुर्दैवाचे दशावतार नाही मग कसे होणार?

रेव्यु जरुर वाचा व इथे आपले मत लिहा Happy ८०० तर ८०० हो. मिळाले हे खूप आहे. पुस्तकाचे मोल नसते.
लगेच मागवलत - तुम्ही खरे वाचनवेडे.

fantasy ला आमच्या जगात जगण्यात अजिबात थारा नसतो.

काही बाळं तर वाटीत नाणं घालून आवाज केलेला ऐकला तरच खुदुखुदु हसतात. सोपा खुळखुळा आणि खेळणी.

>>>>>>सोपा खुळखुळा आणि खेळणी.
अरे हे लक्षात आले नव्हते. तसेही कित्येक वर्षात कोणत्याच बाळाशी खेळलेच नाहीये.

खर तर the library हे the impossible stories ह्या पुस्तकात समाविष्ट आहेत.
ह्या पुस्तकाबद्दल fantastic fiction ह्या साईट वरचा रिव्यू आपण इथे वाचू शकता.
https://www.fantasticfiction.com/z/zoran-zivkovic/impossible-stories.htm

छान लिहिलेय, जमल्यास मिळवून वाचेन. हल्ली मला पुस्तकच वाचावेसे वाटत नाही , तुम्ही दोनअडीच तासात संपवता येईल म्हटल्याने मोह होतोय. थँक्यू म्हणणार नाही ठरल्याप्रमाणे. Happy

>>>पुस्तकावर २६० किंमत आहे.‌ मी दुकानातून घेतलं, डिस्काउंट पकडून २४० ला पडलं.>>>
कोणत्या गावात? कोणते दुकान... पुढे उपयोगी पडेल

इंग्रजी नाही, मराठी अनुवादाबद्दल च म्हणतोय.
मराठी पुस्तकाची छापील किंमत २६० आहे.
ॲमेझॉन वाल्यांचे डिलीव्हरी चार्जेस फारच जास्त आहेत बहुधा.

वाल्डन बूक स्टोअर नावाने प्रामुख्याने फेसबुकवर पुस्तक विक्री करणार्‍या पुस्तकप्रेमी चमूने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी या बरोबर हरमन हेस्से चे एक पुस्तक व एक चिनी लेखकाचे पुस्तकही या वर्षी अनुवादित/प्रकाशित केले आहे.

पुस्तक परिचय मस्तच!

उत्सुकता म्हणून चेक केलं तर मला २६०/- रू दिसत आहे.
१ च प्रत शिल्लक आहे पण.

Screenshot_2025-01-06-19-33-56-04_fd1e8ef594b195c55a3bba4818d0ce35.jpg

अजून एकाकडून ह चांगला अभिप्राय मिळाला. Good Reada वर खूप जास्त चांगले (४+) रेटिंग नाही ... ह्याचे आश्चर्य वाटले.
वाचनालयात हे पुस्तक नाही ही अजूनच आश्चर्याची गोष्ट वाटली.

या पुस्तकाचे (वॉल्डन पब्लिकेशनचे) प्रकाशक अभिषेक धनगर यांच्या फेसबुक पोस्टची लिंक. (आणि पोस्टमध्ये केलेला मायबोलीवरच्या या परिचय धाग्याचा उल्लेख) :

https://www.facebook.com/100002253633780/posts/pfbid031Gg27mvq45P7yuTVER...