Submitted by धनि on 27 October, 2024 - 21:00
सध्या माबोवर आणि सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरू आहे. लोकांना पिटीएसडी देणे, आपल्या पाककौशल्याने जळवणे जोरात आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन या कवितेचे विडंबन - मूळ कविता : https://www.maayboli.com/node/85886 .
ही कविता कुण्या एका कविताच्या नवर्याने केलेली आहे अशी कल्पना करून वाचा
धान्ये आणि मसाले, भाजून छान झाले
खमंग भाजणी ही, घेते दळून कविता
उंडे तयार झाले, सोर्या भरून झाला
चकल्याही खुसखुशीत, घेते तळून कविता
मेवा न् खोबर्याचे, सजले सुरेख सारण
मऊ पीठ करंज्यांचे, घेते मळून कविता
साजुक तुपावरी या भाजून बेसनाला
मिठ्ठास गोड लाडू, घेते वळून कविता
अलवार पाकळ्यांचे नाजुकसे चिरोटे
पाकात केशरी या, घेते घोळून कविता
घालून फोडणीही झाला तयार चिवडा
दाणे नि खोबरेही, घे मिसळून कविता
झाला फराळ सज्ज, दरवळे हा सुवास
खाण्या न देत मजला, घेते छळून कविता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच ...
मस्तच ...
पुणेकर "फराळ करायला या" म्हणतात म्हणजे फराळ खायला की बनवायला या म्हणतात काही कळतच नाही.
छान
छान
सुगरण आहे कविता!
सुगरण आहे कविता!
अरे का मला कामाला लावताय
अरे का मला कामाला लावताय
सुगृहिणी पदाचा हव्यास ना मनाला,
ऑर्डर सुगरणीला, देते अता कविता
उगाच व्याप सारे काहून वाढवावे?
हुकमी पदार्थ तेव्हढा, करते अता कविता
चितळे नि पणशिकरचा व्यवसाय वाढ होतो
त्यांच्या यशात वाटा, घेते अता कविता
विडंबन मस्त आहेच आणि कविनने
विडंबन मस्त आहेच आणि कविनने चार चाँद लगा दिये. मस्त गं कविन!
धन्यवाद दत्तात्रय साळुंके.
धन्यवाद दत्तात्रय साळुंके. आता पुणेकर मुंबईकर की नागपूरकर हा गहन प्रश्न पुलं पण सोडवू शकले नाहीत तिथे आपण काय बोलावे
धन्यवाद पिनी आणि युवी
धन्यवाद पिनी आणि युवी
कविन भारीच जमले आहे तुला.
कविन भारीच जमले आहे तुला. फराळ नाही केलास तरी गरमागरम कविता नक्की करता येतील.
यावेळेस दिवाळी पहाट कार्यक्रम करणार की काय ?
सही आहे. भन्नाट एकदम.
सही आहे. भन्नाट एकदम.
अरे का मला कामाला लावताय >>> हाहाहा.
कवे तुझ्या नावाचा जप केला बघ, वाचता वाचता.
तुझीही कविता भन्नाट आहे.
कविता, कवितांचा नवरा आणि कविन
कविता, कवितांचा नवरा आणि कविन सगळेच
मस्त आहे विडंबन, आणि कविनची अ
मस्त आहे विडंबन, आणि कविनची अॅडिशनही
अरे एकदम मस्त जमले आहे.
अरे एकदम मस्त जमले आहे.
कविन च्या अॅडिशन्सही मस्त आहेत.
विडंबन धमाल जमलंय. कविनच्या
विडंबन धमाल जमलंय. कविनच्या ओळीपण एकदम मस्त.
मूळातली दळणारी कविता, इथली छळणारी कविता आणि ऑर्डर देणारी कविता.. तीनही भारी.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु, मामी सगळ्यांना धन्यवाद
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
.
अन्जू, ऋन्मेऽऽष , फा, विकु,
मालक, एकदा सेव्ह दाबल्यावर इतके प्रतिसाद कसे काय तयार झाले? डिलीट करता आले तर बघा
>>>>एकदा सेव्ह दाबल्यावर इतके
>>>>एकदा सेव्ह दाबल्यावर इतके प्रतिसाद कसे काय तयार झाले?..>>>
आभासी फराळ आहे त्यामुळे कंजूसी नाही. भरपेट खा. तृप्तीचा ढेकर द्या.
आवडली
आवडली
आभासी फराळ आहे>>
आभासी फराळ आहे>>
धन्यवाद हर्पा
मस्त आहे.
मस्त आहे.
मूळ कवितेचे विडंबन ही छान
मूळ कवितेचे विडंबन ही छान जमलेयं ..!
खुसखुशीत आणि खमंग !
खुसखुशीत आणि खमंग !
Pages