( घेते दळून कविता )

Submitted by धनि on 27 October, 2024 - 21:00

सध्या माबोवर आणि सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरू आहे. लोकांना पिटीएसडी देणे, आपल्या पाककौशल्याने जळवणे जोरात आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन या कवितेचे विडंबन - मूळ कविता : https://www.maayboli.com/node/85886 .
ही कविता कुण्या एका कविताच्या नवर्‍याने केलेली आहे अशी कल्पना करून वाचा Proud

धान्ये आणि मसाले, भाजून छान झाले
खमंग भाजणी ही, घेते दळून कविता

उंडे तयार झाले, सोर्‍या भरून झाला
चकल्याही खुसखुशीत, घेते तळून कविता

मेवा न् खोबर्‍याचे, सजले सुरेख सारण
मऊ पीठ करंज्यांचे, घेते मळून कविता

साजुक तुपावरी या भाजून बेसनाला
मिठ्ठास गोड लाडू, घेते वळून कविता

अलवार पाकळ्यांचे नाजुकसे चिरोटे
पाकात केशरी या, घेते घोळून कविता

घालून फोडणीही झाला तयार चिवडा
दाणे नि खोबरेही, घे मिसळून कविता

झाला फराळ सज्ज, दरवळे हा सुवास
खाण्या न देत मजला, घेते छळून कविता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ...
पुणेकर "फराळ करायला या" म्हणतात म्हणजे फराळ खायला की बनवायला या म्हणतात काही कळतच नाही.

अरे का मला कामाला लावताय Lol

सुगृहिणी पदाचा हव्यास ना मनाला,
ऑर्डर सुगरणीला, देते अता कविता

उगाच व्याप सारे काहून वाढवावे?
हुकमी पदार्थ तेव्हढा, करते अता कविता

चितळे नि पणशिकरचा व्यवसाय वाढ होतो
त्यांच्या यशात वाटा, घेते अता कविता

Lol

धन्यवाद दत्तात्रय साळुंके. आता पुणेकर मुंबईकर की नागपूरकर हा गहन प्रश्न पुलं पण सोडवू शकले नाहीत तिथे आपण काय बोलावे Lol

कविन भारीच जमले आहे तुला. फराळ नाही केलास तरी गरमागरम कविता नक्की करता येतील.

यावेळेस दिवाळी पहाट कार्यक्रम करणार की काय ? Happy

सही आहे. भन्नाट एकदम.

अरे का मला कामाला लावताय >>> हाहाहा.

कवे तुझ्या नावाचा जप केला बघ, वाचता वाचता.

तुझीही कविता भन्नाट आहे.

विडंबन धमाल जमलंय. कविनच्या ओळीपण एकदम मस्त. Lol

मूळातली दळणारी कविता, इथली छळणारी कविता आणि ऑर्डर देणारी कविता.. तीनही भारी.

>>>>एकदा सेव्ह दाबल्यावर इतके प्रतिसाद कसे काय तयार झाले?..>>>
आभासी फराळ आहे त्यामुळे कंजूसी नाही. भरपेट खा. तृप्तीचा ढेकर द्या. Happy

Pages