माबोवरील दिवाळीच्या धाग्यावरील जुन्या प्रतिसादात भर घालून नवा स्वतंत्र लेख लिहून मैत्रीण या संकेतस्थळावर दिला होता. आज अचानक आठवण आली व विरंगुळा व्हावा म्हणून येथेही आणला. हा प्रतिसाद काही जणांनी वाचला असेल.
एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात.
----------------
आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित....
एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.
फराळाचा PTSD कसा द्यायचा?
1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची.
उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट.
2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं.
3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची.
उदा. भाजलेले पोहे-शेंगदाणे , परात, झाऱ्या, चकलीपात्र-सोऱ्या, धुतलेले डबे.
4. तो घरात असताना फोनवर इतरांना 'बाई गं ,फराळ बनवायला घेणारे, ठेवते आता ', व 'आमच्याकडे विकतचं चालतं पण मलाच पटत नाही ' इ ठेवणीतली आणि इतरांना निगुतीने संसार करतेय असं भासवणारी वाक्यं म्हणत रहायची.
5. फराळ सुट्टीच्या दिवशीच करायचा. लक्षात ठेवा - सप्राईज वगैरे द्यायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाही. गेले ते दिवस. वास्तवात या.
6. जास्तीत जास्त गर्दा करायचा, अमेरिकेत असाल तर 'लॉन मो' करताना खिडकीतून/भारतात असाल तर माळा आवरायला लावताना सांगत रहायचं की 'आता तू गराज/पसारा आवर/ दिव्यांच्या माळांचा गुंता काढ/आकाशकंदिलासाठी एक्स्टेंशन केबल शोधून काढ/ वॅक्यूम कर /झाडून काढ/ मुलांना आण/सोड. मला तर फराळ बनवायला घ्यायचा.
7. त्या दिवशी पसारा करून, घरच्यांना डिस्पोजेबलमधे उभ्याने खायला द्यायचं. घरच्यांकडून भांडी घासून घ्यायची.
8. दुसऱ्या दिवशी 'तळणाच्या वासानं डोकं उठलं , आज तुम्ही सबवे खा' म्हणायचं.
9. थोडं निवांत बसलं की उठवायचं. Repeat as needed.
10. या खोलीतून त्या खोलीत पाय वाजवत येरझाऱ्या घालून लगबग दाखवायची.
11. एवढं करूनही काही गोष्टी घरच्या तर काही बाहेरच्या आणायच्या.
12. मी गृहकृत्यदक्ष म्हणून एवढं तरी केले, आजकाल तर कुणी एवढंही करत नाही म्हणत रहायचं. Repeat as needed.
13. यापैकी कुठलीही वाक्यं फराळाचा आनंद घेऊन मिटक्या मारण्याच्या बेसावध क्षणी इतरांवर सुदर्शनचक्रासारखी 'सहज' फेकायची. किती तडजोड करतोय हे दाखवून द्यायचं.
***फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे.
दिवाळी आली तर फटाके नकोत का, म्हणून हा PTSD प्रपंच. हे सगळं बेमालूमपणे करायचं आहे, त्यामुळे 'गुपित' ठेवायचं.
हलकेच घेणे.
#Copyright free image from Shutterstock.
केकू, मी शोधून वाचले. आवडले.
केकू, मी संदर्भ शोधून वाचले. आवडले.
"So long, and thanks for all the fish” is a humorous idiom used to say goodbye, acknowledging the positive experiences received during the time spent. This comes from The Hitchhiker's Guide to the Galaxy, a fantasy where dolphins used the phrase as they left Earth just before it was destroyed.
तुसी ग्रेट हो. माझी कल्पना
तुसी ग्रेट हो. माझी कल्पना होती कि हे सगळ्याना माही असेल. खर तर डॉल्फिन मानवान्पेक्षा जास्त बुद्धिमान असतात. केवळ मानवांना बरे वाटावे म्हणून ते सगळ्या ट्रिक्स करून दाखवतात. त्यांना आधीच समजते कि आता पृथ्वीचा नाश होणार आहे म्हणून ते निघून जाता असतात.
एका जपानी लोककथे प्रमाणे एका राजाचे दोन पुत्र असतात. नंतर त्यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून तो एकाला पृथ्वीचे राज्य देतो आणि दुसर्याला पाण्याचे . त्या दुसऱ्या राजपुत्राचे वंशज म्हणजे डॉल्फिन्स.हे अवांतर झाले.
कळीचा मुद्दा असा कि बायकोला वाईट वाटू नये म्हणून पुरुष "कडबा" जरी पुढ्यात आला तरी चान छान म्हणत चरतात. पण हा विनोद आहे बरका तेव्हा दीपावली आहे तेव्हा सर्व स्त्री वाचकांनी प्लीज दिवे घ्या बर.
पण ही युक्ती कधी कधी गन्डते. चिमणराव आणि काऊची एक मजेदार गोष्ट आहे. ती नंतर केव्हातरी
मूळ पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. The Hitchhiker's Guide to the Galaxy
झकासराव, पुरुषांचं 'साधंसरळ'
झकासराव, पुरुषांचं 'साधंसरळ' वायरिंग आकाशकंदिलाला जोडूया. Happy Wink <<
नको. आकाशकंदीलाला नको, ते चायनीज माळेला जोडा.
लगेच पकपकायला लागेल.
शेवटी पुरुषांचं साधंसरळ वायरिंग ते.
ते ही पुरुषानेच म्हटलेलं..
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखसमाधानाची जावो. /\
असाच लोभ ठेवा.
झक्कास. मला तर फारच आवडलं हे.
झक्कास.
मला तर फारच आवडलं हे.
अस्मिताचा भन्नाट फराळी
अस्मिताचा भन्नाट फराळी पिटीएसडी चा धागा वाचून एक विडंबन केले आहे. इथेही रिक्षा फिरवतो
https://www.maayboli.com/node/85904
Pages