Submitted by रुद्रदमन on 16 October, 2024 - 13:53
माझे instagram account हॅक झाले आहे... त्यावर काही उपाय आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे instagram account हॅक झाले आहे... त्यावर काही उपाय आहे का?
बरं आहेना, सुंठेवाचून खोकला
बरं आहे ना, सुंठेवाचून खोकला गेला.
मला हे हॅकिंग रिकव्हरी वगैरे
मला हे हॅकिंग रिकव्हरी वगैरे तांत्रिक बाबी तर काही कळत नाही.
पण मी हे काल रात्री घरी विचारले होते, तुमचा इंस्टा अकाउंट हॅक झाला तर काय कराल?
लेकीचे उत्तर आले दुसरे काढू.
तिचे बरेच आहेत. मजा म्हणून काढत असते. मन भरले की उडवत असते. आठवणी जमा करत बसत नाही. सारे फसाद की जड हेच आहे.
तुमच्या कथा लेख फोटो व्हिडिओ वगैरे असतील त्यात.
त्यांचा बॅक अप घेता येईल. पण त्या खाली असलेल्या कॉमेंटरुपी आठवणी जातील.
No I don't know anything but
No I don't know anything but have fun
ऋन्मेश जी उत्तर योग्य आहे..
ऋन्मेश जी उत्तर योग्य आहे.. पण माझे अकाउंट 25k followers चे होते.. promotion sathi थोडीफार इन्कम सुरू झाली होती.. याच महिन्यात.. त्यामुळे तळमळ.. तिथं पर्यंत जाण्यासाठी दीड वर्ष लागले होते ना.. आता कुठे अकाउंट ने पीक पकडला होता तर त्यात हे..
Ohh.. income level ला गेले
Ohh.. income level ला गेले होते.. वाईट झाले. Insta help line नसतात का अश्या केसेस मध्ये. यात मदत मिळायला हवी.
ऋन्मेश जी...
ऋन्मेश जी...
केली आहे complaint.. ७२ तास सांगितले त्यांनी... Followers 5k झालेत कमी आता पर्यंत... बघू काय होते ते..
अच्छा छान. वाट बघूया मग आता.
अच्छा छान. वाट बघूया मग आता. त्यांनी जबाबदारी घेऊन काहीतरी करायला हवे असे मला वाटते.
काय होईल ते अपडेट करा इथे नक्की. माहिती कामात येईल.
ऋन्मेश दादा गेले अकाउंट ...
ऋन्मेश दादा
गेले अकाउंट ...
insta ने स्वतः उडवले की
insta ने स्वतः उडवले की हॅकरचे काम? कोणीतरी तुमच्यावर जळणारा नीच माणूस असेल असे वाटतेय..
ऋन्मेश दादा हॅकर चे काम आहे..
ऋन्मेश दादा
हॅकर चे काम आहे..
फेसबुकवर काही जणांचे अकाउंट
फेसबुकवर काही जणांचे अकाउंट गेले होते. हॅक झाले कि रिपोर्ट झाल्याने गेले कि पासवर्ड हरवल्याने गेले हा विषय नाही.
पण जे लोक लोकप्रिय होते त्यांनी दुसरे अकाउंट काढले. जुन्या फ्रेण्डला रिक्वेस्टी पाठवल्या. फोन, व्हॉट्स अॅप वरून कन्फर्म केले. जुन्या मित्रायदीतले १०% लोक पुन्हा मिळवता आले तर ९०% इतर लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असते.
नव्या अकाउंटवरून जुने अकाउंट आता गेले आहे ही माहिती दिली कि संपली. फक्त तुमचा थोड्या लोकांशी वैयक्तिक संपर्क असेल तर हे शक्य होते.
रुद्रदमन - इन्स्टा खाते गेले
रुद्रदमन - इन्स्टा खाते गेले हे वाईट झाले. त्यातून आर्थिक उत्पनाचा एक निर्माण होणारा स्त्रोत गेला हे अजून वाईट.
शक्य तेव्हढी काळजी घ्या.
आचार्य, त्यांचे फेसबूक अकाउंट
आचार्य, त्यांचे फेसबूक अकाउंट उडून मित्र नाही गेले तर insta followers गेले. हा वेगळा विषय आहे. फॉलोअर्स तुम्ही रिक्वेस्ट टाकून बोलावू शकत नाही.
बरे ते फॉलोअर्स त्यांचे जे लेख कथा इतर कलागुण पाहून जमा झालेले होते त्या पोस्ट सुद्धा उडाल्या. त्यामुळे आता त्यांना पुन्हा सारे जवळपास शून्यातून उभे करावे लागेल. त्यांना त्यातून पैसे मिळायला सुद्धा सुरुवात झाली होती. हा सेट बॅक आहे.
instagram मधून पैसे कसे
instagram मधून पैसे कसे मिळतात? म्हणजे followers जाण्याचा आणि पैसे जाण्याचा काय संबंध आहे?
दादा प्रमोशन साठी चांगले पैसे
दादा प्रमोशन साठी चांगले पैसे मिळतात..
Insta account personal ad...brand collabration. Account tagging.. हे सर्व तुमचे followers किती आहेत त्या प्रमाणातच समोरील व्यक्ती पैसे देते... अगदी 50 rs पासून
youtube सारखे लाईव्ह ऍड साठी पैसे नाही देत...
दादा प्रमोशन साठी चांगले पैसे
उपाशी बोका दादा
दादा प्रमोशन साठी चांगले पैसे
दादा प्रमोशन साठी चांगले पैसे मिळतात..
Insta account personal ad...brand collabration. Account tagging.. हे सर्व तुमचे followers किती आहेत त्या प्रमाणातच समोरील व्यक्ती पैसे देते... अगदी 50 rs पासून
youtube सारखे लाईव्ह ऍड साठी पैसे नाही देत...
नशीब अजुन माबो अकाउंट हॅक
नशीब अजुन माबो अकाउंट हॅक झाले नाहीत.
माबो अकाउंटला पैसे मिळतात का
माबो अकाउंटला पैसे मिळतात का ?
रुद्रदमन, अकाउंट हॅक झाल्याचे
रुद्रदमन, अकाउंट हॅक झाल्याचे वाचून वाईट वाटले. यावर काही उपाय सापडावा यासाठी शुभेच्छा! हा व्यवसाय म्हणून करता आहात तर cyber security साठी आवश्यक खबरदारी नक्की घ्या.
तुमचा अनुभव आणि नुकत्याच झालेल्या इतर काही घटना यातून virtual आणि real यातील अंतर झपाट्याने कमी होत आहे असे जाणवले.
Securing your Instagram
Securing your Instagram account with two-factor authentication
https://help.instagram.com/566810106808145
अरे वा! जव्हेरगंज!!
अरे वा! जव्हेरगंज!!
म्हसरांबरुबर मायबोलीवर पन ध्यान ठिउन हायसा
माबो अकाउंटला पैसे मिळतात का
माबो अकाउंटला पैसे मिळतात का ?
>>>
याचे ऍक्च्युली उत्तर हो असे आहे.
फॉलोअर्स म्हणजेच चाहत्यांची संख्या,
पोस्ट म्हणजेच धाग्यांची संख्या,
आणि कॉमेंट लाईक म्हणजेच प्रतिसादांची संख्या यावर हिशोब केला जातो.
त्या गणिताचा फॉर्म्युला विचारू नका, क्रिकेट प्रेमी जसे डक वर्थ लुईसला इग्नोर करतात तसे करा..
पण हो, अगदीच पैश्यात लोळण्याइतकी कमाई होत नसली किंवा आज जेमतेम सुटत असेल तरी ते सारे पैसे गुंतवत गेलो तर निवृत्तीनंतर एकही धागा न काढता ऐशआरामात जगू शकतो. आता आपण फक्त प्रतिसाद वाचणार म्हणून swag दाखवू शकतो.
ऋन्मेश दादा
ऋन्मेश दादा
खरेतर आज काल मोबाइल म्हणजे जग झाले आहे..
आपण किंवा इतर कोणी कितीही ओरडले तरी मोबाइल आणि येणारी पिढी वेगळी होऊ शकत नाही..
अगोदर मोबाइल game खेळायचे म्हणजे व्यर्थ वेळ वाया घालवणे असे होते.. ज्यांच्या आई वडिलांनी मोबाइल हिसकावून घेतले ते आज डिग्री हातात घेवून फिरत आहेत.. तर इतर गेम खेळता येत नाही म्हणून Rummy मध्ये पैसे घालवत आहे आणि ज्यांच्या आई वडिलांनी दुर्लक्ष केले.. मुलांना यथेच्छ गमे खेळू दिले.. ते लाईव्ह वर मोबाइल game play करून लाखो ने पैसे कमावत आहेत..
जव्हेरजंग दादा
जव्हेरगंज दादा
सगळे केलेले होते... अगदी दहा वेळा recovery केली असेल मी स्वतः... त्याच अकाउंट ची... पण त्यांनी काही पिच्छा सोडला नाही.. प्रत्येक वेळी मी recover केल्याच्या साधारण एक तासात परत अटॅक व्हायचाच .. आणि परत अकाउंट चां पूर्ण नंबर email सर्व बदललेले असायचे... माझ्या नंबर च्या जागी +234 स्टार्ट होणारा नंबर यायचा... तो ज्या मोबाइल मधून माझे अकाउंट हॅक करायचा त्याचे लोकेशन नैरोबी दाखवायचे... कधी चेन्नई तर कधी मुंबई... आता ते vpn वापरून शक्य असते....
माझ्या अकाउंट मध्ये मेटा अकाउंट नावाचा बग होता एक... तो कोणत्या तरी yenamail.com वर बनविलेल्या email वर रजिस्टर होता...
मी बराच search केला तेव्हा कळले की Yena mail.com हा temporary email पुरवणारा domain आहे... तो खास करून hackers वापरतात... काल रात्री 2 वाजता एक तास प्रयत्न करून मी परत एकदा recover केले अकाउंट.. 3 ते 4 .. जवळपास जास्तीत जास्त follower's ला tag करून माझे अकाउंट हॅक झाले असल्याचा reel त्याच अकाउंट वरून टाकला...त्यांनतर मी माझे सर्व फॅमिली व्हिडिओ डिलीट केले साधारण 4 वाजता परत एकदा माझे अकाउंट हॅक झाले... two-factor authentication चे code त्यांनी प्रत्येक वेळी crack केले... माझ्या इंस्टाग्राम ला two-factor authentication साठी लागणारे app Google authentication app माझ्या मोबाइल मध्ये होते.. तरी पण त्यांनी कित्येक वेळा आठ अंकी कोड crack केले.. बोला आता
Even माझे अकाउंट आता सुद्धा
Even माझे अकाउंट आता सुद्धा मी एक तास खटपट करून परत मिळवू शकतो.. पण परत तेच होणार हे निश्चित आहे.. त्यांची ताकद बघून असे वाटते की त्यांचा इगो नको दुखावला जायला.. माझे एफबी चे अकाउंट खूप मोठे आहे.. म्हणजे त्यावर साडेचार लाख सभासद असलेले ग्रुप आहेत.. ज्यावर मी एकटा admin आहे... पेज आहे... अवघ्या एक महिन्यात 1200 प्लस followers झालेले आहेत... Youtube आहे त्यावर पण 1500 प्लस subscriber झालेले आहेत... उगाच त्यांचा इगो दुखावला जायचं आणि तिकडे मोर्चा वळवयचे...
अरे बरीच संपती आहे तुमची
अरे बरीच संपत्ती आहे तुमची
ऋन्मेश दादा..
ऋन्मेश दादा..
एफबी ग्रुप वरून काही नाही मिळत... तो ग्रुप फक्त शेती विषयी माहिती साठी सुरू केलेला होता मी... मी शेतकरी आहे.. तिथे पण सर्व शेतकरीच आहे... आता तिथे कोणाला काही विकण्यासाठी add करायची तर माझी परवानगी लागते पोस्ट ला.. पण शेती विषयक सोडून इतर सर्व पोस्ट मी सरळ decline करत असतो... आणि शेतकऱ्यांच्या गरजेच्या मालाच्या जाहिराती असतात .. नवीन तंत्रज्ञान निर्माण करणारे कंपनी असतात.. त्या शेतकरी हिताच्या वस्तूंच्या ऍड साठी पोस्ट करतात .. तेव्हा त्यांच्या कडून कसे घेणार..
हेच त्याचं ग्रुप वर जो नंबर आहे रजिस्टर त्यावर कॉल येतात 30 दिवसात वजन घटवा, गोरे व्हा.. stamina vadhva... Ase बरेच एक पोस्ट साठी 100 रुपये द्यायला तयार असतात... पण त्यातून बऱ्याच लोकांची धोकाधडी होऊ शकते.. मी नाही करत त्या पोस्ट अप्रुव..
अजून एक त्याच ग्रुप वर एक नागपूर कडचा इसम होता.. शो ची बैल, बैलगाडी असे प्रॉडक्ट ची पोस्ट करायचा... मी पण गरीब होतकरू उद्योजक असेल म्हणून त्याची पोस्ट चार पाच वेळा अप्रुव केली... ठाण्याच्या एका माणसाचा कॉल आला मला की त्याने ऑनलाईन पैसे मागवले पण गाडी नाही पाठवली... शो ची बेल गाडी.. आडीच हजार होते त्याचे...
मी स्वतः पोस्ट शोधून त्याला call केला.. त्याला बोललो.. आजाराचे कारण सांगितले त्याने आणि उद्या देतो असे सांगून कॉल कट केला.. दुसऱ्या दिवशी मोबाइल बंद.. कायमचाच...
असे आहे सर्व
एफबी ग्रुप वरून काही नाही
एफबी ग्रुप वरून काही नाही मिळत...
>>>
मी पैश्याबद्दल म्हणत नाहीयेच
त्याखाली तुम्ही जे शेतीविषयक लोकांना कशी मदत होते त्या ग्रुपची हे लिहिले आहे ना.. तीच खरी संपत्ती. जी कोणाच्या कामी येते.
मनापासून धन्यवाद दादा...
मनापासून धन्यवाद दादा...
हा ग्रुप आहे एक .. त्यात Admin असलेली तीनही अकाउंट माझीच आहेत...
https://www.facebook.com/share/g/ot2kqWe2F6iahwiD/
तुम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट
तुम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता काय? फिरऔती कि रकम वगैरे काही डिमांड केली होती काय? त्यांचा काही तरी मोटिव्ह हवा हे करण्यासाठी. उगा हॅक करून काहीच मिळणार नसेल तर उगाच उपद्याप कोणी कशाला करेल.
रच्याकने , गूगल चा ऑथेंटिकेटर , जर ओपन स्क्रिन मिळाली तर आहे तास स्कॅन करून दुसऱ्या मोबाईल वर लगेच घेता येतो. तसं कोणी केले असायची शक्यता आहे का तुमच्या केस मध्ये ? 2F कोड क्रॅक करत असतील असं मला तरी वाटत नाहीय. तुमच्या अथेंटिकेटर अँप मधून काहीतरी लीक झाला असेल याची शक्यता जास्त वाटते.
निवांत पाटील जी
निवांत पाटील जी
नाही तसा काहीच प्रयत्न झाला नाही...
लीक व्हायला मोबाइल पण माझ्या कडेच असायचा.. मोबाइल चा पासवर्ड फक्त मलाच माहीत आहे..
ते बाकी code मधले नाही कळत मला ..
पण त्यांनी two-factor authentication
सुद्धा तोडले
Koni tasa screenshot घेण्याचा
Koni tasa screenshot घेण्याचा पण शक्यता नाही... कारण मोबाइल थंब प्रिंट वर खोलतो
Koni tasa screenshot घेण्याचा
Koni tasa screenshot घेण्याचा पण शक्यता नाही>>> दुसऱ्या डिवाइस वर घेण्यासाठी सगळ्या लिस्ट साठी एक QR कोड जनरेट होतो, तो दुसऱ्या डिवाइस मधून स्कॅन केला कि सगळे ६ डिजिट फॅक्टर दुसऱ्या डिवाइस वर जनरेट होऊ लागतात. ज्यांचे १ मिलियन वैगेरे स्बस्क्र्याबर आहेत ते लोक बॅकअप प्लॅन करून ठेवतात हे पहिला आहे, हॅकर सोबत ट्रॉल करून त्यांचे अकॉउंट बंद पडताना पण पहिले गेले आहे. आता पुढच्या वेळी तुम्ही पण तसं प्लॅन करा. त्यांना काही फायदा नसताना , मल्टिपल टाइम्स ते परत परत तेच करत आहेत हे मला जरा आश्चर्य वाटतंय , तुमचा मित्र वैगेरे प्रॅन्क करतोय काय पहा.
निवांत पाटील जी..
निवांत पाटील जी..
तुमच्या बोलण्यात पूर्ण तथ्य आहे... कारण 25K चे अकाऊंट म्हणजे या insta च्या साम्राज्यात एक थेंबा सारखे आहे.. पण तरीही माझ्या बाबतीत ते घडलेच... का घडले आणि कसे घडले हा माझ्या पुढे पण प्रश्न आहे... कारण कालच रात्री मी तो अनुभव परत घेतलाच ना.. परवा रात्र भर जागून आम्ही हॅक आणि recover game khelat होतो... काल दिवस भर मी एकदा ही तसा प्रयत्न केला नाही.. काल रात्री जेव्हा मी 3च्या दरम्यान लाईव्ह फेस फोटो च्या माध्यमातून recover kele तेव्हा 12600 followers शिल्लक होते फक्त... पण अवघ्या एका तासात परत मी अकाउंट मधून logout झालो..
आणि मी सांगितलेच आहे.. माझ्या अकाउंट मध्येच अजून एक profile आहे.. ती मी तयार केलेली नाही.. तिचा email id मात्र वेगळा आहे.. तो yanemail.com या temporary mail वर तयार केलेला आहे... ती प्रोफाइल मी प्रयत्न करून डिलीट नाही करू शकत आहे... कारण ती डिलीट करताना instgram माझ्या कडे त्या मैल वर send केलेला password मागते... तो मैल त्या हॅकर चा आहे... कसे आणि काय... काहीच कळत नाही... त्या साठी एखाद्या हॅकर शी संपर्क करावा तर.. कुठे पैसा खर्च करत बसावा.. असे झाले आहे माझे...
मायबोलीवर फॉलोअर्स वाढवा.
मायबोलीवर फॉलोअर्स वाढवा.
मायबोलीचा एक फॉलोअर = १ लाख इन्स्टाग्रॅम फॉलोअर्स = १० लाख फेसबुक फॉलोअर्स.
इथला एक प्रतिसाद = फेसबुकचे १ करोड लाईक्स.
मुलांना यथेच्छ गमे खेळू दिले.
मुलांना यथेच्छ गमे खेळू दिले.. ते लाईव्ह वर मोबाइल game play करून लाखो ने पैसे कमावत आहेत..>> काय सांगता!!