वेळ असते हातात तेव्हा...

Submitted by sarika choudhari on 8 October, 2024 - 06:09

“वेळ असते हातात तेव्हा...”

वेळ असते हातात तेव्हाच,
आपल्या माणसांना जवळ घ्यावं,
काय हवं, काय नको ते प्रेमाने विचारावं.
दिवस सरतो, रात्र सरते वाढत जातो दुरावा,
कामाचा ताणा असताना दूर जातो जीवनातील ऋतू हिरवा.
वेळीच सावध होऊन, योग्य काय ते ठरवा
म्हणूनच वेळ असते हातात तेव्हाच........

प्रत्येक क्षण मोलाचा तो प्रेमाने सजवा.
जेव्हा गरज असते आपली त्यांना,
तेव्हा वेळ आपला त्यांना द्यावा
जगाला आपल्या प्रेमाचा वाटू द्यावा हेवा.
एकदा वेळ निघून गेली की परत मिळत नाही
आपल्या प्रेमळ माणसाचा ठेवा.
म्हणूनच वेळ असते हातात तेव्हाच........

वाद झाला तरी संवाद सुरू ठेवा,
कधी मोठेपणा घेत स्वत:च माघार घ्यावा.
आभासी या जगात क्षणभर स्क्रीनवर दिसावं ,
पण जगावं असं की सर्वांना हवहवसं व्हावं .
म्हणूनच वेळ असते हातात तेव्हाच........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults