दैवी आणि तेवढच दुर्मिळ फूल म्हणून ब्रम्हकमळाची ख्याती आहे.
शिवांची सहस्र कमलांनी पूजा करण्याचं व्रत विष्णुनी घेतलं ते याच फुलाचं. जिच्या अंगगंधाला भ्रमर ही भुलायचे अश्या गंधीत, रूपगर्वीता द्रौपदीलाही ज्याची भूल पडली, आणि केवळ तिच्या साठी म्हणून भीमाने हिमालयात जाऊन फुल आणायचा घाट घातला. मग ते गर्वहरण वगैरे घडलं. ब्रम्हकमळाच्या झाडाला म्हणे बारा वर्षांनीच एकदा फुल येत. आणि ते फुलत असताना आसपास दैवी वावर जाणवतो म्हणे. अश्या अनेक आख्यायिका आणि दंतकथा ऐकत मोठी झाले. हाताशी google नसल्याने मोठे जे सांगतील तेच खरं मानणारी आमची बहुदा शेवटचीच पिढी.
भट्टेवाडीत इतक्या असंख्य प्रकारची झाडे आहेत.. अगदी बुचाचं झाडही पाहायला मिळालं, पण ब्रम्हकमळाचं झाड काही पाहायला मिळालं नाही. जयुकाकाकडे लावलेल होत अस ऐकलं पण somehow पहायचा योग न्हावताच.
लग्न होऊन इथं अलिबाग ला आले नी पहिल्यांदा दिसल ते अंगणातलं मोठं ब्रम्हकमळाचं झाड, गणपतीत चक्क एक नाही दोन नाही तर ३५ फूल एकाच वेळी उमललेली पहिली. भाद्रपदातला उतरणीला लागलेला पाऊस, सृष्टीत हिरवाई स्थिरावत आलेली, गौरी माहेरपणाला आलेल्या, अश्या एखाद्या निरव काळोख्या रात्री चंद्राच्या उगवण्या बरोबर उगवणारं ब्रह्मकमळ. मोतीया रंगाचं चांदणं अंगाखांद्यावर लेऊनही आपली शुभ्रता जपणारं. सूर्याची दाहकता न झेपणारं. अगदी कमी वेळेत आपला फुलण्याचा उत्सव मनापासून साजरा करणारं हे फूल बघताना आपल्याही मनात शांत आनंदचं चांदणं चोरपावलांनी कधी शिरतं कळतही नाही.
यथावकाश गूगल बाबाचा आयुष्यात प्रवेश झाल्यावर ज्याला इतकी वर्ष ब्रम्हकमळ म्हंटल ते केवळ एक निवडुंग आहे हे समोर आलं. मागे दीपांजली हेमकुंड साहेब ला जाऊन आल्यावर तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष वर्णन ऐकलं आणि या फुलाच्या दैवीपणाचे सोहळे मी माझ्यापुरते थांबवले. आजही ही निशगंधी तेवढीच असोसून फुलते. कोणी काहीही म्हणो फुलण्याचा उत्सव मात्र तसाच कायम.
आपलं जगणही असंच असायला हवं नाही का? कोणी बर वाईट काहीही म्हंटल तरी जगण्याचा उत्सव आपण आपल्यापुरता आपल्यासाठीच केवळ साजरा केलाच पाहिजे. आनंदाचं एक निरांजन सतत आपल्यात तेवत ठेऊन दुसऱ्यालाही आनंदी करणं तितकंस कठीण नाही. बघा जमतेयं का….
समर्पक लिहीलेले आहे, फोटो फार
समर्पक लिहीलेले आहे, फोटो फार सुंदर आहे.
छोटासा आणि सुंदर लेख.
छोटासा आणि सुंदर लेख.
हे फूल, त्याचे रात्री फुलणे, त्याचा मंद सुवास याचे गारुड इतके जबरदस्त असते की हे ब्रह्मकमळ नाही हे कळल्यावर बहुतेक जण मनात खट्टू होतात. पण मग शेकस्पिअर काय कामाचा? फूल महत्वाचे, नाव नाही.
तुमचा फोटो सुरेखच आलाय - पांढर्या कळी इतकेच (किंबहुना जरासे जास्तच) सुंदर ते पपनसी रंगाचे sepals फोटोत मस्त टिपले आहेत.
सुंदर लेख
सुंदर लेख
पपनसी रंग...!!
पपनसी रंग...!!
गुलाबी न म्हणता, पपनसी म्हटल्याने फार छान वाटले!!
@सामो धन्यवाद
@सामो धन्यवाद
@मनिम्याऊ धन्यवाद
@ माधव - धन्यवाद . पपनसी रंग. वाह काय उपमा आहे आणि खरोखरच हाच शब्द या रंगाचे अचूक वर्णन करू शकतो
पपनस माझा पण फार आवडतं आहे. आणि फक्त गौरी गणपती च्या दिवसातच विकायला येत. पित्त वाढत ते खाऊन म्हणून जपून खावं लागतं. त्याची कडू, आंबट गोड चव खूप युनिक...
छान छोटुला लेख
छान छोटुला लेख
सुरेख लेख. पपनसी रंग, वाह.
सुरेख लेख.
पपनसी रंग, वाह.