अंतः अस्ति प्रारंभ:-१- {भेट} {डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे }

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 14 September, 2024 - 10:42

दोन दिवसांपूर्वी तो ममा-डॅडासोबत डोंगरामागच्या कुरणात खेळायला आला होता. त्याला इथेच थांब, असे सांगून ममा-डॅडा कुठेतरी गेले होते. दोन दिवसांपासून तो त्यांची वाट बघत होता. आताशा त्याला घराची खूप आठवण येऊ लागली होती. त्याचे छोटेसे घर, मऊ उशी, खेळणी, कपडे आठवत, त्याने आकाशाकडे बघत आवाज काढला. त्याला सपाटून भूकही लागलेली होती. पोटात खड्डा पडला होता.
रात्री काहीजण त्याच्यापुढे अन्न टाकून गेले होते.
"यक्, मी नाही शिळे खात!"
तेव्हढ्यात त्याला ओळ‌खीचा वास आला.
उंच डोंगरावर काहीतरी हलताना दिसत होते. ममा-डॅडा आले असतील का? त्याने आनंदाने चारही पायांवर उडी मारली.
उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आमचे घर आहे तिथे dead end आहे. अशी असंख्य प्रेमळ, पाळीव कुत्री लोक निर्दयी होऊन सोडून जातात. त्यांना बघून इतके वाईट वाटते.