Submitted by अमितव on 9 September, 2024 - 17:02
समुद्राने वेढलेलं, एक चिंचोळ्या साकवाने किनार्याला जोडलेलं डोगराळ बेट. स्तब्ध घनदाट जंगलाने आच्छादलेलं. तिरिप जमिनीवर पोहोचणार नाही असं निबिड. मधोमध अंगाफांद्यांनी बहरलेला डेरेदार वृक्ष, त्याच्या काही फांद्या खोडाला चिकटलेल्या. सापासारखे वाटोळे फेर धरत धरणीत सामावलेल्या. समुद्राची गाज आहे, पण.. वारा तर सोडाच तिकडची हवा इतकी कुंद की श्वास जड व्हावा.
त्या रात्री रुपेरी प्रकाशात वाळूवर तीन जणांच्या पावलाचे ठसे. दोन जंगलात जाणारे आणि एकच परत येणारा, तिचा.
-
-
-
मुलगा गमावल्यावर आता नातू? ती तोच चाबुक घेऊन त्वेषाने जंगलाकडे धावत सुटली ज्याने तिच्या मुंज्या भावाला आईने वठणीवर आणले होते. कारण तिला समजले की 'उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून नातवाने रस्त्याकडे धाव घेतली.'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जबरदस्त. फारच कल्पक.
जबरदस्त. फारच कल्पक.
जबरदस्त. सिनेमा बघितलाय
जबरदस्त. सिनेमा बघितलाय त्यांना लगेच कळेल
सिनेमा।पाहिल्याने कळाली
सिनेमा।पाहिल्याने कळाली
मस्तच. एकीकडे तात्या दुसरीकडे
मस्तच. एकीकडे तात्या दुसरीकडे मुंजा. ह्याचे चाबूक त्याला चालेल का ?
मस्तच
मस्तच
ही शशक पण भारी आहे अमितव
ही शशक पण भारी आहे अमितव
मस्त
मस्त
मस्तच...
मस्तच...
कुठला सिनेमा ?
कुठला सिनेमा ?
मुंज्या
मुंज्या