Submitted by मामी on 9 September, 2024 - 04:06
छोट्या घराकडे निघाला होता. खिशातून दोन नाईसची बिस्किटं बाहेर काढत असतानाच त्याला रस्त्याच्या बाजूला मातीच्या ढेकळांत एका पिवळ्या तुकड्याभोवती जमलेले मुंगळे दिसले.
'अरेच्चा! काल इथे आपली लिमलेटची गोळी पडली तिचा तुकडा दिसतोय. मस्त मेजवानी सुरुये!'
छोट्यानं बिस्किटं तोंडात कोंबली आणि खाली बसून तो मुंगळ्यांचं निरीक्षण करू लागला.
बिस्किटं तोंडात कोंबताना अर्धी खाली सांडली याचीही त्याला फिकीर नव्हती.
घरातून त्याने बाहेर डोकावले. तत्क्षणी तो चिरपरिचित स्वाद त्याच्या संवेदनांना जाणवला. कालही एक पिवळ्या रंगाची मधूर वडी टोळीला सापडली होती. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. घराशेजारच्या अनेक डोंगरांपैकी एका डोंगरावर एक शुभ्र स्फटिक चमकत होता.
उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय
मस्तय
शशक छान रचली आहे !!! कळली.
शशक छान रचली आहे !!! कळली.
मस्त..
मस्त..
तुमची अन्नाची नासाडी होते पण आमची मेजवानी होते
मस्तच
मस्तच
मस्त.
मस्त.
मस्तच
मस्तच
छान
छान
अर्रे आत्ता कळली. मस्त आहे.
अर्रे आत्ता कळली. मस्त आहे.
छान कल्पनाशक्ती. मस्त आहे कथा
छान कल्पनाशक्ती. मस्त आहे कथा.
भारीच
भारीच