अंत: अस्ति प्रारंभ: - १ - मेजवानी - मामी

Submitted by मामी on 9 September, 2024 - 04:06

छोट्या घराकडे निघाला होता. खिशातून दोन नाईसची बिस्किटं बाहेर काढत असतानाच त्याला रस्त्याच्या बाजूला मातीच्या ढेकळांत एका पिवळ्या तुकड्याभोवती जमलेले मुंगळे दिसले.

'अरेच्चा! काल इथे आपली लिमलेटची गोळी पडली तिचा तुकडा दिसतोय. मस्त मेजवानी सुरुये!'

छोट्यानं बिस्किटं तोंडात कोंबली आणि खाली बसून तो मुंगळ्यांचं निरीक्षण करू लागला.
बिस्किटं तोंडात कोंबताना अर्धी खाली सांडली याचीही त्याला फिकीर नव्हती.

घरातून त्याने बाहेर डोकावले. तत्क्षणी तो चिरपरिचित स्वाद त्याच्या संवेदनांना जाणवला. कालही एक पिवळ्या रंगाची मधूर वडी टोळीला सापडली होती. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. घराशेजारच्या अनेक डोंगरांपैकी एका डोंगरावर एक शुभ्र स्फटिक चमकत होता.

उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..
तुमची अन्नाची नासाडी होते पण आमची मेजवानी होते Happy

मस्त.

Happy छान