अंत: अस्ति प्रारंभ: - १ - { पूर्वजाची डुलकी } - {SharmilaR }

Submitted by SharmilaR on 8 September, 2024 - 02:56

अंत: अस्ति प्रारंभ: - १ - { पूर्वजाची डुलकी } - {SharmilaR }

रस्त्यावरच्या झाडाआडूंन तो डोंगराकडे बघत होता. सोनेरी उन्हात त्याला तिथे वरपर्यंत जायची इच्छा होत होती. पण त्याच्या खापर.. खापर.. पणजोबांपासून कुणीही कधी तिकडे गेलं नव्हतं.

खूप पूर्वी त्याच्या कुण्या एका पूर्वजाने त्या वाटेवर जर्रा डुलकी घेऊन शर्यत हरली काय .. अन त्याचा शाप म्हणून अगदी जोडनाव असल्यागत डोंगरापलीकडच्या समुद्र किनाऱ्याहुन ‘कूर्मगती’ बरोबर कायमचं त्यांच नाव जोडल्या गेलं होतं.

अजूनही तिथे ‘गर्वसे’ शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचं कथन होत असतं म्हणे ‘त्यांच्या’ कडून!

आज खूप गर्दी होती तिथे. कदाचित त्या घटनेची कितवी तरी शताब्दी असावी. डोंगरावरच्या त्या खुणेच्या झाडाकडे दर्शनासाठी ‘त्यांची’ रांगच रांग लागली होती.

उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.
**************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!