मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
एखादी कलाकृती निर्मिताना त्यात योग्य समतोल साधला जाईल, सिमिट्री सांभाळली जाईल याची आपण आवर्जून काळजी घेतो. पण सगळ्यात मोठा कलाकार निसर्ग, जेव्हा अशी सममिती सांभाळतो तेव्हा ते दृश्य केवळ अवर्णनीय असते. मग त्या उजव्या-डाव्याचा समतोल सांभाळणाऱ्या डोंगररांगा असोत, डेरेदार वृक्ष असोत वा ढगांनी काढलेली नक्षी. हात आपोआप कॅमेऱ्याच्या बटणावर जातात आणि निसर्गाचा तो आविष्कार आपल्या फोटोंच्या खजिन्यात जाऊन विराजमान होतो.
आपला आजचा विषय हाच आहे निसर्गनिर्मित सममिती.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
निरु
निरु
(No subject)
बालपणीचा काळ सुखाचा ..
.
लिंबाचे झाड
लिंबाचे झाड
हर्पेन , झब्बू!
हर्पेन , झब्बू!
(No subject)
गोकर्णीचे फूल म्हणजे साक्षात सममिती
अहाहा मुमेंट आहेत सगळे फोटो!
अहाहा मुमेंट आहेत सगळे फोटो! कुठला जास्त आवडला ते सांगता येणार नाही.. काही खतरनाक काही हळूवार! खूप च छान हा धागा आवडत्या १० मधे
अहाहा मुमेंट आहेत सगळे फोटो!
अहाहा मुमेंट आहेत सगळे फोटो! कुठला जास्त आवडला ते सांगता येणार नाही.. काही खतरनाक काही हळूवार! खूप च छान हा धागा आवडत्या १० मधे
(No subject)
Pages