प्रकाशचित्रांचा झब्बू १ - निसर्गनिर्मित सममिती

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:16

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

एखादी कलाकृती निर्मिताना त्यात योग्य समतोल साधला जाईल, सिमिट्री सांभाळली जाईल याची आपण आवर्जून काळजी घेतो. पण सगळ्यात मोठा कलाकार निसर्ग, जेव्हा अशी सममिती सांभाळतो तेव्हा ते दृश्य केवळ अवर्णनीय असते. मग त्या उजव्या-डाव्याचा समतोल सांभाळणाऱ्या डोंगररांगा असोत, डेरेदार वृक्ष असोत वा ढगांनी काढलेली नक्षी. हात आपोआप कॅमेऱ्याच्या बटणावर जातात आणि निसर्गाचा तो आविष्कार आपल्या फोटोंच्या खजिन्यात जाऊन विराजमान होतो.

आपला आजचा विषय हाच आहे निसर्गनिर्मित सममिती.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चालेल का, बाप्पाच्या पप्पाचा मित्र. डोक्यावर १० चा आकडा सममिती असल्याने इथे दिलाय. काल परवाचा फोटो आहे हा. घराजवळील जंगलात सुखरूप सोडला.

MB Ganesh Symmetry - 001.jpg

Zabbo 3.jpg
या फोटोत आंब्याच्या पानावर दोन कॉमन बॅरन (Common Baron) फुलपाखराच्या अळ्या सममितीत आहे आणि त्यांचे पूर्णपणे छद्मरूपण (camouflage) झाले आहे.

भांबुर्ड्याचे नवरा-नवरी आणि भटजी सुळके. याला काही लोक भांबुर्ड्याच्या ताजमहाल असेही म्हणतात. आमच्या संस्थेने (सेफ क्लाइंबिंग इनीशीएटिव्ह - https://www.safeclimbinginitiative.org/index.html) येथील गंजलेले बोल्ट्स रिप्लेस करून या सुळक्याच्या प्रस्तरारोहण मार्ग सुरक्षित केला आहे.

MB Ganesh Symmetry - 004.jpg

Submitted by ऋतुराज. on 7 September, 2024 - 22:11 >>> क्या बात ऋतुराज, एका फोटोत दोन विषय

छान फोटो येत आहेत ईथे Happy

फॉल मध्ये रंगलेला रस्ता

Seattle_Fall.jpg

धन्यवाद स्वरूप. Happy
एकापेक्षा एक सुंदर फोटो. चाफा, नाग, लेक लुईस, खरंतर सगळेच खूप आवडले.

धन्यवाद मी_अनु, अस्मिता, अन्जु. फॉलचा फोटो सुंदर आलाय. rmd लेक लुईझी मस्तच. केव्हा आला होता इकडे.

मस्त फोटो सगळे.
ऋतुराज , ती आंब्याच्या पानावरील अळी बरेचदा पाहिलीय आमच्या झाडावर . पण ती फुलपाखराची आहे हे माहित नव्हते .
माझा झब्बू
DSC01926.jpgDSC02290.JPG

Submitted by rmd on 8 September, 2024

Dancing Ballerinas !!
Excellent timing here.

Pages