
कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या राज्यात फिरायचा योग येतो. असाच एका बिझनेस ट्रीप वर असताना मी ओला कॅब मधून एअरपोर्ट टू हॉटेल असा प्रवास करत होतो. मी विशाखापट्टणम या शहरात होतो रात्रीच्या सुमारे दोन वाजता माझं विमान लँड झालं. इथली लोकल भाषा येत नाही म्हणून मी ठरवलं की ऑनलाईन ओला किंवा उबेर बुक करायचे आणि निवांत हॉटेलला पोहोचायचं. एअरपोर्ट पासून हॉटेल जवळजवळ 20 किलोमीटर होते. माझे विशाखापट्टणम मध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ होती. बाहेर पडलो आणि पहिल्यांदा उबेर ट्राय केले, कोणीच बुकिंग एक्सेप्ट करत नव्हता सगळे लोकल ड्रायवर्स ऑफलाइन भाडे करण्यासाठी बुकिंग एक्सेप्ट करत नव्हते. मी चालत चालत उबेर च्या पिकअप पॉईंट ला आलो. त्यावेळेला सगळे ड्रायव्हर माझा अंगावर ओरडत येऊ लागले तेलुगु मध्ये कुठे जायचं विचारत होते पण मी कसा बसा त्यांना अवार्ड करत प्रायव्हेट गाडी आहे म्हणून सांगून तेथे उभा राहिलो.
आधीच रात्रीचे दोन वाजले होते दिवसभराच्या कामातून प्रवासातून खूपच कंटाळा आलेला होता. मी दोन-तीन वेळा उबेर ट्राय केल्यानंतर ओला वर गेलो. ओला वर प्राईमसीडान बुक करून मी ड्रायव्हरची वाट बघू लागलो.
एक सीडान गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली ड्रायव्हर तिशीतला असेल. त्याने मला कॉल केला आणि मी मोबाईल कानाला लावला ते बघून त्याला कळाले की मी कॅब बुक केलेले आहे, मी पण पटकन गाडीत बसलो आणि त्याला ओटीपी सांगितला. ओ टी पी टाकून त्याने गाडी मार्गस्थ केली मी मात्र रात्रीची वेळ असल्याने गुगल मॅप वर हॉटेलचे लोकेशन टाकून मोबाईल स्क्रीनवर बघत बसलो.
थोड्या वेळानंतर गाडी एअरपोर्टच्या आवारातून बाहेर पडून हायवेला लागली. तसा मी गाडी मधल्या गोष्टी अब्जर्व करायला लागलो, मी मागच्या सीटवर बसलो होतो तरी पण मला डॅशबोर्ड आणि विंड स्क्रीनला लावलेला तो मोबाईल स्टॅन्ड आणि त्याच्यावर अडकवलेला मोबाईल व्यवस्थित दिसत होता, मला स्वतःला कारची आवड असल्यामुळे मी प्रत्येक कॅब मध्ये बसल्यानंतर त्याच्या डॅशबोर्ड वरच्या गोष्टीने न्याहाळत असतो.
थोडं रुटीन लागल्यानंतर त्याने पहिल्यांदा कॉल केला आणि स्क्रीनवर आले दोन हार्ट चे चिन्ह तो तेलगू मध्ये बोलत होता पण मला सर्व काही कळत होते. ती त्याची प्रेयसी असावी बहुतेक आणि ती तिच्या घरून बोलत असावी म्हणून ती एकदम हळू आवाजात बोलत होती आणि हा तिला परत परत मोठ्या आवाजात बोल म्हणून सूचना करत होता,
मग याने आपल्या दिवसभराचा टाईम टेबल तिला सांगितला तेवढ्यात त्याच्या मित्राचा म्हणजेच को ड्रायव्हरचा कॉल आला तसा त्याने तिला वेटिंग वर टाकला आणि मित्राशी बोलू लागला तो त्याला सांगत होता की कोणीच ऑफलाईन भाडं न मिळाल्यामुळे त्याने नाइलाज म्हणून हे कोणाचं भाडं घेतलं होतं तो त्याला लोकेशनच्या डिटेल सांगत होता आणि त्यांचं बोलून झालं. मग त्याने वेटिंग वरचा कॉल ऑनलाईन टाकला तेवढ्यात मला वाटतं बाईसाहेबांना राग आला असेल तिने त्याला सुनवायला चालू केलं आणि मग याला पण राग आला मी त्यांचं मोठे भांडण चालू झालं मी मात्र मला काहीच कळत नाही असा आव आणून बाहेर खिडकीत विशाखापट्टणम चे रस्ते बघत होतो.
पण हा विचार मला मनात येऊन गेला की आतापर्यंत मी कितीतरी मधून प्रवास केला प्रत्येक वेळेला त्या ड्रायव्हरची लाईफ स्टाईल त्याचं बोलणं त्याचं वागणं हे बघून मी त्यांच्या दररोजच्या आयुष्यात डोकावत असतो.
भले तो मुंबईला असणारा कॅब ड्रायव्हर जोकी मावा खाऊन आपल्या मित्राला समजावत होता की गावाकडे काही नाही आता इकडे येऊन तू पण नाही गाडी आहे आणि भाडे करत बस. किंवा तो बेंगलोर मधला कन्नड कॅब ड्रायव्हर जो दिवसभर गाडी चालवून कंटाळलेला होता आणि पंजाबी गाणे ऐकत ऐकत गाडी चालवत होता. किंवा हैदराबाद मधला एक कॅब ड्रायव्हर ज्याला काहीच पेशन्स नव्हता तो अशी गाडी चालवत होता की जणू काही विमानात चालवतोय आणि हॉर्न कंटिन्यूअस मारत होता. किंवा नागपूर मधला तो कॅब ड्रायव्हर जो आपल्या आईची बोलून आपण दिवसभरात किती कमाई केली कुठे जेवलो हे सांगत होता.
आपल्या आजूबाजूला असे भरपूर लोक असतात की ज्यांच्या आयुष्यात डोकावून बघितले तर आपल्याला त्यांच्या वागण्याचे काहीच वावगे वाटत नाही. कामाच्या निमित्ताने भरपूर फिरायला मिळते आणि असे असंख्य लोकांचे जीवन अनुभवायला मिळते.
मला माहिती नाही मीच असा करतो की आणखी कोणी आहे जे असा विचार करतात की कोणी अनोळखी माणूस भेटला तर त्याच्या जागी जाऊन त्याचे आयुष्य कसे असेल याचे इमॅजिनेशन करत बसतो.
प्रवासातल्या आणखी काही गमतीशीर भीतीदायक गोष्टी आहेत ज्या आम्ही निमितपणे शेअर करेन.
शेवटी आमचे गाडी विशाखापट्टणमच्या जिंजर हॉटेल च्या दरवाज्यापाशी पोहोचली पण तो एरिया एवढा सुनसान होता की तिकडे एकही लाईट चालू होती आणि वीस पंचवीस कुत्रे ओरडायला लागले. पण त्या कॅब ड्रायव्हरने अगदी हॉटेलच्या दारात गाडी उभी केली आणि हॉटेल मॅनेजर उठून दरवाजा उघडू पर्यंत तो तिथेच उभा राहिला शेवटी मॅनेजरने दरवाजा उघडल्यानंतर मी त्याला हात दाखवला आणि तो निघून गेला.
मस्त अनुभव.लिहिते राहा.
मस्त अनुभव.लिहिते राहा.
आता आलेला एक अनुभव: आमच्या गल्लीच्या टोकावर बराच वेळ ओला उबर शोधत होते. एकजण येऊन नुसता बिना ओला उबर जायची ऑफर देऊ लागला.त्याला म्हटलं 50 रुपयात ये.2 किलोमीटर पण नाहीये अंतर.तयार झाला.मग ठिकाणाच्या आधीच्या चौकात आल्यावर प्रचंड रहदारीच्या चौकात रोन्ग साईड ने जायची तयारी चालू केली.त्याला वळण्यापासून थांबवलं आणि सांगितलं की नीट पुढच्या चौकात यु टर्न घेऊन सगळे जातात तसा मला सोड.मग भांडायला लागला.मी पुढचं बुकिंग घेतलं.तुम्हाला यु टर्न मारून सोडायचं होतं तर रिक्षात बसण्याआधी मला सांगायचं.त्याला म्हटलं सगळं जग यु टर्न मारून जातंय.मग बरीच कटकट केल्यावर तो यु टर्न मारून पुढे गेला.ठिकाण यु टर्न चौकापासून इतकंही लांब नव्हतं की यु टर्न टाळून बराच अंतर फायदा होईल.आधीच्या आणि या चौकाच्या अर्ध्यात होतं.
मस्त अनुभव.लिहिते राहा. +७८६
मस्त अनुभव.लिहिते राहा. +७८६
मला सुद्धा फार सवय आहे अश्या निरीक्षणाची.. बोलतो कमी त्यामुळे सुद्धा निरीक्षण जास्त असते. पण काही दिवसांपूर्वी एका महिला रिक्षाचालकाचा चक्क इंटरव्ह्यू घेतला शेजारी बसून.. लिहायचे होते त्यावर. पण सध्या कमी लिहीत असल्याने राहिलेच. आता आठवले. नोट करून ठेवतो.
कोणी आहे जे असा विचार करतात
कोणी आहे जे असा विचार करतात की कोणी अनोळखी माणूस भेटला तर त्याच्या जागी जाऊन त्याचे आयुष्य कसे असेल याचे इमॅजिनेशन करत बसतो.>> मी आहे तशी.
धन्यवाद mi_anu मी लिहीत जाईन
धन्यवाद mi_anu मी लिहीत जाईन पुढे
धन्यवाद ऋन्मेऽऽष... बरोबर कमी बोलणाऱ्यांकडे ऑब्झर्वेशन पॉवर भरपूर असते
धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी. @SharmilaR पण मी जेव्हा असे इमॅजिनेशन करतो तेव्हा मला अशी भीती वाटते की मी हे manifest तर करणार नाही.
मी manifestation आणि
मी manifestation आणि visualization याच्यावर पण लिहिणार आहे... मला चांगले अनुभव आहेत याच्याबद्दल
लेख आवडला.
लेख आवडला.
पॅसेंजर्स गाडीत असताना, उबर
पॅसेंजर्स गाडीत असताना, उबर ड्रायव्हर फोनवर बोलते/तो हाच अनुभव माझ्यासाठी नविन आहे.
छान लेख.
छान लेख.