Submitted by पॅडी on 23 July, 2024 - 05:33
* दिली पावसाने हाळी *
दिली पावसाने हाळी
रोमांचले रंध्र रंध्र
धरा कस्तुरीचा फाया
पसरला मृदगंध...
दिली पावसाने हाळी
ऊब भिनली गात्रात
नखशिखांत शहारे
मोती नदीच्या पात्रात...
दिली पावसाने हाळी
पिसाटला रानवारा
ओले घरटे; पाखरू
शोधी आडोसा निवारा...
दिली पावसाने हाळी
हरखल्या वृक्ष वेली
पोरसवदा धरती
आज न्हातीधुती झाली...
चिंब पावसात सखी
उभे निथळे लावण्य
मन भरतीची लाट
देह पेटले अरण्य...!
***
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर...
सुंदर...
सुंदर.
सुंदर.
द सा , सामो - प्रतिसादासाठी
द सा , सामो - प्रतिसादासाठी खूप खूप आभार...!