मजेदार म्हणी आणि त्यामागच्या कथा तुम्हाला माहित आहे का?

Submitted by ब्लू कोलंबसे on 20 June, 2024 - 23:31

मी बऱ्याच वेळा काही गोष्टी घडल्या की त्यासाठी मराठीतील एखादी म्हण वापरत असतो. मला म्हणी आवडतात त्या इंग्रजीतले असो की मराठीतल्या, आपल्या बोलण्याला एक शोभा दिल्यासारखं त्यांचं स्वरूप वाटतं.

बऱ्याचशा म्हणीमागे मस्त मजेशीर कथा असतात. जसे 'काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीसाठी जी कथा आहे ती अशी:

एकदा एक मुलगा, जो बराच विसरभोळा आहे, घरी पाणी आणण्यासाठी कळशी तर घेतो, पण वाटत जाताना काहीतरी दुसराच विचार करत असल्यामुळे काखेतच कळशी आहे हे विसरतो आणि पाण्याजवळ गेल्यानंतर सगळ्यांना आपली कळशी कुठे आहे, हे विचारत सैरावैरा धावत सुटतो.

गावभर फिरला तरी त्याला कळशी मिळत नाही आणि मनामध्ये कळशी शोधण्याचाच विचार असल्यामुळे इतरांनी ' ती काखेत आहे ' हे सांगितले तर त्याला लक्षात येत नाही. अखेर घरी गेल्यावर नंतर कळशी आपल्या काखेतच आहे हे आरशासमोर लक्षात आल्यानंतर ही म्हण प्रसिद्ध झाली, असे की ऐकले. खरे खोटे देव जाणे, पण मनोरंजन तर होतेच अशा कथांनी.

अशा कोणत्या मजेशीर म्हणी आणि त्या मागच्या कथा तुम्हाला माहिती आहेत, हे या धाग्यात जरूर सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लहानपणी शाळेतल्या कुठल्यातरी स्पर्धेत एक पुस्तक बक्षिस मिळाले होते, त्यात म्हणींच्या गोष्टी होत्या.

१. अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी - नवरा बायकोचे भांडण होते व नवरा रागाने घर सोडुन जातो. तो गावाच्या वेशीपर्यंत जाऊन बसतो खरा पण दिवसभर पोटाला अन्न पाणी मिळत नाही, भुकेने कासाविस होतो. संध्याकाळी त्याला त्याच्या म्हशी रानातुन घरी जाताना दिसतात. एका म्हशीची शेपुट धरुन तो घरी येतो. हाकेच्या टप्प्यावर आल्यावर बायकोला ऐकु यावे म्हणुन तो ओरडायला लागतो, अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी, सोड सोड मला. आवाज ऐकुन बायको बाहेर येते आणि म्हणते, तिची शेपुट आता सोडा आणि घरात या, जेवायला पाने घेते.

२. तेलही गेले, तुपही गेले, हाती राहिले धुपाटणे - तिर्थयात्रेला निघालेले एक बापलेक वाटेत देवळात उतरतात.
बाप मुलाला थोडेसे तेल व तुप आण म्हणुन सांगतो व स्वतः नदीवर आंघोळीला जातो. तेल तुपासाठी काय भांडे न्यावे हे मुलाला कळत नाही म्हणुन तो देवासमोर ठेवलेले धुपाटणे उचलतो व जातो. बाजारात वाण्याकडुन धुपाटण्याच्या एका बाजुला तेल घेतो. तुप कशात घेणार असे वाणी विचारतो तेव्हा धुपाटणे उलटे करुन त्यात तुप घेतो. तेल तिथेच पडुन जाते. देवळात जातो तर बाप आलेला असतो. तो तुप बघुन तेल कुठे आहे विचारतो. मुलगा धुपाटणे उलटे करुन तेल दाखवायचा प्रयत्न करतो त्यात तुपही सांडते. तेलही गेले, तुपही गेले, हाती राहिले धुपाटणे म्हणत बाप डोक्यावर हात मारतो.

मला धुपाटणे म्हणजे काय हे नुसती म्हण वाचुन लक्षात आले नव्हते, गोष्ट वाचल्यावर कळले Happy

राजसाहेब, नवज्योत सिद्धू व दादा या सगळ्यांवर एकच प्रतिसाद दिलात हे कौशल्य अलौकिक आहे

(या प्रतिसादामुळे धागा 'अनिष्ट' दिशेला वळल्यास आधीच माफी मागतो व प्रतिसाददात्यांना 'तसे होऊ नये' असे विनम्र आवाहन करतो. राहवले नाही म्हणून लिहिले इतकेच)

@साधना,
मलासुद्धा म्हणींचे पुस्तक शाळेत बक्षीस म्हणून मिळाले होते.

MBVaVi2024JIF.gif

वर्षाविहार धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/85290

मायबोली वर्षाविहार २०२४ नावनोंदणीचा गुगल फॉर्म - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...

मायबोली वर्षाविहार २०२४ चे शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे