नागरिकांच्या सकारात्मक सुचना - Citizens' Think Tank

Submitted by मामी on 9 June, 2024 - 00:53

ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.

********************************************************************************************

एक नागरीक म्हणून उत्तम पायाभूत व्यवस्था, स्वच्छ शहरं, हिरवाई, सुरक्षितता, वाहतुकीची साधनं, शिक्षण, आरोग्य, कम्युनिटी स्पेसेस (बागा, बगिचे, मैदानं इ) यावर आपला हक्क आहे. त्याच बरोबर ही आपली जबाबदारीही आहे. समाजात वावरताना कितीतरी गोष्टी खटकत असतात. त्या कशा बदलता येतील किंवा सुधारता येतील यावर आपल्या डोक्यात कल्पना येतात पण त्या डोक्यातच राहतात. या कल्पना, संकल्पना डोक्यातून बाहेर काढून निदान कुठेतरी लिहिल्या जाव्यात यासाठी हा धागा.

केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, नगरपालिका असो अथवा इतर कोणत्याही सरकारी / निमसरकारी संस्था असोत. त्या सुयोग्य रितीने चालत रहाव्या जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर व्हावं आणि समाजाची उन्नती व्हावी यासाठी आपल्या सकारात्मक सुचना सल्ले, कल्पना इथे मांडू शकतो. या संस्थांकडून काही अपेक्षा असतील तर त्याचा उल्लेख करू. जर केवळ नागरिकांच्या पातळीवर करता येण्यासारख्या कल्पना असतील तर त्याही नोंदवू.

एखादा अगदी साधा बदल असेल अथवा एकदम नवी वेगळी संकल्पना असेल तरीही चालेल. एखाद्या ठिकाणचा अगदी स्पेसिफिक इश्शूही चालेल. त्यावर तुम्ही काही विचार केला असेल तर नक्की लिहा. त्यावर सकारात्मक चर्चा झाली तर उत्तमच. काही तृटी असतील तर इतरांनी त्या जरूर दाखवून द्याव्यात. त्यावर मात करण्याचे काही मार्ग असतील तर ते तपासता येतील. एकत्रितपणे ही कल्पना पुढल्या स्तरावर घेऊन जाता येईल.

थोड्क्यात, एक छानशी आयडिया बँक तयार होऊ द्या. शक्य असेल तर पोस्टस मध्ये हॅशटॅग देऊन योग्य त्या व्यक्ती, खाती, संस्थांपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करू शकता. (हे मायबोलीच्या धोरणात बसतं की कसं ते माहित नाही.)

कृपया इथे कोणा व्यक्तीवर, पक्षावर, संस्थेवर, सदस्यावर टीका नको. (त्यासाठी असंख्य धागे मायबोलीवर उपलब्ध आहेत.) हा खरोखरीच सकारात्मक कल्पनांचा थिंक टँक धागा बनावा अशी अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, हल्ली परिस्थिती अशी आहे की तुमच्या नियम पाळण्यामुळे इतरांना त्रास होतो सिग्नलला तुम्ही थांबले असता इतरांना सिग्नल मोडायचा असल्याने ते हॊर्न वाजवून बेजार करतात. वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे आपला जीव धोक्यात येतो की काय अशी शंका यायला लागते. खुलभर दुधाची कहाणी ही श्रावणी सोमवारची एक कहाणी आहे. त्यात म्हातारीच्या पेलाभर दुधाने शिवाचा गाभारा भरतो. जो ग्रामस्थांच्या दूधाने भरत नाही.म्हातारी मुलावासरांना दूध देउन उरलेले दूध गाभार्‍यासाठी आणते. आणि गाभारा दुधाने भरतो. इतर जण राजाच्या भीतीने जे असेल ते सर्व दूध जास्तीत जास्त आणतात. 'खुलभर पाण्याची' कहाणी मॉडिफाईड आहे. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपणही पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.
भ्रष्टाचाराचे असेच आहे. प्रत्यके जण म्हणतो मी एकट्याने न करुन काय उपयोग बाकीच तर करणारच आहेत.

मला वाटतं, धाग्याचा रोख थोडा बदलतोय. एखादा बदल, एखादी सोय सर्व नागरिकांसाठी व्हावी, आहेत त्या सोयीमध्ये काय बदल सरकारकडून अपेक्षित आहेत आणि ते कसे अवलंबिता येतील याची चर्चा अपेक्षित आहे.

नाहीतर प्रदुषण वैयक्तिक पातळीवर कसे कमी केले याकडे मुद्दे वळतील.

सर्व टोल नाक्यांचे पब्लिक ऑडिट होऊन किती खर्च झाला अन किती भरून निघाला ते जाहीर करून नाकी बंद करावीत.

टोल चा पैसा ठेकेदाराला जातो, सरकारला नाही.

(ठेके कसे मिळतात, त्यात किती पाणी कुठे मुरते तो वेगळा विषय आहे)

१. अर्धा रस्ता व फुटपाथ अडवून बसणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे. मोठी दुकानेही समोरचा फुटपाथ व रस्ता त्यांचा माल व टेम्पो, ट्रक लावून capture करतात. Blind spot तयार होतो. वाहतूक अडते, लोकांना फुटपाथवर चालायला जागा न उरल्याने रस्त्यावरून चालावे लागते. Accident चे chances.

२. शहर विद्रुप करणारी, धोकादायक होर्डिंग्स, बोर्ड्स, फ्लेक्स हटवणे. नुकताच झालेला अपघात आपण बघितला आहे.

३. सगळ्यांना मोफत Disaster Management चे basic training compulsory देणे. लहान मुलं वगळा. हट्ट्याकट्ट्या senior citizens ना त्यांच्या क्षमतेनुसार casualties ना मानसिक आधार देण्याचे जमेल. अनुभव व वयामुळे आलेली परिपक्वता उपयोगी येईल.

४. महामार्गांवर अंतरा अंतरावर स्वच्छतागृह बांधणे आणि त्याचा maintenance. ठाण्याकडून नवीमुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी काही e toilets ची खोपटी दिसत होती. काही दिवसांनी नाहीशी झाली. तसे नको व्हायला. कदाचित ती कशी वापरायची हेच सगळ्यांना माहित असेल असे नाही.

५. सरकारी diagnostic सेन्टर्स (रक्त तपासणी, Xray वगैरे ). ही सध्या फक्त सरकारी रुग्णालयात असतात. ही रुग्णालये ओसंडून वाहत असतात. लोकांना लांबून सुद्धा यावे लागते. त्या ऐवजी प्रत्येक विभागात एक छोटेसे सरकारी diagnostic centre चालू करता आले तर तपासण्या करायला हॉस्पिटल गाठायची गरज नाही. नंतर consultancy साठी जावे.

एक वर्ग पूर्णपणे सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून असतो. एक वर्ग अर्ध private, अर्ध सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून असतो. ह्यांना पूर्ण सरकारीमध्ये आणता आले तर चांगले. ह्यात हातावर पोट असलेले लोक जास्त असतात.

ठाणे सिव्हिल येथे शनिवारी OPD help desk ची सेवा (आमच्या संस्थेतर्फे) देत असताना लोकांना खाडा करुन निव्वळ xray, blood tests साठी लांबून चालत सुद्धा येताना पाहिलं आहे. कधी केसपेपरचे पाच दहा रुपये पण जवळ नसायचे तर बससाठी कुठून असणार? त्या सेवेत विविध विवंचना, अडचणींना तोंड देणारे लोक पाहिलेत.... जे आपण कल्पनाही करू शकणार नाही.

६. सरकारी वृद्धाश्रमांची संख्या वाढवणे.

७. सिग्नल शाळेसारखे उपक्रम जास्त ठिकाणी सुरू करणे.

अजून सुचले तर लिहीन.

मला वाटतं, धाग्याचा रोख थोडा बदलतोय. एखादा बदल, एखादी सोय सर्व नागरिकांसाठी व्हावी, आहेत त्या सोयीमध्ये काय बदल सरकारकडून अपेक्षित आहेत आणि ते कसे अवलंबिता येतील याची चर्चा अपेक्षित आहे.>>>>>>धागा भरकटण्याचा धोका अशा विषयांमधे असतो. फार बिंदुगामी होउ नका.

1. किती पार्किंग रिकामी आहेत हे दाखवणारा डिस्प्ले एन्ट्री ला
हे बऱ्याच मोठ्या मॉल आणि ऑफिसेस मध्ये आहे, सगळीकडे व्हावे
2. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्स ची रिकामी पाकिटं टाकून पैसे देणारी मशिन्स जागोजागी(हा प्रयोग पुणे वेस्ट एन्ड मॉल मध्ये झाला होता.पण ते शॉपर्स स्टॉप चो व्हाऊचर देत होते, तीही 5000 वर खरेदी वर.आणि मशीन ला वेळ लागायचा त्यामुळे बंद झाले.
3. ज्या ठिकाणी जास्त ये जा आहे पण सार्वजनिक वाहन नाही त्या ठराविक 1-2 किलोमीटर रुट्स वर नाणे/पैसे टाकून घेता येऊन त्या स्पॉट ला सोडता येणाऱ्या इ सायकल.हे काही ठिकाणी आहे, पण त्याची ड्रॉप ची ठिकाणं भलतीच लांब आहेत.

भ्रमर व अश्विनी के स्वच्छतागृहाच्या बाबतीत मायबोलीवर व अन्यत्रही नीरजा पटवर्धन यांनी ही चळवळ राबवली आहे. अनेकांच्या सहकार्यामुळे हा विषय सातत्याने लावून धरला गेला आहे. हे धागे पहा
स्वच्छतेच्या बैलाला.....!

' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

महामार्गांवर अंतरा अंतरावर स्वच्छतागृह बांधणे आणि त्याचा maintenance.
<<
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी.

प्रत्येक पेट्रोल पंपावर पब्लिक वापरासाठी टॉयलेट असणे कंपलसरी आहे. तुम्ही तिथे खरेदी केली पाहिजे असे नाही.

प्रत्येक टोल नाक्यावर टॉयलेट असणे कंपल्सरी आहे. नसल्यास "शिकायत पुस्तिका' मे तक्रार लिखनेका, और फोटू ट्विट कार्नेका ट्रान्सपोर्ट मिनिष्टर नितीन भौको टॅग मार्के.

टोइंग व अंबुलन्स सर्व्हिस ही टोल मार्गावर फुकट मिळते.

पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्स ची रिकामी पाकिटं टाकून पैसे देणारी मशिन्स जागोजागी(हा प्रयोग पुणे वेस्ट एन्ड मॉल मध्ये झाला होता.पण ते शॉपर्स स्टॉप चो व्हाऊचर देत होते, तीही 5000 वर खरेदी वर.आणि मशीन ला वेळ लागायचा त्यामुळे बंद झाले. >>> जुन्या काळी जेव्हा westside kinvaa pantaloon plastic shopping bags द्यायचे तेव्हा मला वाटायचे या bags त्यांनी परत घेऊन कूपन्स द्यावे.

स्त्रियांसाठी स्वच्छता गृहे पुरेशा संख्येने आणि सर्वत्र उपलब्ध करून देणे हा अजेंडा राबवला गेला पाहिजे. >>>> स्वच्छ स्वच्छताग्रुहे

प्रत्येक पेट्रोल पंपावर पब्लिक वापरासाठी टॉयलेट असणे कंपलसरी आहे. तुम्ही तिथे खरेदी केली पाहिजे असे नाही. >>> हो असतात. वापर केला आहे.

ही सूचना इथे अस्थानी असावी पण समांतर अवांतर म्हणुन चालून जावी. भेंडीची टोकं कापून भेंडी कोवळी आहे का हे पहात बसणं भयंकर इरिटेटिंग वाटते. लोकं बिनदिक्कित करत असतात.

Rofl
मागच्या पानावरच्या मी पणा पेक्षा आणि एकूणच धाग्याच्या वर्ल्ड पीस पेक्षा भेंडीचा प्रश्न सोडवण्यासारखा आहे, हे ही खरंच म्हणा.

हल्ली सेल फोनच नवीन मॉडेल आलं की लगेच विकत घेतात लोक. त्यामुळे इलेक्ट्रॉनीक वेस्ट वाढत जाते. आपल्याला स्वतःला त्यावर थोडासा आवर घालता आला पाहिजे.

छोट्या गावात अजूनही कचरा वर्गीकरण केले जात नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मला स्वतःला घरातच कचरा जिरवणे ह्या पद्धतीचे अप्रूप वाटते पण जागेचा आणि वेळेचा अभाव ह्यामुळे रोज guilt राहतो की ओला कचरा आपण फेकून देत आहोत.

पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहे असतात हे खरं आहे, पण ती नेहमीच स्वच्छ असतात असं नाही, विशेषतः महामार्गांवर काही वेळा भयाण स्थितीतली स्वच्छतागृहे बघितली आहेत! काही वर्षांपूर्वी (जेव्हा ही सोय नवीन नवीन होती) तेव्हा चांगली असायची. आता खात्री नसते.

पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहे असतात हे खरं आहे, पण ती नेहमीच स्वच्छ असतात असं नाही >>> कारण ती स्वच्छ ठेवावीत यासाठी त्यांना काहीही प्रोत्साहन नसते. त्यांना त्यातून पैसे मिळत नाहीत.

पाणी, ब्रश, हार्पिक ठेवले तर किती लोक वापर झाल्यावर वापर करण्यापूर्वीच्या अवस्थेत आणुन बाहेर येतील?

सरकारने गावोगावी शेतकरी बझार सुरु करावेत..... शेतातून डायरेकट उचलून भाजी/शेतमाल या बझारमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर विकावी ..... शेतकऱ्यांना मुबलक भाव मिळेल आणि नागरिकांनाही आत्तापेक्षा नक्कीच रास्त भावात भाजीपाला मिळेल!!
दोन्हीकडून पिळवणूक करणाऱ्या दलालांना चाप बसेल!!

काही ठिकाणी हे होतही असेल पण अजुन मोठ्या स्केलवर आणि कॉर्डिनेटेड वे ने हे व्हायला हवे

अस्वच्छ स्वच्छतागृहांबद्दल तक्रार केल्यास डीलरला दंड होऊ शकतो.
https://thesoftcopy.in/2019/09/03/unclean-toilets-at-petrol-pumps/#:~:te....

मोफत सुविधा न पुरवल्यास पेट्रोल पंपाचे लायसेन्स रद्द होऊ शकते.
https://www.carkideal.com/en/blogs/license-can-be-cancelled-if-petrol-pu...

त्या त्या कंपनीकडे तक्रार करा.उदा एचपीसीएल पंपाबाबत इथे तक्रार नोंदवा
https://www.hindustanpetroleum.com/pages/Complaints-and-Feedback

इथे गेल्यावर पेट्रोल पंपाच्या चित्रावर क्लिक करा. फीडबॅक फॉर्म ओपन होईल. त्यावर तक्रार नोंदवा.

यावर्षी आसाम/मेघालय इथे प्रवासासाठी गेलो होतो तेव्हा अनुभवले की मेघालयमध्ये टॉयलेट्सची उत्तम सोय आहे. माणशी १० रुपये घेतात, पण टॉयलेट्स स्वच्छ ठेवतात. त्यामुळे त्यांना रोजगारपण मिळतो, असे कळले.

पण ती नेहमीच स्वच्छ असतात असं नाही
<<
आपल्या देशातील टॉयलेट नामक प्रकार मुख्यत्वे "होल वावर" प्रकारचे असण्याचे मुख्य कारण आहे पाणी.

हायवेच्या कडेला असले तरी तो पंप कुठल्यातरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असतो, जिथे प्यायच्या पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागते, धुवायच्या पाण्याची बात वेगळी.

हे असे असले तरीही, मला तरी आजवर एकदाही"घाणेरडे" टॉयलेट पंपावर सापडलेले नाही. हां, घरच्याइतके स्वच्छ नसते हे मान्य आहे.

सीटवर अंथरण्यासाठी मी नेहेमीच टॉयलेट पेपर रोल गाडीत ठेवतो.

Pages