प्रेम’ ही संकल्पना आणि मलयाळम भाषा यांचा ‘मलरे’ हे गाणे ‘साकव’ आहे.
२०१५ पासून गेली ९ वर्षे हे मनामध्ये भरून राहिलेलं आज तुम्हा सर्वांसोबत वाटून घेताना खूप सुंदर , तरल भावना मनात आहे.
{अनुवादाच्या शेवटी या गाण्यातील मलर-जॉर्जच्या ओणम भेटीचा मला भावलेला अर्थ उलगडला आहे, त्यावर आपल्या सर्वांची प्रतिक्रिया टिप्पणी (comment) मध्ये जरूर दर्शवा.}
मलयालम उच्चारातील देवनागरी लिपीत ‘मलरे…’ हे गाणे आणि खाली त्याचा मराठी अर्थ :
अंतरा
‘तेलीमानम मळ्यविल्लीन निरमनियुम नेरम
इंद्रधनुंनी जेव्हा आकाश सज-धजते
निरमार्नोरू कणवेण्णिल तेलीयुन्न पोले’
एक रंगीबेरंगी स्वप्न माझ्यात प्रसवते
पुळयोरम तळूकुण्णी तनु निरन काट्टूम
नदीकाठचा वारा वाहतो, जसा बासरीतून
पुळकणगल नेयतोरू कुळयलुत्तीय पोले
मदमस्त वाहणारा लयदार राग
कुळीरेकुम कणविल नी कदिरादीय कालम
मी अनुभवतो जेव्हा हे सुंदर स्वप्न ,
मनतारील मधुमासम तळीराडीय नेरम
हृदयात फुलतो माझ्या जणू वसंत… !
अकमरुवूम मयीलीनकल तुयीळूणरूम कालम
अंतरंगातीलं निद्रिस्त मोराची जोडपी जागी होतात,
एन अकतारील अनुरागम पकरून्न यामम
आणि अंतरंग प्रीतीने भरून जाते…
अळकेssssssssss….. अळकिल तिर्तोरू शीलअळके
सुंदरी……तू आहेस एक अप्रतिम काष्ठशिल्प
मलरे…..एन्नुयीरील विडूरूमपाणिमलरे
(माझ्या) फुला…..तूच माझ्यात प्रसवणारे आहेस गुलाबाचे फूल…!
कडवे १
मलरे निन्ने काणादिरुन्नाल
फुला, नसण्याने तुझ्या
मिळ्हीवेकीय नेरमिल्लाम मायूण्ण पोले
सजवणारे रंग मला अंतरतात
अलिवोडेन अरीगत्तिनन्नणयादिरुण्णाल
जर तू नसशी निकट माझ्या जरा
अळकेगिय कणवेल्लाम अकलुन्न पोले
सुंदर स्वप्नांचा ताल संपतो असा,
न्यानेन्टे आत्माविन आळत्तिनुळ्ळिल
जो हृदयी खोलवर ठेवलाय जपून;
अतिलोळमारोरूमरीयादे सुक्शिक्च
नसे जगाच्या तो दृष्टीक्षेपात ,
तालंगळ रागंगळ इणंगळाई ओरोर वर्णंगळाsssssssय . . . .
जो उजळे मधुर रागांच्या लहरींमध्ये अन सतरंगातील हर एक रंगात ग . . . .
इडरुन्नो रेन्टे इडनेन्जीनुळ्ळिल
तू बरसतेस माझ्या या भग्न हृदयी,
प्रणयत्तिन मळ्हयायी नी पुळ्हियुन्नी नाळिल
या प्रसन्न समयी प्रणय जलधारासम (माझ्या) फुला
तळरुन्नोरेन्डे तनु तोरूम निन्डे
माझे सुप्त मन जागे झाले,
अल तल्लूम प्रणयत्ताल उणरूम मलरेsssssss……
तुजवरच्या उत्कट प्रेमाने , माझ्या फुलाssssss. . . . .
अळके/अळगेssssssssss . . . .
सुंदरी sssssss,….
* गाण्यातील मलर-जॉर्ज संवाद :
मलर : शर्ट नल्ला इरक्क. (तमिळ भाषा)
मलर : शर्ट मस्त आहे .
जॉर्ज : हां, (हसतो) शर्ट इल्लई, कुर्ती आणो. (मलयालम भाषा)
मलर : (‘अरेच्चा,होय की’ असा भाव दाखवत) कुर्ता …
जॉर्ज : केरला सारी, सुपरार्क(सुपर+इरक्क.) (तमिळ भाषा)
जॉर्ज : केरळची साडी, सुपर दिसतेय.
अंतरा (पुन्हा)
कुळीरेकुम कणविल नी कदिरादीय कालम
मी अनुभवतो जेव्हा हे सुंदर स्वप्न ,
मनतारील मधुमासम तळीराडीय नेरम
हृदयात फुलतो माझ्या जणू वसंत… !
अकमरुवूम मयीलीनकल तुयीळूणरूम कालम
अंतरंगातीलं निद्रिस्त मोराची जोडपी जागी होतात,
एन अकतारील अनुरागम पकरून्न यामम
आणि अंतरंग प्रीतीने भरून जाते…
अळकेssssssssss….. अळकिल तिर्तोरू शीलअळके
सुंदरी……तू आहेस एक अप्रतिम काष्ठशिल्प
मलरे…..एन्नुयीरील विडूरूमपाणिमलरे
(माझ्या) फुला…..तूच माझ्यात प्रसवणारे आहेस गुलाबाचे फूल…!
(HUMMMMMMMMING)
ओओओओओओ ओओओओओओओओओओओ sssssss
ओओओओओओओ ओओओओ ओओओओओओओओsssssss . . . .
* थोडे गाण्यातील संवादाबद्दल :
जेव्हा मलर (मूळ तमिळनाडूच्या ‘कोडाईकनालची) या मलायली ‘ओणम’ (फुलांचा सण) मध्ये सामील होते ,तेही एखाद्या मलयाली स्त्रीसारखी सोनेरी काठाची शुभ्र साडी घालून; तेव्हा ती न बोलता जॉर्जच्याच नव्हे, तर तो ज्या संस्कृतीतून येतो त्या संस्कृतीतही मिसळून एकरूप होण्याची इच्छा मुक्तपणे व्यक्त करते. मात्र हे दोघांच्या मनीचे गुज पूर्ण वर्गाला किंवा कॉलेजच्या मुलांना-स्टाफला माहित नसल्याने तिचे हे साडी नेसणे त्यांना ‘ok’ वाटते.
आता त्यांच्या संवादातून तिचा तमिळ पणा आणि मलयाली संस्कृतीबद्दलचे अज्ञान व्यक्त होते, कारण तमिळ संस्कृती मध्ये कुर्ता घालण्याची पद्धत नाही.
(मी हे अगदी १००% सत्य सांगतोय, कारण मी जेव्हा तमिळनाडूतील दक्षिण-पूर्व जिल्ह्यांमध्ये फिरायचो तेव्हा मी घातलेला कुर्ता(सदरा) पाहून लोक अचंबित होऊन पहायचे, कॉलेजची मुले हात लावून बघायची अगम्य म्हणून !)
आता तो कुर्ता आहे हे कळल्यावर जॉर्ज आवर्जुन तमिळमध्ये ‘केरला सारी, सुपरार्क’ असे अगदी कोडाई लहेजात म्हणत तिच्या तमिळ संस्कृतीचा आदर करत तिच्यामध्ये आपले ‘गुंतलेपण’ ठसठशीतपणे दाखवतो.
म्हणजे हे गाणे आणि हा प्रसंग फक्त एकमेकांची स्तुती आणि ते फुलणारे दोघांचे प्रेम नसून ते त्यामागचे त्या दोन भिन्न पण सुंदर असणाऱ्या संस्कृतींचे उत्तम मिलन आहे असे मला वाटते.
* थोडे गाण्यातील ओणमचा प्रसंग गाण्याच्या उत्तरार्धात निवडल्याबद्दल _
गाणे हे प्रेयसीला मलर (फुल) असे संबोधत फुलवले आहे आणि ओणम हा तर ‘केरळी’ संस्कृतीत दिवाळीपेक्षाही मोठा सण , तोही फुलांचा ! ! त्यामुळे गाण्यातील मलर सणांच्या मलरशी साधर्म्य दाखवत हे गाणे एका सुगंधी उंचीवर नेऊन ठेवते.
गाणं आवडलं. गाण्याची
गाणं आवडलं. गाण्याची कॉन्टेक्स्ट सांगितलीत हे बरं केलंत नाहीतर नेहमीचं प्रेम गीत वाटले असते.
एक सजेशन जमले तर - तुम्ही एक एक लाईनचा अर्थ दिला आहे तो खालच्या ओळीत न देता त्याच रेषेत पुढे देऊ शकाल का? कारण वाचताना दोन्ही भाषा एकत्र होऊन रसभंग होतो आहे.
विजय येसूदास हिंदीत का नाही गात? आवाज चांगला आहे त्याचा.