Submitted by विनोद इखणकर - श... on 2 June, 2024 - 01:08
शीर्षक :- माणसं
सुकलेल्या पानांना जाळतात ही माणसं
नंतर राख झाल्यावर रडतात ही माणसं
खचलेल्या भिंतींना देतात आधार कशाला?
उपकार सुद्धा हसून सांगतात ही माणसं
क्षणाक्षणाला देतात इतक्या यातना
इथे जिवंतपणीच मारतात ही माणसं
सुरकुत्या चेहऱ्याला आनंदी ठेवण्यास
दोन शब्द ही बोलणे टाळतात ही माणसं
आज ना उद्या देह हा विझणारच
मग मीपणाचा गर्व का बाळगतात ही माणसं
- विनोद नंदू इखणकर
नाशिक (शब्दप्रेम)
७३५०९७०२०१
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलीयं कविता..!
छान लिहिलीयं कविता..!