विकास , विध्वंस आणि विवेक : प्राथमिकतेवर बोलू काही

Submitted by रघू आचार्य on 18 May, 2024 - 10:05

The cost of our success is the exhaustion of natural resources, leading to energy crises, climate change, pollution, and the destruction of our habitat. If you exhaust natural resources, there will be nothing left for your children. If we continue in the same direction, humankind is headed for some frightful ordeals, if not extinction.

- Christian de Duve

दोस्तहो,

रूदरफर्डला अणूचं मॉडेल समजलं त्यातून आधुनिक विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. त्याला अणूचं मॉडेल सापडलं ते ही जुगाड टेक्नॉलॉजीने. थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल इज ब्लाईंड यावर त्याचा विश्वास होता. प्रॅक्टीकल शिवाय थिअरी मांडणार्‍यांबद्दल त्याचं मत फारसं चांगलं नव्हतं. मात्र पुढे पुढे थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल हे जिनीअस असण्याचं लक्षण झालं. आईनस्टाईन तर त्याची लॅब म्हणजे त्याचे पेन किंवा ब्रेन आहे असे म्हणायचा. इथे आपल्याला या वादात पडायचं नाही. याचा संदर्भ पुढे येईल.

या वैज्ञानिक क्रांतीला विज्ञान म्हणायचे कि अप्लाईड सायन्स म्हणायचे हे ठामपणे सांगता येणार नाही.
विज्ञानाचे नियम माणसाला माहिती असावेत. पण त्याच्या किती आहारी जायचे, त्याचे दुष्परिणाम काय होणार हे सुद्धा त्याच वेळी त्याला शिकता यायला हवे होते. तसे ते झालेले नाही. प्रॅक्टीकल मुळे त्याचे दुष्परिणाम समजले असते. आईनस्टाईनच्या डोळ्यादेखतच अणूचा वापर विध्वंसक कामासाठी होताना त्याने पाहिला आणि तो ही त्याला थांबवू शकला नाही.

एखादी लस किंवा औषध बाजारात आणायचे असेल तर त्यासाठी केव्हढी मोठी प्रक्रिया आहे. ती लस माणसाला टोचायच्या आधी तिचे दुष्परिणाम काय आहेत हे पहावे लागते. ते तपसणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्यावर जागतिक संस्था आहे. याशिवाय या किचकट चाळणीतून गेल्यावरही पुढे काही संकट आलेच तर ते औषध मागे घ्यायला लागू शकते अशी व्यवस्था निश्चितच अस्तित्वात आहे ( असे होते कि नाही हा मुद्दा बाजूला ठेवू). औषधाचा शोध लावण्यापूर्वी माणसावर दुष्परिणाम होणार नाही ही जबाबदारी आपण घेतो. ती हमी आपण देतो. पण इतर शोधांचे काय ? त्याचा मानवी जीवनावर किंवा पृथ्वीवर, अंतरिक्षावर काय परिणाम होईल हे तपासण्याची व्यवस्था आहे का ?

आणखी एक उदाहरण पाहूयात.
American Society of Heating, Refrigerating, and Air Conditioning Engineers या संस्थेच्या हँडबुक मधे कंफर्टची व्याख्या केलेली आहे. २००१ च्या आवृत्तीनुसार कंफर्ट म्हणजे वाहेरच्या तापमानापेक्षा पाच ते दहा अंशाने कमी तापमान ठेवणे. (आतले तापमान आणि बाहेरचे तापमान यात यापेक्षा फरक असल्यास थर्मल शॉक बसून उपभोक्ता मृत्यूमुखी देखील पडू शकतो) . वास्तविक एसीच्या संदर्भात कंफर्ट म्हणजे बाहेरच्या तापमानापासून सुसह्य वाटेल इतका तापमान बदल. त्यापेक्षा थंड करणे या मानवी स्वभावामागे सुखासीनता, हव्यास कारणीभूत आहेत. गरज आणि आरामाचा हव्यास यातली निवड करता यायला हवी.
अ‍ॅश्रेच्या हॅण्डबुकवरून माणूस जेव्हां स्वतःसाठी शोध लावतो तेव्हां इशारेही देतो हे दिसते. . माणूस हा असा स्वार्थी प्राणी आहे.

पण त्याच रेफ्रिजरेशन मुळे तापमान बदलाला सुरूवात झाली. पर्यावरण, प्राणीजीवन यावर काय परिणाम होतील यावर मनुष्य उदासीन असतो. इतकेच काय स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना लस टोचली जाते. रेडीएशनच्या प्रयोगांसाठी मुक्या जिवांचा वापर होतो.
माणूस असा बेदरकार आहे.
अर्थात अ‍ॅश्रे ने सुधारणा करत पर्यावरण स्नेही वायूंचा वापर अनिवार्य केला आहे त्याचे स्वागत. त्यामध्ये विवेकवाद्यांचे योगदान आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर जे जे शोध लागत गेले त्यांना अशा चाळण्या / चाचण्या अस्तित्वातच नव्हत्या. कारण एका बाजूला ध्येयाने झपाटलेली वैज्ञानिक कम्युनिटी, त्यांना प्रोत्साहन देणारी उत्पादक मंडळी आणि दुसर्‍या बाजूला या पासून अनभिज्ञ जनता. या असमतोलामुळे वैज्ञानिक शोध लागले त्यापेक्षा ते झपाट्याने वापरात आले. तंत्रज्ञान विकसित होते गेले आणि मग काही काळाने या विज्ञानाशी जुळवून घेतलेल्या सामान्य जनतेला त्याचे भान आले. त्यातूनच मग दुष्परिणामाची तपासणी कराविशी वाटू लागली.

माणसाच्या कंफर्ट साठी वातानुकूल यंत्रणे आणि शीतकपाटं विकसित झाली. त्यासाठी पूर्वी फ्रिऑन गॅसेस वापरले गेले. ते पर्यावरणस्नेही नाहीत हे समजायला पाच दशकं जावी लागली. या काळात पर्यावरणाचे व्हायचे ते नुकसान झाले. त्यानंतर आर सिरीज गॅसेसचा वापर सुरू झाला. मग तिसर्‍या जगातून ओरड सुरू झाली कि आता तिसर्‍या जगाने उत्पादन सुरू केल्याबरोबर मुद्दामून हे निर्बंध आणले गेले आहेत, जेणे करून पाश्चात्य देशांचीच उत्पादने सक्तीची व्हावीत. यात तथ्य असेलही. पण पर्यावरणाच्या लढाईला असा आर्थिक असमतोलाचाही कोन प्राप्त झाला.

जगातला अणूकचरा तिसर्‍या देशात आणून टाकून द्यायला सुरूवात झाली. आफ्रिकन देशातल्या त्या त्या भागात माणूसच नाही तर प्राण्यांवर आणि वनस्पती, झाडांवरही विकृत परिणाम दिसू लागल्यावर ते बंद झाले.

सगळी यादी देणे हा इथे उद्देश नाही. विज्ञानाला विरोध हा सूर इथे नाही.

तर कोणतेही शोध लागले तर त्याच्या वापराआधी जो विरोध होतो त्याचे समाधान झाले पाहीजे. त्या उलट काही हुषार वादविवादपटूंची नेमणूक केली जाते. ते अशा आक्षेपांची नोंद घेतात. मग या आक्षेपांना गप्प करणारी उत्तरे तयार केली जातात. हे टूलकीट त्या त्या वापरकर्त्याच्या एजन्सीला दिले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. अशा सेवा घेणार्‍या कंपन्या एकत्रित रित्याही नरेटिव्ह सेट करायच्या मागे लागतात. आता तर व्यापारी संघटना आहेत, उत्पादक संघटना आहेत. नव्या उत्पादनाच्या भावी आक्षेपांना मोडीत काढणार्‍या पीआर एजन्सीजचे हे सुगीचे दिवस असतात.
घरात मोबाईल आला कि जुन्या जमान्याच्या वैभवाच्या खुणा मिरवणारं ओसरीत बाजेवर पडीक असणारं एखादं म्हातारं ओरडतं " आरं, कशाला ते डबडं आणलंय ? त्याच्या वाचून अडलं व्हतं का काय ?"
त्याला पोरं उत्तर देतात " ओ आबा, गप बसा, आताच्या जमान्यात हे लै गरजेचं हाय"
" आरं पर त्यानं नुस्कान काय व्हणार ते कोन बगनार ?
" आबा, तुमीच सांगा कि काय नुक्सान हाय ते "
" आता मला समजलं असतं तर बसतं व्हय सांगितलं ?"
" मंग नाय माहीत तर कशाला नुस्तंच आडवं लावता ?"
"बरं बाबा राह्यलं "
प्रॉब्लेम हा इथे आहे.
म्हातार्‍याला जे म्हणायचं असतं त्याचा आत्मा पोरांना समजूनच घ्यायचा नसतो. आपल्याकडे मोबाईल नसणे हे आपण आउट ऑफ डेट झाल्याच्या पीअर प्रेशरखाली मोबाईल घेतला जातो. त्यात फोन सोबतच इंटरनेट, टिव्ही, ओटीटी या सर्व सुविधा मिळू लागतात. हे सर्व आपल्याला परवडतं का ? याचा उपयोग आहे का याचा विचार मागे पडतो.

सिंहगड रस्त्याच्या दुतर्फी असलेली हिरवीगार झाडे तोडण्यासाठी मनपाने हुकूम काढला कि त्याला विरोध सुरू होतो. मग या विरोधकांना जनतेचा सपोर्ट मिळू नये यासाठी त्यांचे खलनायकीकरण, गुन्हेगारीकरण, दानवीकरण केले जाते. या मंडळींना विकृत, लहरी ठरवले जाते. त्यांना विकास विरोधी ठरवले जाते. "मग काय धोतर नेसून फिरायचे का ? " "तुम्ही वल्कले नेसून फिरता का ?" किंवा झाडांना इजा पोहोचवायची नसेल तर मग "तुम्हाला बर्थडे सूटमधेच फिरावे लागत असेल ना ? कारण पानांची वस्त्रे हा सुद्धा गुन्हाच आहे" अशी तयार वाक्ये फेकली जातात.

सामान्य माणसे मुद्दे मांडत असतात. ते वादविवादपटू नसतात. व्यावसायिक ट्रोल्सना ते उत्तरं देऊ शकत नाहीत हे या एजन्सीजने हेरलेले असते. याचा परिणाम म्हणून विरोधाच्या बाजू लंगड्या, दुबळ्या आणि क्षीण पडतात. शिवाय विध्वंसाच्या बाजूने भांडवल असते. भांडवल प्रसार माध्यमांनाही नियंत्रित करते. हा एक सुसंघटीत माफिया आहे. हा विकास खरोखर माणसाच्या भल्यासाठी आहे का ?

माणसाला जगण्यासाठी काय लागते ?
उपग्रहांचे शोध लागले तर हवेच आहेत. अंतरीक्षाचा शोध अनादि काळापासून माणूस घेत आला आहे. त्याबद्दल ना नाही. इथे विवेकाची नितांत आवश्यकता आहे. पण अवकाशात होणारा कचरा पुढे विश्वाच्या नाशाला कारणीभूत होईल का याची उत्तरे कधी शोधणार ? दुष्परिणामांचा शोध लावणे हे जिनीअस असणे नाही का ? त्यासाठी बुद्धी लागत नाही का ? माणसाला फॅन्सी वाटतील, लक्झरी वाटतील अशा शोधांचे जनकत्व आपल्याकडे असावे हा इगो आहे का ? या शोधांचे दुष्परिणाम समोर आणणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे का ?

एका व्हायरल क्लिप मधल्या दाव्यांनुसार पृथ्वीवरचे ६५% जीवन गेल्या दोनशे वर्षात नष्ट झालेले आहे. अर्थात या क्लिपचा उद्देश चांगला असला तरी काही तथ्या़ंकडे दुर्लक्ष झाले आहे. जसे कि अरल समुद्र हा तापमान बदलामुळे आटला. खरे तर तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या १९६७ सालच्या अजस्त्र आणि महत्वाकांक्षी जलसंधारण योजनांमुळे जी महाकाय धरणांची मालिका या अरल समुद्राच्या फीडर नद्यांवर उभारली गेली त्यामुळे पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने अरल समुद्र नाहीसा झाला. तपशीलात चूक असली तरी या टीमने गेल्या काही वर्षात पृथ्वीची जी असंख्य छायाचित्रे घेतली आहेत त्यामुळे विकासाचा विध्वंस समोर आलेला आहे. अर्थात त्या वेळी या शंका उपस्थित झाल्याने नवा व्हिडीओ प्राप्त झाला.
https://www.youtube.com/watch?v=UHkEbemburs

हे थांबवणे आपल्या हातात आहे का असा विचार येतो.
असा विचार मांडणारे सगळे मूर्ख, अर्धवट, विकृत म्हणून हल्ला करायला येताना थोडे थांबले पाहीजे. माणूस बुद्धीजीवी आहे हे कबूल. पण त्याचा अरोगन्स नियंत्रित असायला हवा. त्याला विवेकाची जोड हवी. जाणून घेणे, शोध लावणे इथपर्यत आम्ही इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा अरोगन्स कुरवाळायला ना नाही.

पण विद्वत्तेला विवेकाची जोड असावी हे सुद्धा माणसाच्या बुद्धीवंत असण्याचेच लक्षण आहे. विद्वत्ता आणि शहाणपणा १८० अंशाच्या कोनातून एकमेकांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तसे ते गेले कि हिरोशिमा, नागासाकी घडते. अर्थात कोणतेही युद्धखोर शस्त्रे हे विवेक नसल्याचेच लक्षण आहे.

म्हणूनच जीवन जगण्याची कला सांगणारे तत्त्वज्ञान (ज्याला जे झेपेल ते) ते सुद्धा शिकायला हवे. समाजाला मिळून मिसळून रहायला लावणारे तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आत्मसात केले पाहीजे. ते ही शिकवायला हवे. शाळेपासून त्याची सुरूवात हवी. दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल लागला कि विज्ञान आणि गणितात किती गुण पाहिले जाते. जणू काही इतर ज्ञानशाखा आता रद्द झालेल्या आहेत असा समज झालेला आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि विज्ञानाचा अहंकार यातला फरक समजेनासा झालेला आहे.

पृथ्वी वाचवण्यासाठी शौचाला फ्लश ऐवजी बादली वापरा, स्नानाला शॉवर ऐवजी मगाचा वापर करा अशा फुटकळ मललमपट्टीपेक्षा आणि बाह्य इलाजापेक्षा आतला इलाज महत्वाचा आहे. आपल्या वैज्ञानिक युगात विज्ञानासोबत जगताना आपल्या चुकीच्या धारणांचा सामना करायला हवा. त्या धारणा चुकीच्या आहेत याची कबुली आधी स्वतःला दिली पाहीजे. मग निसर्गाची क्षमा मागायला हवी.

चंगळवाद, हव्यास, लालसा या गोष्टींवर मात करता येण्यासाठी किमान गरजा ठाऊक असायला हव्यात. एक अपारंपारिक उर्जास्त्रोतांना वाहून घेतलेले जर्मन शास्त्रज्ञ शेफलर होते. त्यांनी सूर्यापासून, पवन उर्जेपासून आणि अन्य आपारंपारिक स्त्रोतांवर चालणारी अनेक संयंत्रे विकसित केली आहेत. पण हे शोध हस्तांतरित करताना ते त्यांच्या विद्यार्थ्यांना विवेकाची कास धरायचा आग्रह धरतात.

त्यांचे संशोधक विद्यार्थी घरात फ्रीज वापरत नाहीत, एसी वापरत नाहीत. या गोष्टींच्या आहारी जात नाहीत. त्यांचे एक विद्यार्थी वलसाडला आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या घरात तर वीजही नाही. रात्री सोलर कंदीलाचा वापर होतो. टिव्ही नाही. टिव्हीवरच्या डिबेटस हे वैचारीक प्रदूषण आहे असे ते म्हणतात. त्यांच्या सहवासात येताना हेच विचार विस्कळीत स्वरूपात होते. गेल्या वीस वर्षांपासून मी ही टिव्ही कमी म्हणजे जवळपास बंद केला आहे. काहीही नुकसान होत नाही.

मास उत्पादन जिथे अनिवार्य आहे तिथे ते घ्यावे. पण त्याचा अ‍ॅण्टीडोटही शोधून काढावा असे ते म्हणतात. ते जन्माने हिंदू, कर्माने वैज्ञानिक , तत्वाने जैन, बौद्ध आणि ओशो यांचे मिश्रण आहे. ते झेन सुद्धा आहेत. जे चांगले वाटते ते आत्मसात करावे. स्वतःवर नियंत्रण मिळवले कि गरजा कमी होतात. उपभोक्त्याच्या गरजा कमी झाल्या कि उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाले कि पृथ्वीचा नाश थोडा मंदगतीने होतो हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यासाठी धर्माचे बंधन नाही. हा मूलतत्ववाद आहे असे वाटत नाही. ते ही त्यांच्या विद्यार्थ्यांना हा विचार देतातच.
विज्ञान या पद्धतीने जबाबदारीसहीत आणखी पुढे गेले तर काय हरकत आहे ?

आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जन...

अशा पद्धतीने ही लोकहितवादी चळवळ पुढे गेली पाहीजे. जितकी जास्त वर्षे लागतील तितका झालेला विध्वंस पुन्हा भरून काढता येणार नाही. पण अशी चळवळ न चालवता नुसतेच उसासे सोडून हा विध्वसं थांबणार नाही.

Saving our planet, lifting people out of poverty, advancing economic growth… these are one and the same fight. We must connect the dots between climate change, water scarcity, energy shortages, global health, food security and women’s empowerment. Solutions to one problem must be solutions for all. – Ban Ki-moon

******************************************

लेख त्रोटक शब्दात असल्याने अधिकचे संदर्भ. प्रतिसादात देखील दिलेले आहेत. देत राहणार आहे.

भारतात येत असलेले विध्वंसाचे संकट आणि उपाय
https://www.youtube.com/watch?v=5At6eVbXNck

व्यक्ती म्हणून काय करता येऊ शकते ?
https://www.youtube.com/watch?v=CeWkPMqupDI

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा विचार असा की एक दोन शतकानंतर पृथ्वीची झालेली परिस्थिती बघून त्यावेळच्या पिढीला शहाणपण सुचेल आणि युद्धपातळीवर निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील , जे जे शहाणपण आज मोजक्याच लोकांना पटतं आहे ते त्यावेळी पूर्ण लोकसंख्या मनापासून पाळेल , कंपन्या - फॅक्टऱ्या लोकमताच्या , राजकिय दडपणाच्या खाली असतील आणि कोणतीही निसर्ग विघातक कृती करायला धजावणार नाहीत , किंबहुना ते चालवणारे लोकही शहाणपण आलेल्याच नव्या पिढीतील असल्यामुळे क्षुद्र आर्थिक स्वार्थासाठी निसर्गाचा विध्वंस करावा असं त्यांना वाटणार नाही .

एक दोन पिढ्यांनंतर कदाचित मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल प्रचलित होईल .. खंडीभर वस्तू , ब्रँडेड महाग वस्तू घेऊनही असमाधानी आहोत हे लक्षात येऊन नवीन पिढी साध्या आयुष्याकडे वळून समाधानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल . >>> आशावाद आवडला. छान पोस्ट राधानिशा.

साधना, प्राचीन,मी अनु सर्वांचे आभार.

प्रतिसाद जास्त असंबद्ध वाटला तर सोडून द्या.विषय जिव्हाळ्याचा असल्याने मत लिखना तो बनता है >>>अनुजी, अजिबात असंबद्ध नाही प्रतिसाद. रिसायकल्ड वस्तू हा सध्या तरी चांगला उपाय आहे. जोपर्यंत त्याचा वापर कमी असेल तोपर्यंत किंमती जास्त राहणारच. आठवतंय ना सुरूवातीचे टेक्स्ट डिस्प्ले असलेले, आकाराने मोठे मोबाईल पन्नास साठ हजारांना मिळायचे, इनकमिंग १६ रूपये प्रति मिनिट असायचे. जागृती होत गेली आणि खप वाढला कि किंमती कमी होत जातील.

(कुणाचा प्रतिसाद असंबद्ध असला तरी ते वैयक्तिक मत म्हणून सोडून द्यायला हरकत नाही याच्याशी शंभर टक्के सहमत. अ‍ॅग्रेशन सुद्धा सोडून द्यायला हरकत नाही. पण स्ट्रॉ मॅन ऑर्ग्युमेण्ट वाचकांच्या सूज्ञपणावर विसंबून सोडून द्यायला अद्याप जमत नाही Sad )

एसी,कंफर्ट यावरून काही प्रतिसाद होते. तो या धाग्याचा विषय नाही खरे तर. हा टेक्निकल विषय आहे. धागा टेक्निकल विषयाशी संबंधित ललित लेखाचाच विषय आहे. मिनिमलिस्ट लाईफस्टाईलशी संबंधित आहे.

जे लोक दिवसभर एसीत बसून राहतात त्यांना थर्मलशॉकचा सामना करावा लागणार नाही. पण हे जवळपास अशक्य आहे. बाहेरच्या अनियंत्रित वातावरणात एकदा तरी जावेच लागणार. त्या वेळी टप्प्याटप्प्याने बाहेर जाणे शक्य आहे. सकाळ मधे खूप वर्षांपूर्वी झेलम एक्सप्रेस मधून बाहेर जळगाव स्टेशनला उतरल्यावर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी होती. त्यावर चर्चाही झाल्या होत्या. ट्रेनमधले तापमान खूपच कमी होते त्यामुळे थंडी वाजत होती. पण एसी अटेंडंट कुठेच नव्हता असे चौकशीत समोर आले होते. झेलम लेट झाल्याने दुपारच्या वेळी जळगाव ला पोहोचली. बाहेर तापमान ४५ अंशाच्या पुढे होते. ट्रेन मधे १६ अंश होते असा प्रवाशांचा दावा होता.

टाईम्सच्या या लेखात सुद्धा एअर इंडीशनिंग म्हणजे बाहेरच्या आणि आतल्या तापमानात १५ ते २० डिग्रीचा फरक ठेवणे. म्हणजे सुसह्य वाटणे.
अ‍ॅश्रे हॅण्डबुक हे जगभरातल्या एसी आणि रेफ्रिजरेशन व्यावसायिकांचे हॅण्डबुक आहे. यात दहा डिग्रीचा फरक पुरेसा आहे असे म्हटलेले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/stepping-out-into-the...

acclimatization ( मराठीत अचूक शब्द नाही) म्हणजे वातावरणाशी जुळवून घेण्याची शारीरीक क्षमता. जेव्हां आठ हजार फूटांपेक्षा उंचावरच्या ठिकाणी आपण जातो तेव्हां त्याचे काही नियम आहेत. फौजी मंडळींना जेव्हां अशा ठिकाणी पोस्टिंग मिळते तेव्हां या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आठ दिवस दिले जातात. कुठलेच शारीरिक श्रमाचे काम दिले जात नाही. इथे ऑक्सिजन ६० टक्के असतो. त्यामुळे श्वास घेताना त्रास होतो. एकदा या वातावरणाशी जुळवून घेतले कि आपली फुप्फुसे त्या पद्धतीने काम करू लागतात.

इथल्या कमी तापमानाशी जुळवून घ्यायला मात्र वेळ लागतो. तोपर्यंत वर्षभर स्वतःला प्रोटेक्ट करावे लागते. पण प्लस २ , ३ किंवा ५ डिग्री तापमान जे एरव्ही आपल्याला थंड वाटले असते त्याच्याशी शरीर जुळवून घेते. उणे तापमानात मात्र शरीराच्या शिरा रक्त गोठल्याने फुटतात. सबझिरो तापमानाचे होणारे परिणाम फ्रॉस्टबाईट, ब्लिस्टर असा सर्च देऊन पहा.

माउंटेनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टीट्यूट , औली इथे हे सर्व प्रशिक्षण देतात. दार्जिलिंगला सुद्धा अशी संस्था आहे.
इथे कंफर्टची व्याख्या ही बाहेरच्या वातावरणापेक्षा कमीत कमी बदल ठेवून सुसह्य वाटायला लागणे हा आहे ज्यामुळे आत बाहेर केल्याने तापमान बदलाचा शरीरावर अनिष्ट परिणाम होणार नाही.

याच हॅण्डबुक मधे कंफर्टच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत हे सांगितलेले आहे. आपण इंजिनियरिंग सिस्टीम डिझाईन करतो तेव्हां तज्ञांनी निर्धारीत केलेली मूल्ये लक्षात घेऊन आदर्श तापमानाची शिफारस करतो तेव्हां असे संदर्भ हाताशी लागतात.

एसीचे तापमान कमी ठेवल्याने क्षमता वाढणे हा इथे दूरान्वयेही संबंध नसलेला मुद्दा आहे.

माझा स्वतःचा अनुभव असा आहे कि आपल्या शारीरिक क्षमतांची आपल्याला ओळखच नसते. आपण नेहमी प्रोटेक्टेड वातावरणात रहायचा प्रयत्न करत असल्याने या क्षमतांना आपण संधीच दिलेली नसते.

एसीचा मुद्दा यासाठीच घेतला होता.
हळू हळू आपण बाहेरच्या तापमानाला जुळवून घेण्याची शरीराला सवय लावली तर शारीरीक क्षमता विकसित होतात ( किंवा इनबिल्ट कॅपॅसिटी एक्स्पोजर मुळे काम करू लागते). अर्थात ते तापमान धोक्याची पातळी ओलांडत नसेल तेव्हां. कडाकाच्या उन्हाळ्यात जर सकाळीच बाहेर पडलेलो असू तर दुपारचे उन तितकेसे बाधत नाही. तेच जर सकाळपासून घरात एसी, पंखा किंवा नैसर्गिक थंड घरात बसून असू आणि दुपारी एक दोन वाजता बाहेर पडायची पाळी आली तर उन्हाचा त्रास होतो हा आपल्या सर्वांना अनुभव असेल.

म्हणून आपली नेमकी गरज काय आहे याचा विचार मनात येतो.
पुन्हा एकदा - या लेखाचा विषय टेक्निकल गोष्टींवर खोलात जाऊन चर्चा करणे हा नाही. या गोष्टी माहिती आहेत function at() { [native code] }हवा गुगलवर / पुस्तकात उपलब्ध आहेत. धागा भरकटू नये यासाठी तुमचेच म्हणणे योग्य असा पवित्रा घेत संबंधितांची माफी मागावी लागली तरी चालेल.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_energy_consumption_pe...
पहा जगात आपण कोठे आहोत. आपण उर्ज्वा कमी वापरावी हे म्हणजे जगाचा अन्न धान्याच्या दुशाकालाचा प्रश्न सोडवण्या साठी भिकाऱ्यानी उपास करण्या सारखे आहे. हसू नका. भारतात एके काळी अन्न टंचाई होती. त्यावर उपाय म्हणून आपल्या एका आदरणीय नेत्याने उपाय सुचवला होता कि प्रत्येक भारतीयाने आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. आपली अन्न टंचाई संपली ती विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांनी घडवलेल्या हरित क्रांती ने. उपास करून नाही.
आपला नाजादिकच्या भविष्यकालातला प्रश्न हा आहे कि क्रूड तेलाचे साठे संपत येत आहेत. आपले अर्थशास्त्र हे क्रूड तेलावर आधारित आहे. मोठ्या प्रमाणात. २०५० हे कटऑफ वर्ष आहे. तो पर्यंत मार्ग सापडायला पाहिजे.
आणि माझा विश्वास आहे कि शास्त्रज्ञ तो शोधून काढतील. हा टेक्नो-ललित धागा असल्याने त्या बद्दल इथे काही लिहिणे उचित नाही.
हे धाग्याच्या विषयाशी संबंधित नाही किंवा स्ट्रोमन का काय ते आर्ग्युमेंट आहे असे वाटत असेल क्षमा करा.

आपण उर्ज्वा कमी वापरावी >>> असा अर्थ कसा काढला हे कळेल का ?
कि प्रत्येक भारतीयाने आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. >>> या अर्थाचे एखादे ऑर्ग्युमेण्ट मूळ पोस्ट मधे किंवा नंतरही असेल तर दाखवावे. उपकृत राहीन.
आणि माझा विश्वास आहे कि शास्त्रज्ञ तो शोधून काढतील >> शास्त्रज्ञ शोधून काढतील म्हणजे इतरांना काहीही से नाही काय ? क्रूड ऑईलला पर्याय सापडले आहेत. सापडतही आहेत. त्यामुळे हा विषय आहे किंवा नाही हे मुद्दामून सांगण्याची आवश्यकता नाही.
टेक्नो-ललित >>> लागू नसलेले मुद्दे न आणता हा उपहास केला असता तर दाद देता आली असती.
तुमचा विज्ञानावर विश्वास आहे हे उत्तम आहे. त्याबद्दल आपण सत्कार ठेवूयात. पण त्याचा अर्थ लेखात विज्ञानाचा धिक्कार केला आहे असा आपण काढलेला नाही असे गृहीत धरतो. जगात जेव्हढे शोध उपभोगासाठी लागतात त्यासाठी खनिज किंवा नैसर्गिक स्त्रोत खर्च होतात यावर विज्ञान मार्ग काढेल असे आपण म्हटलेले आहे. हे झाले भविष्य. आज यावर विज्ञानाने मार्ग काढलेला नाही. त्यामुळे विज्ञान मार्ग काढणारच आहे म्हणून कुणीच विचार करू नये का ? हातावर हात ठेवून बसावे का ?
फक्त वैज्ञानिक जगाची काळजी करू शकतात असा नियम तर नाही ना ? इतर सामान्य व अज्ञानी लोक त्यांच्या बुद्धीला झेपेल अशा उपायांची चर्चा करू शकतात ना ?
विषय समजून घेऊन प्रतिसाद देऊ शकता. स्वागत आहे.
अर्थात बालबुद्धीचा लेख असल्यास आपणच फाट्यावर मारू शकता.

मग काय डिलीट करू? माझा गैरसमज झाला कि सब मामला उर्ज्वेः बद्दल आहे? माझे सर्व प्रतिसाद त्या अनुषंगाने होते. तो इस्सू नाही ये का? तेव्हाच सांगायचे होते ना.
मग प्रॉब्लेम काय आहे? का काहीही नाहीच आहे. म्या पामराला सीता रामाची कोण? हेच समजले नाहीये. हो सके तो ...प्लीज.
"विस्कळीत" ह्या शब्दाचा अर्थ आता समजला.

वैज्ञानिक जगताचे मायबोलीवरचे स्वयंतेजाने झळाळणारे एकमेव अधिकुत प्रतिनिधी आहात आपण सर. असे कसे बोलू शकता ?
आपण इतरांना क्षमा करावी एव्हढे थोर आहात असा समज आहे.

खाली कोट केलेला तुमचा प्रतिसाद अज्ञानामुळे समजला नाही. ऊर्जा, विज्ञान या विषयी असेल तर जमल्यास उलगडून सांगावे.
Fu!
पण चालेल.

Submitted by केशवकूल on 25 May, 2024 - 08:42

कसच कसच पण आभारी आहे. पण धाग्याचा मूळ हेतू काय आहे? तेव्हढे तरी सांगा. असे दिसते आहे कि सर रागावले आहेत. ते सांगणार नाहीत. मला नाही समजला असेल पण बर्याच लोकांना समजला असेल त्या पैकी कुणीतरी प्रकाश टाकावा.
आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जन...
माझ्या मते everything boils down to energy shortage.

अरेच्चा ! धागाच समजला नाही आणि टर देखील उडवलीत की. कमालच आहे.
धागा राजकीय नाही हे जरी मान्य असेल तर उपकार होतील. आपले सगळे म्हणणे मान्य करत मी आपली माफी मागत आहे.
आपण म्हणताय तेच योग्य आहे. धन्यवाद सर. आपण नेहमीच योग्य असता. __/\__

कुणी टर उडवली? कुणी चुका काढून दाखविल्या तर त्याला ट्रोल म्हणायचे. कुणी विरोधी मत नोंदवले की उडव त्याची सार्कास्तिक चेष्टा.
हे पहा
"स्वच्छ आणि मुबलक ऊर्जा , परवडणाऱ्या ( हि रिलेटिव्ह टर्म आहे ) दरात उपलब्ध झाली तर जगातील बरेच प्रश्न चुटकी सरशी सुटतील. पुढची जी काही युद्धे होणार आहेत ती या उर्जेपायी होणार आहेत असे मला वाटते. बऱ्याच लोकांना युद्ध पाण्यासाठी होईल असे वाटते, पण मुबलक ऊर्जा उपलब्ध झाली तर पाण्याची सोय करणे अवघड नाहीय. तूर्तास इतकेच."
Submitted by निवांत पाटील on 21 May, 2024 - 11:12
ह्यावर तुम्ही काही टिप्पणी केली आहे असे दिसत नाही. मी त्याबद्दल लिहिले तर मात्र ...
मुबलक उर्ज्वा मिळाली तर सगळे प्रश्न सुटतील.

आपण विद्वान आहात सर, आपली माफी मागितली आहे. मी इथे थांबतो.
तुम्ही म्हणत असाल मी रागावलो तर रागावलो. तुम्ही म्हणत असाल कि ट्रोल ठरवले तर ठरवले. तुम्ही म्हणत असाल कि विरोधी मत आहे तर ते विरोधीच मत आहे. यात कुणीही शंका घेऊ शकत नाही.
आपल्यासारख्या थोर विद्वानांची मी कोण चेष्टा करणार ?
हा लेख टेक्नो ललित आहे हे आपले निरीक्षण साकझम नाही हे मला पटलेले आहे. एक अडाणी म्हणून सोडून द्यावे.
थांबू का ? परवानगी ?

सर, अडाणी असल्याने झोपी गेलेल्याला जागे करण्याची कला अवगत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्याची सिद्धी अवगत नाही असे समजून क्षमा करून टाका. हाकानाका.

केकु
राग मानू नका. पण तुम्ही सुरूवातीलाच जर समजले नाही म्हटले असते तर चालले असते की. मी अनेक ठिकाणी समजले नाही असे म्हणतो. फारएण्डने पण म्हटले आहे. अशा वेळी लेखात दोष असण्याचा संभव असतो. ज्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतो. पण आपण जेव्हां काही गृहीत धरून चर्चा करतो आणि नंतर तसे नाही म्हटल्यावर विस्कळीत या शब्दाचा अर्थ समजला असा लत्ताप्रहार करायला जातो तेव्हां त्याला अर्थ उरत नाही. इग्नोरास्त्र उपसणे हाती आहे. पण एखाद्याची चर्चेत सहभागी होण्याची इच्छा मारावी असे मनापासून वाटत नाही.

कदाचित फार त्रोटक लिहीले असेल, कदाचित विस्कळीत असेल. पण इथे काही जणांना रोख समजला आहे. प्रतिसादातून पण ते जाणवलेले आहे. अशा वेळी काय समजलेले नाही हे इमॅजिन करून खुलासे करणे अशक्य असते. लेखाचा रोख कशावर आहे हे सुद्धा मागच्या काही प्रतिसादात सांगितलेले आहे. ते पुन्हा सांगणे प्रशस्त वाटत नाही इतकेच.

निपा यांनी उर्जेचा मुद्दा आणला आहे. तो त्यांनी भर घातली असे मी म्हटले आहे. निव्वळ तोच या धाग्याचा विषय आहे असे अजिबात नाही. जर मूळ हेडर मधे दिलेली लिंक मिस केलेली नसेल तर विषय कळायला अवघड नाही असे वाटते.

ताक : जी लिंक दिलेली आहे ते नासा मधे होते म्हणजे त्यांना आपण वैज्ञानिक म्हणायला हरकत नसावी. तसेच जर्मन शास्त्रज्ञ शेफलर यांचाही उल्लेख काही लेखात वैज्ञानिक असाच आहे. म्हणजे वैज्ञानिक सुद्धा ही चिंता व्यक्त करतात असे समजायला हरकत नसावी. अर्थात ते सर्टिफाईड वैज्ञानिक नाहीत असे काही असेल तर मला कल्पना नाही.

केकु
राग मानू नका. पण तुम्ही सुरूवातीलाच जर समजले नाही म्हटले असते तर चालले असते की. >>> एक मिनिट. सुरवातीला मला वाटतं होतं कि मला समजले आहे. मग शेवटी मला कळले कि लेखकाला काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही.(असे त्याना वाटतंय ) लेखात अनेक विषयांना स्पर्श केला गेला आहे.
पहा
१)पहिल्या चित्रावरून आणि कोट वरून असे वाटले कि इन जनरल हा लेख नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरा बद्दल असावा. कोट मध्ये पण एनर्जी क्रायसिसचा उल्लेख आहे. सध्या जगात ह्या बद्दलबरेच विचार मंथन चालू आहे.
२)त्यानंतर अणु बद्दल चर्चा आहे. अणुबॉम्ब इत्यादी ओघाने आलेच.
<मात्र पुढे पुढे थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल हे जिनीअस असण्याचं लक्षण झालं. > हे हि एक वाक्य आहे.
विज्ञानामध्ये थिअरी आणि प्रॅक्टीकल हे हातात हात घालून चालत असतात. सायंटीफिक थिंकिंग मध्ये ह्या प्रक्रियेबद्दल चर्चा वाचायला मिळेल. कुणी कुणाला कमी लेखत असावेत असं मला वाटत नाही.
३)नंतर लेख HVAC कडे वळतो.
<अ‍ॅश्रेच्या हॅण्डबुकवरून माणूस जेव्हां स्वतःसाठी शोध लावतो तेव्हां इशारेही देतो हे दिसते. . माणूस हा असा स्वार्थी प्राणी आहे.> हे वाक्य आहे. थर्मल शॉकचे धोके विषद केले आहेत.
<अर्थात अ‍ॅश्रे ने सुधारणा करत पर्यावरण स्नेही वायूंचा वापर अनिवार्य केला आहे त्याचे स्वागत. त्यामध्ये विवेकवाद्यांचे योगदान आहे. > हे विवेकवादी शास्त्रज्ञ पण असावेत. नक्की कोण ? मला माहित नाही. कदाचित विवेकवादी शास्त्रज्ञ आणि इवील शास्त्रज्ञ असे दोन प्रकार असावेत.
४) आता मोबाईल वर चर्चा आहे. ही किती लोकांना पटेल ह्या बद्दल मी साशंक आहे. प्रॉब्लेम असा आहे कि अजनबी माणूस, विचार वा मोबाईल ह्या सगळ्याना लोक घाबरतात. आणि विरोध करतात.
५)त्यानंतर धागा सिंहगड रस्त्यावर येतो. तिथली झाडे तोडली गेली याबद्दल वाजवी दुःख व्यक्त केले आहे. त्यातल्या राजकारणावर कोरडे ओढले आहेत. वृक्षतोडीतून फायदा कुणाचा झाला? हा प्रश्न उपस्थित केला आहे.
६)<माणसाला जगण्यासाठी काय लागते ?> पण ही क्वेस्ट इथच थांबली आहे.
७)<पण विद्वत्तेला विवेकाची जोड असावी हे सुद्धा माणसाच्या बुद्धीवंत असण्याचेच लक्षण आहे> आहा. युरेका. मला वाटत हाच लेखाचा गाभा असणार. पण विवेकाची व्याख्या दिलेली नाही. ती तुमची तुम्हीच आपल्या सोयीनुसार करायची.
८)अपारंपारिक उर्जास्त्रोतांना वाहून घेतलेले जर्मन शास्त्रज्ञ शेफलर यांचा उल्लेख आहे. पुन्हा उर्ज्वा आली. म्हणजे मी काही मुद्द्यापासून फार दूर भटकलो नव्हतो. जरा बर वाटलं.
९) <त्यांचे संशोधक विद्यार्थी घरात फ्रीज वापरत नाहीत, एसी वापरत नाहीत.> का? नक्की काय कारण असावे ते समजले नाही.
१०) <स्वतःवर नियंत्रण मिळवले कि गरजा कमी होतात. उपभोक्त्याच्या गरजा कमी झाल्या कि उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाले कि पृथ्वीचा नाश थोडा मंदगतीने होतो हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे.> खूप विवादास्पद वाक्य. अस झाल तर आपली अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. किती लोकांच्या नोकऱ्या जातील?
११)<विज्ञान या पद्धतीने जबाबदारीसहीत आणखी पुढे गेले तर काय हरकत आहे ?> काहीही हरकत नाही. विज्ञानाला जे काय करायचे आहे ते करत राहील. आपण सांगितले म्हणून ते थोडेच ऐकणार आहेत.
१२) सेवती पुन्हा एक कोट आहे. त्यातही energy shortages चा उल्लेख आहेच.
शेवटी एव्हढेच पुन्हा लिहितो कि निपा ह्यांचा प्रतिसाद short and crisp आहे आणि अगदी यथा योग्य आहे.

विषयाकडे वळूयात.
राजस्थान मधे वाळवंटाचे रिस्टोरेशन केले गेले आहे. (मागच्या पानात सहारा वाळवंटाच्या विस्ताराला रोखण्यासाठी केलेले प्रयत्न दिले होते)
https://www.youtube.com/watch?v=79VUAFq2rbg

हे महाराष्ट्रातल्या पाणी फाउंडेशनबद्दल.
https://www.youtube.com/watch?v=bRBkw0mem6Q

हे प्रयत्न साध्या साध्या ग्रामस्थांनी केले आहेत हे विशेष.
एपीजे अब्दुल कलाम यांचे पुण्यातले एक भाषण याच विषयावर होते.

हा धागा सोडून अजून एका ठिकाणी मी ऊर्जा मुबलक उपलब्ध आहे आणि ती वाचवण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करून काही फरक पडणार नाही , अश्या आशयाचे काहीतरी वाचनात आले होते. पुन्हा इथे तेच आल्याने , कुंपणावरच्या लोकांना तेच कन्फर्म होऊ नये म्हणून मी ती कॉमेंट लिहली होती. लिहायचं इंटेंशन काय आहे यापेक्षा ते लिहून लोकांपर्यंत निगेटिव्ह इफेक्त्त पोहचत असेल तर ते चुकीचे होते.

मुळात सौर ऊर्जा फुकट आहे, स्वस्त आहे, मुबलक आहे असे स्टेटमेंट करण्याअगोदर त्याचा काँटेंटेटिव्ह स्टडी करणे महत्वाचे आहे. आजही सरकारी अनुदान , टॅक्स बेनिफिट आणि डीप्रिशिएशन बेनिफिट काढून टाकलं तर किती लोक सोलर पॅनल बसवायला तयार होतील हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट ऊर्जा साठवून ठेवण्याचा ( बॅटरी )आजचा खर्च हि खूप जास्त आहे. अणू ऊर्जेचे आज हि लिमिटेशन्स आहेत. गेल्या १० वर्षात आपला उर्जेवरचा खर्च किती वाढला आहे हे सामान्य लोकांच्या देखील लक्षात येईल. जर ऊर्जा मुबलक असती तर हा खर्च अवाच्या सव्वा वाढला नसता ना?

इथे ऊर्जा हि ढोबळ मानाने वापरलेली संज्ञा आहे, ज्यामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा ( अन्नधान्य ) देखील समावेश आहे.

बाकी मूळ विषयाबद्दल.

सामान्य माणसे मुद्दे मांडत असतात. ते वादविवादपटू नसतात. व्यावसायिक ट्रोल्सना ते उत्तरं देऊ शकत नाहीत>>>

लेखात लिहिल्याप्रमाणे एखादी गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहचवली जाते त्यावर लोकांचा त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन ठरत असतो. आपल्याकडे खूप कमी लोक लॉजिक लावून विचार करतात. फालोअर्स ची संख्या प्रचंड आहे, त्यांना एक नेता हवा असतो (हल्ली हल्ली इन्फ्लुएन्सर ) , त्यांना तो सापडला कि ते त्याला फालो करायला सुरु करतात. आपल्या कडे सगळ्या पीआर एजन्सीजचा याच तत्वावर काम करण्यासाठी वापर करून घेतला जातो.

पण विद्वत्तेला विवेकाची जोड असावी हे सुद्धा माणसाच्या बुद्धीवंत असण्याचेच लक्षण आहे>>> +१००

हि पृथ्वी आपल्या पूर्वजांची ठेव आहे आणि ती आपल्या नातवंडांना द्यायची आपली जबाबदारी आहे. आमच्या एका सरानी अश्या अर्थाचे कोट केला होत एका पेपर मध्ये.

दिल्ली मधे रेकॉर्ड ब्रेक ५२.९ अंश सेल्सिअस एव्हढे तापमान नोंदवले गेले आहे. या बद्दल काल सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हवामान खात्याने एव्हढे तापमान का नोंदले गेले याची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सर्स व्यवस्थित आहेत का हे तपासले जाईलच. पण जर तापमान योग्य असेल तर त्याची कारणेही दिली आहेत.

तापमान स्थानिक तापमानवाढीमुळे जास्त नोंदवले जाऊ शकते. जिथे इमारतींना काचेच्या भिंती आहेत तिथे उष्णतेची बेटं तयार होतात. या ठिकाणचे तापमान शहरातील इतर तापमानापेक्षा पाच ते सहा अंशापेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते.

दिल्लीच्या ज्या मंगेशपूर भागात उच्चांकी तापमान नोंदवले आहे तो भाग राजस्थानकडून येणार्‍या उष्ण वार्‍यांच्या वाटेत सर्वप्रथम येतो. म्हणजे इथे उष्णता सर्वात जास्त शोषून घेतली जाते. राजस्थानात ५१ अंश सेल्सिअस एव्हढे तापमान उच्चांकी नोंदवले गेले आहे. दिल्लीत इतर भागात
४५ अंश ते ४९.६ अंशापर्यंत तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे तीन अंशाचा फरक खूप मोठा वाटत नाही.

राजस्थानात एरव्ही ४९ अंशापर्यंत तापमान जाणे हे नॉर्मल आहे. जिथे जिथे हवामान खाते तापमान मॉनिटर करते तिथले हे तापमान आहे. लष्कराचे काही युनिटस गंगानगर पासून आत सीमेवर तैनात असतात. इथे ५५ अंशापर्यंत तापमान असल्याचे दावे केले जातात. पण इथे हवामान खात्याची यंत्रे नसल्याने हे दावे अधिकृत नाहीत.

दिल्लीला येणारे उष्ण वारे अरवली पर्वतामुळे रोखले जातात. पण अरवली पर्वतामधील १९० पैकी ८७ डोंगर बांधकाम माफियामुळे नाहीसे झालेले आहेत. त्यामुळे राजस्थानातले उष्ण वारे हे संपूर्ण भारतासाठी प्राणघातक संकट आहे. सरकारने अजून ८७ हा आकडा स्विकारलेला नाही. काही डोंगर नष्ट झालेत असे ते म्हणतात. हा माफिया रोखला नाही तर अरवली पर्वताच्या नावावर छोट्या टेकड्या शिल्लक राहतील.

( धाग्याचा विषय हाच आहे).

ह्या धाग्यावर बरेच दिवस झाले प्रतिसाद द्यायचा होता पण वेळ मिळत नव्हता आणि नेमकं काय लिहावं हे देखील ठरलं नव्हतं. एकूण विचार म्हणून जरी विस्कळीत मांडला असला तरी धाग्याचा विचार योग्य दिशेने आहे असं मला वाटतं. दोन एक वर्षांपूर्वी विज्ञान दिनाच्या निमित्ताने मी एक विज्ञानाची ऐशीतैशी असा एक लेख लिहिला होता ज्यात मी याच अर्थाचे काही विचार मांडले होते. या निमित्ताने त्या धाग्यावर देखील अधिक चर्चा झाली तर मला आवडेलच!
विज्ञान हे तर्काधिष्ठित आहे. पण त्या तर्काला विचार आणि विवेकाची बैठक ही मानवी बुद्धी जोडते. ती बैठक विज्ञानात by default नसते. अर्थात तर्क एकच असेल तरी विचार आणि विवेकातील भिन्नतेमुळे विज्ञानाचे उपयोजन अत्यंत भिन्न किंवा विरुद्ध दिशांना जाणारे होऊ शकते (उदा. अणुऊर्जेचा वापर). शिवाय आपली विज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेल्या विकासाबद्दलची बहुतेक चर्चा ही खरंतर तंत्रज्ञानाबद्दल असते जे उपयोजित विज्ञान आहे.
कारण विज्ञान हे केवळ संकल्पना म्हणून जाणणे हे तसे सामान्य माणसासाठी निरुपयोगी आहे. जोपर्यंत एखाद्या संकल्पनेचे आकलन आणि उपयोजन होत नाही तोपर्यंत ती केवळ माहिती असते.
या उपयोजनात विवेक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो थोडा सापेक्ष असतो. पण त्यातही विवेकी निर्णय घेताना विज्ञानाची मदत घेता येते. आत्ता माझ्या मते दोन मुद्दे आहेत ज्यांच्या आकलनासाठी विज्ञानाची मदत घेता येते आणि ज्याबद्दल स्पष्टता असली तर अनेक निर्णय सोपे होतात.
१. परिणामांची जबाबदारी - आज असं दिसतं की आपण बऱ्याच वेळा परिणामांची जबाबदारी टाळली आहे किंवा दुसरीकडे (विशेषतः निसर्गावर) ढकलली आहे (Externalization of the real cost). पण त्याने मूळ किंमत माफ तर होत नाहीच किंबहुना अनेकदा ती भविष्यात दामदुपटीने चुकवावी लागते. उदा. शहरांच्या वाढीसाठी (रस्ते रुंदीकरण इत्यादी) वृक्षतोड केल्यास भविष्यात शहरांत प्रदूषण, तपमानवाढ, पूर किंवा ढगफुटी, पाणी टंचाई इत्यादी समस्या उभ्या राहतात. याला जोडूनच पुढचा मुद्दा आहे.
२. लघु मुदतीत होणारा फायदा आणि दीर्घ मुदतीत होणार तोटा - जे निसर्गाला हानिकारक आहे ते अल्प मुदतीत माणसाच्या विकासाला पूरक वाटलं तरी त्याने दीर्घकालीन तोटे निर्माण होतातच. आपली दृष्टी फार सीमित असते. आज ४ वडापाव खाण्याने आणि व्यायाम न करता बैठी जीवनशैली जगण्याने मला २० वर्षांनी त्रास होणार आहे हे माहिती असून आपण सोय आणि आरामाला प्राधान्य देतो. आता इथे सोय आणि तात्काळ फायदा ह्या गोष्टी विज्ञान आणि विवेक यांच्या वरचढ ठरतात. हेच आपण मोठ्या प्रमाणावर करत आहोत. लघु मुदतीच्या फायद्याला प्राधान्य देऊन परिणामांची जबाबदारी तात्पुरती निसर्गावर ढकलणे याला आपण विकास म्हणतो आहोत. ही भूल पाडण्यात मोठा वाटा हा तंत्रज्ञानाचा आहे. आपल्याला ही जणू खात्री आहे की आपल्या आजच्या आळशी, लालची, आणि भोगी वृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नवीन तंत्रज्ञान भविष्यात उत्तरं शोधेल! एका प्रकारे हेही externalization of cost च आहे.
एकूणच, माझ्या मते, आपण बहुतांशी पर्यावरणाच्या संदर्भातील समस्यांकडे विज्ञानामुळे किंवा तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण झालेल्या समस्या म्हणून पाहतो. पण खरं तर या समस्या माणसाच्या वर्तणुकीमुळे निर्माण झालेल्या आहेत. आपण या समस्यांकडे जोपर्यंत behavioral issues म्हणून बघत नाही आणि तांत्रिक/वैज्ञानिक समस्या म्हणून बघू तोवर आपण खऱ्या उपायांपर्यंत पोचू शकणार नाही. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी जोवर माणसांच्या वर्तनात मूलभूत बदल घडत नाहीत तोवर विकास=विध्वंस हे समीकरण बदलणार नाही.

आपल्याला विकासाची व्याख्या करता येत नाही.
शहरातले भूजल कमी होतेय असा आतापर्यंत समज होता. पण संपूर्ण भारतात भूजलाची पातळी धोकादायक पातळीच्या खाली चालली आहे. आपला पाणीवापर ३३% भूजलावरच आहे. नद्यांचे पाणी त्याखालोखाल. ते १% आहे. पावसाचे पाणी नगण्यच आहे. निव्वळ भूजलावर अवलंबून असलेले ग्रामीण भाग मोठ्या संख्येने आहेत.

याचे शास्त्रीय सर्वेक्षण नाही. त्यावर धोरण नाही. जनजागृती उपाय योजना नाहीत.
लातूरसारख्या भागात पेयजलाच्या फॅक्टरीज आहेत. केरळात कोका कोलाची फॅक्टरी आहे. ती फॅक्टरी येणे हा विकास आहे असे ज्यांना वाटते त्यांन या प्रकल्पाने किती हजार वर्ग किमी परीसरातल्या विहीरी,तलाव आटवले हे पण पाहिले पाहीजे.

https://marathi.indiatimes.com/maharashtra/nagpur/nagpur-records-56-degr...

परवा दिल्ली आणि आज नागपूर , तापमान जेंव्हा ५० च्या वर नोंदलं गेलं , लगेच त्याचे सेन्सर खराब झालेच स्पष्ट केलं गेलं. जागतिक दबाव येईल म्हणून मॅनेज करत आहेत कि खरोखर सेन्सर खराब झालेत कळत नाहीय , कळणार पण नाही.

तापमान म्यानेज करावं कुणाला सुचलं असेल! आणि तापमान बघायला सेन्सर शिवाय analog पाऱ्याची लेव्हल नाही का आख्या शहरात कुठे? सेन्सर खराब झाला हे हास्यास्पद कारण आहे.

तापमान म्यानेज करावं कुणाला सुचलं असेल! आणि तापमान बघायला सेन्सर शिवाय analog पाऱ्याची लेव्हल नाही का आख्या शहरात कुठे? सेन्सर खराब झाला हे हास्यास्पद कारण आहे.

खूप माहिती मिळत आहे आणि विचारप्रवर्तक मुद्दे समोर येत आहेत.

सहज समजू शकेल अश्या पद्धतीने ते मुद्दे लिहिले जात आहेत.

Past 2 weeks temperature in Nagpur
यावरून ५६ अंश से चुकीचे असेल किंवा नाही अंदाज करता येईल का?

हवामान खात्याने त्या त्या ठिकाणी रोजाच्या तापमानाची नोंद करणे, आणि सेन्सर्स बसवून क्षणाक्षणाला नेटवर अपडेट्स देणारी प्रणाली या दोन्ही वेगळ्या गोष्टी असाव्यात. (अशी अपेक्षा आहे.) वेध शाळेत तपमान, हवेचा दाब मापनासाठी प्राथमिक मानक मोजमापन (पारा स्तंभ) उपकरणे असतीलच. (अशी अपेक्षा आहे.)

योग्य धागा न सापडल्याने जनहितार्थ.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान-वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दिनांक 5 जून ते 14 ऑगस्ट 2024 अखेर वन महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने वृक्ष रोपांची अल्प दरात उपलब्धता करून देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे उद्यान, जंगली महाराज रोड या ठिकाणी रक्कम रुपये पाच या अल्प दरात वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तरी वृक्षप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे
महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी ३२ लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्या माणसाची स्वतःची २० फूट जागा आहे, त्याने आज फक्त एक झाड लावले तर २२ कोटी झाडे थेट वाढतील आणि पुढच्या उन्हाळ्यात तापमान ३० अंश असेल. अधिक पाऊस.

केक/कपडे/बाईकवर हजारो खर्च केले जातात. पण आज थोडा विचार करा आणि बाजारात जाऊन २० रुपये किमतीचे रोप विकत घ्या आणि ते लावा, पुढच्या पिढीचा विचार करा. *मिशन ग्रीन महाराष्ट्र*

तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने हुकूम दिल्यास, किमान १० लोकांना हा संदेश पाठवा आणि सहकार्य करा. पुढच्या पावसाळ्यापर्यंत हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पसरवा.

सौजन्य : कायप्पा

Pages