सध्या ऐकत असलेला एखाद्या गाण्याचा, मैफिलीचा, रागाचा दृक्श्राव्य दुवा, त्यातलं तुम्हाला आवडलेलं सौन्दर्यस्थळ, नवे गायक/गायिका यांचे दुवे. त्यातलं तुम्हाला काय आवडलं किंवा आवडलं नाही, याची देवाणघेवाण/ चर्चा करायला धागा.
दुवे नसतील तर तुम्हाला प्रत्यक्ष बघितलेल्या कार्यक्रमांचे शब्दचित्र काढायला ही हरकत नाही.
धागा हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतापुरता मर्यादित ठेवू, आणि फक्त दुव्यांची देवाण घेवाण करण्याऐवजी थोडे तुमचं विचार ही लिहिता आले तर आपल्याला न जाणवलेल्या/ समजलेल्या गोष्टी नव्याने समजुन ते गाणं परत ऐकताना आणखी वेगळे आयाम मिळत रहातात.
उपशास्त्रीय मध्ये बुजुर्ग लोक ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती, टप्पा, नाट्य संगीत इ. म्हणतात. आपण कव्वाली, गझल, रागाधारित सिनेसंगीत ही घ्यायला ही हरकत नाही. अशी रेघ काढणं कठिण आहे. डोक्यात रुंजी घालणारं हिदुस्थानी राग पद्धतीवर आधारित आणि शक्यतो सोलो परफॉर्मन्स म्हणजे चित्रपटातील चित्रित/ किंवा प्रसिद्ध गीतापेक्षा त्या गीतावर केलेला नवा प्रयत्न चांगला वाईट कसाही असेल... त्याची देवाणघेवाण करण्यासाठी धागा असं डोक्यात होतं.
आपल्याला आवडलेलं दुसर्यांबरोबर शेअर करुन आपला आनंद द्विगुणित करायचा. आपल्या शिकण्यात दुसर्यांना सहभागी करुन घ्यायचं झालं.
छान आहे. पियानो ही उत्तम साथ
छान आहे. पियानो ही उत्तम साथ करतो आहे. उच्चार वाईट नाहीत, नाही खटकले.
कैवल्य कुमार गुरव यांचं शूरा
कैवल्य कुमार गुरव यांचं शूरा मी वंदिले ऐकलं होतं >>> हपा, हो मी पण ऐकलं होतं ते. "घाबरटा मी वंदिले" करून टाकलं होतं त्यांनी. नाट्यसंगीतात तशाही अर्थाबरहुकुम चाली कमीच असतात. जी मोजकीच नाट्यगीते शब्द आणि चाल दोघांनाही न्याय देतात त्यातले एक "शूरा मी वंदिले". त्यातल्या जोमदार ताना काढून आलापी केल्याने शूराचा घाबरट माणूस झाला होता.
तसा काही प्रकार नाही आहे या नाट्यगीतात. मूळात मराठी असे शब्द कमीच आहेत, जास्त करून विष्णूची नावेच आहेत जी सगळ्या भाषांत सारखीच असतात. त्यामुळे चुकायची शक्यता नव्हतीच. एक हलका हेल (मराठीतला) आहे, जो ऐकायला मस्त वाटला. तेंव्हा नक्की ऐका.
बरोबर माधव. उच्चार नाही हेल
बरोबर माधव. उच्चार नाही हेल आहे थोडा आणि तो ऐकायला गोड वाटतो. त्यात त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू. मला साथीदार सगळेच फार आवडले. पियानो तर खूपच.
सुंदर विषयावर धागा.
सुंदर विषयावर धागा.
उप-शास्त्रीय ठुमरी, कजरी, चैती, दादरा, हीर, भजनं सगळेच प्रकार आवडतात.
In fact, शास्त्रीय संगीताचे सगळेच मोठे गायक या रचना अधिक ताकतीने, मन लावून सादर करतात, त्यात विशेष रमतात, तल्लीन होतात असे जाणवते. मीरा, कबीर, सूरदास, बुल्लेशाह, रहीम यांच्या असोत की मालवाच्या अवधूती, जोगींच्या रचना. किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी, जसराज, कुमार गंधर्व यांचे भैरवी किंवा भजनं गातांना जणू देहभान हरपते आणि ऐकणाऱ्यांचेही.
Some other personal favourites :
ठुमरी, बड़े गुलाम अली खान :
कंकर मार जगा गयो बमना के छोरा.
प्रेमी प्रेमिका, राधा-कृष्ण ठुमरीचे नायक असतात जनरली, इथे हा ब्राह्मणपुत्र कुण्या झोपलेल्या सुंदरीला कंकर मार के का जगावत है काय माहित ? भारदस्त आवाज, कोमल अदायगी ❤️
माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे कजरी वर्षा ऋतुत तर चैती चैत्र महिन्यात गातात. चैत्रात नवमीला रामाचा जन्म झाला होता, तस्मात प्रत्येक चैती गायनात “ओ रामा” जरूर होता है जनाब, कोणतेही बोल, थीम, कोणत्याही घराण्याचा कोणताही गायक असू दे मग.
गिरिजा देवी आणि छुन्नूलाल महाराज यांची बनारसी ढंगाची चैती पसंत आहे. सर्वच एक सो एक.
शोभा गुरटू - पिया मिलन हम जैबें हो रामा.
डॉ अनिता सेन यांची- मानिक हमरो हेराई गईलो रामा - फार आवडती नाजुक अदायगी, पूर्ण बारकाव्यांसकट पाठ आहे मला
पं छुन्नूलाल मिश्र “सावन झर लागे ला” ही पुरबैय्या कजरी अशा काही sharp yet मृदु-मुलायम स्वरात गातात की आमची एक मैत्रिण म्हणते तसे - जैसे मुलायम मख्खन पर सोने की नुकीली सुईयां बरस रहीं हों !
शास्त्रीय गायकांनी गायलेल्या आवडत्या भजनांची यादी तर फार मोठी आहे.
…बोलावा विठ्ठल किशोरीताईंचं फार्फार आवडतं….
+ ११११
त्यांची मीरा भजनं, “म्हारो प्रणाम” अलबम मधल्या सर्वच रचना ❤️
पं छुन्नूलाल मिश्र “सावन झर
पं छुन्नूलाल मिश्र “सावन झर लागे ला” >>> खासच आहे ती. माझ्याकडे कौशिकी आणि शुभा मुद्गल यांच्या आवाजातली तीच कजरी आहे पण पंडीतजींची खासच आहे. धीरे धीरे सावन झरण्याच्या माहौल अगदी सही सही बनला आहे.
उपशास्त्रीय गायकीत तालाचे महत्व खूप जास्त असते. नुसत्या समेवर येण्यासाठी ताल नसतो तर तालाशी गोफ विणत विणत ती गायकी जाते. या कजरीत एके ठिकाणी तालाची लय खूप वाढते पण पंडीतजींनी "धीरे धीरे" ची लय धीमीच ठेवली आहे - तो भाग ऐकताना खूप भारी वाटतो.
त्यांचीच "खेले मसाणे मे होरी" ही रचना पण भारीच आहे (बहूदा होरीच असावी) विष्णू हा जगाचा पालनकर्ता. हे रुप रोजच्या जीवनातील प्रत्येक रसाचा भोग घेत घेत जगाचे पालन करते. तो विलासी आहे, ऐश्वर्यसंपन्न आहे. कृष्णावतार हा विष्णूच्या अवतारापैकी सगळ्यात जास्त जीवनाचे रंग ल्यालेला अवतार. म्हणून होळी आणि श्रीकृष्ण यांचे अतूट नाते आहे. पण जेंव्हा लयकर्ता महादेव होळी खेळतो ती कशी असेल त्याचे वर्णन ही रचना करते. शब्दच अंगावर रोमांच आणतात. पंडीतजींची गायकी सोनेपे सुहागा.
खेले मसाने मे होरी दिगंबर ..
खेले मसाने मे होरी दिगंबर ..
अगदी !
जालावर Most searched आहे ती होरी.
चिताभस्म भरी झोरी घेवून स्मशानात सांब होळी खेळतोय ही कल्पनाच खूप striking आहे.
सुंदर पोस्टी माधव आणि अनिंद्य
सुंदर पोस्टी माधव आणि अनिंद्य.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rtb2utWfEig
Omkarnath Thakur | Bhairavi | जोगी मत जा मत जा मत जा
माधव आणि अनिंद्य, पोस्ट्स
माधव आणि अनिंद्य, पोस्ट्स आवडल्या.
"घाबरटा मी वंदिले" करून टाकलं होतं त्यांनी >>
अनिंद्य, माधव, केकू ऐकतो एकएक
अनिंद्य, माधव, केकू ऐकतो एकएक करुन.
आता दिवाळी पहाट मध्ये अभिजीत पटासकरचा हार्मिनिअम सोलो ऐकत होतो. सुंदर वाजवलं आहे.
Pages