Submitted by चंद्रहास शास्त्री on 29 April, 2024 - 04:57
फांदीचे घरटे झाले.
©️ चन्द्रहास शास्त्री
येताच फांदीवरी तू, फांदीचे घरटे झाले
हवे तसे सारे झाले, स्वप्नातले घर ते झाले.
तुटल्या त्या पानाला, देठ ते पुन्हा जुळाले
अधांतरी जे राहीले , ते प्रतिष्ठित असे झाले.
बाणा आपुला करारी, रण जिंकले मग निमाले
फिनिक्सची उंच भरारी, घेण्यास मन सज्ज झाले.
पारिजाताचे सकाळी, निज आख्यान मज कळाले
खुडले खोड कुणी ज्याचे, झाड तेच सजीव झाले.
नव्हता सखे उन्हाळा, तुझा अन माझा वेगळा
स्वप्न शारदी चंदेरी, आपुले साकार झाले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
छान.
छान.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
सुंदर !
सुंदर !